ही निवडणूक लोकशाही संविधान गरिबांचे हक्क आणि आरक्षण वाचवण्यासाठी आहे .आम्ही सत्तेत आलो तर आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढवू. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातso हातात संविधानाची प्रत घेऊन राहुल Rahul Gandhi On Reservation गांधींनी केलेली ही विधान. लोकसभा निवडणुकीत संविधान आणि आरक्षण बचावाचा नारा काँग्रेसने दिला होता, पण आरक्षणाबद्दल राहुल गांधींनी अलीकडेच केलेल्या एका विधानामुळे सध्या त्यांच्यावर जोरदार टीका होते. जेव्हा देशात सगळ्यांना समान संधी मिळेल तेव्हा रद्द करण्याचा विचार करू असं राहुल गांधी अमेरिकेतल्या एका कार्यक्रमात म्हणाले. त्यानंतर काँग्रेस आणि राहुल गांधींवर भाजप आणि इतर पक्षांकडून जोरदार टीका केली जाते .so
Rahul Gandhi On Reservation : विधानावरून टीका
राहुल गांधींचा खरा चेहरा समोर आलाय त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलंय राहुल गांधी सत्तेत आले तर आरक्षण संपणार हे स्पष्ट आहे अशी टीका भाजपकडून केली जाते. आता राहुल गांधींच्या विधानाचा अपप्रचार झाल्याचं काँग्रेस आणि मित्र पक्षांकडून सांगितलं जात ,असलं तरी राहुल गांधींच्या Rahul Gandhi On Reservation विधानामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडी डॅमेज होत असल्याची चर्चा होते.so
लोकसभा निवडणुकीत आरक्षण बचाव हीच भाजप विरोधी प्रचाराची लाईन राहुल गांधींनी ठेवली होती. भाजपला संविधान बदलायचंय आरक्षण संपवायचंय त्यामुळे त्यांना 400 पेक्षा जास्त जागा हव्यात असा प्रचार काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधींकडून करण्यात आला.
अनेक सभांमध्ये त्यांनी हातात संविधानाची प्रत घेऊन भाजपला टार्गेट केलं. संसदेतही हातात संविधान घेऊनच त्यांनी आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतली होती, पण आता आरक्षणाबद्दलच्या त्यांच्या विधानाचा निषेध म्हणून राज्यात भाजप नेत्यांनी ठीक ठिकाणी आंदोलन केली आहेत.so
त्यामुळे भाजपसाठी आखलेल्या चक्रव्यूहातच राहुल गांधी स्वतःच अडकल्याचं आता बोललं जातंय. soराहुल गांधींच्या आरक्षणाबद्दलच्या विधानामुळे काँग्रेसला कसं डॅमेज होऊ शकतं राहुल गांधींच्या विधानाचा भाजप कसा फायदा करून घेऊ शकते ? पाहूयात या ब्लॉगमधून .
अमेरिकेतल्या जॉर्ज टाऊन विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधींनी आरक्षणाबाबत विधान केलं जेव्हा देशात सगळ्यांना समान संधी मिळेल. तेव्हा मी आरक्षण संपवण्याचा विचार करू पण सध्या भारतात तशी परिस्थिती नाही असं राहुल गांधींनी म्हटलं .so
या वक्तव्यावरून बसपच्या मायावतींपासून भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी राहुल गांधींना टार्गेट केलं राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा उघड झाला अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनीही राहुल गांधींवर टीका केली. तसेच राज्यातील भाजप नेत्यांनी गांधींच्या या विधानाच्या निषेधार्थ ठीक ठिकाणी आंदोलन सुरू केली आहेत. त्यामुळे लोकसभेला आरक्षण आणि संविधानाच्या मुद्द्यावरून भाजपाला धारेवर धरणारे राहुल गांधी आता आपल्याच विधानानं अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय.so
आता राहुल गांधींच्या या विधानामुळे काँग्रेसला होणार पहिलं डॅमेज म्हणजे वोट बँक विरोधात जाण्याची भीती आरक्षण हा आपल्या देशातला सगळ्यात मोठा संवेदनशील मुद्दा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजवर अनेक पक्षांनी सोयीनso
Rahul Gandhi On Reservation :आरक्षण विरोधात कोणी कोणतंही विधान केलं तर त्याचा फटका संबंधित पक्षाला बसल्याचं पाहायला मिळतं ?
वोट बँकेचं राजकारण केल्याचं पाहायला मिळालंय. आरक्षण विरोधात कोणी कोणतंही विधान केलं तर त्याचा फटका संबंधित पक्षाला बसल्याचं पाहायला मिळतं. उदाहरण द्यायचंच झालं तर 2015 ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी बिहार विधानसभा निवडणुकांच्या आधी आरक्षणाची समीक्षा होण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर विरोधकांनी संघ आणि भाजपला आरक्षण विरोधी म्हणून टार्गेट केलं ..
तेव्हा भाजपची मोठी अडचण झाली होती. आरक्षण संपवण्याचा आपला कुठलाही हेतू नसल्याचं भाजप नेत्यांना ठीक ठिकाणी जाऊन सांगावं लागलं पण बिहार मधल्या दलित आणि ओबीसी वोट बँकेन पाठ फिरवल्याचा मोठा फटका त्यावेळी भाजपला बसला होता.
हेही वाचा : CM शिंदे हैदराबाद गॅझेट लागू करणार ?
यंदा लोकसभा निवडणुकांच्या आधी भाजपन 400 पार चा नारा दिला त्यावेळी भाजप नेते लल्लू सिंग यांच्या संविधान बदलाच्या विधानावरून काँग्रेसनं राण उठवलं. संविधान बदलाच्या आडवून भाजपला आरक्षणावर घाला घालायचाय असा प्रचार काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून करण्यात आला.so
त्यामुळे भाजप 240 वरच थांबली तर काँग्रेसला मात्र चांगलं यश मिळालं. संविधान बदलाचं नरेटिव्ह वर्कआउट झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हापासून राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणना आणि आरक्षण हे दोन मुद्दे लावून धरलेत. त्यामुळे काँग्रेसच्या पारंपारिक दलित आधी आदिवासी
मतदारांमध्ये राहुल गांधींच्या बद्दल एक विश्वास निर्माण झाला ,पण आता Rahul Gandhi On Reservation या विधानामुळे भाजप राहुल गांधींचे हे जातीय समीकरणाचं कार्ड त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतंय.so
राहुल गांधी त्यांचे पणजोबा आजी आणि वडिलांप्रमाणेच आरक्षण संपवण्याची भाषा करतायेत त्यांच्या पोटात जे आहे ते ओठावर येत असल्याचे आरोप भाजप कडून करण्यात आले. जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत कुणीही आरक्षणाला धक्का लावू शकत नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी म्हटलं. soत्यामुळे दलित ओबीसी आणि आदिवासी समाजात काँग्रेस विरोधी नरेटिव्ह सेट
करण्याचा प्रयत्न करून भाजप ही वोट बँक आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करू शकतो.
ज्यामुळे काँग्रेसचं मोठं नुकसानही होऊ शकतं राहुल गांधींच्या विधानामुळे काँग्रेसला होणार दुसरं डॅमेज म्हणता येतं ते म्हणजे आगामी विधानसभेत विरोधात जाणार वातावरण आगामी काळात महाराष्ट्र झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत.so
Rahul Gandhi On Reservation : विधानवरून कोणत्या राज्यात फटका बसू शकतो
हरियाणामध्ये जाट आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जाट आणि नॉन जाट हा मुद्दा हरियाणाच्या निवडणुकीत महत्त्वाच ठरणार आहे. हरियाणात भाजपन ओबीसी समाजाची मत वळवण्याचा प्रयत्न केला. so
राहुल गांधींच्या विधानामुळे दलित वोट बँक हरियाणात काँग्रेसच्या विरोधात जाऊ शकते. झारखंड मध्येही आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे राहुल गांधींच्या आरक्षणाबद्दलच्या विधानानं हा समाज नाराज होण्याची शक्यता.
महाराष्ट्रात मराठा आरक्षण मुद्दा झालाय. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं महायुतीकडे पाठ फिरवत दिल्याचं दिसून आलं . तेव्हापासून सातत्याने महाविकास आघाडीनं ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दलची आपली भूमिका जाहीर करावी असं आवाहन महायुतीकडून करण्यात आलंय.
त्यावर महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचं दिसत नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण देईल त्यांच्या बाजूने राहण्याचं आवाहन मराठा समाजाला केलेलं असतानाच राहुल गांधींनी आरक्षणाबद्दल केलेल्या विधानामुळे आता महायुतीकडून जरांगे यांनाही सवाल केले जात आहेत.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींच्या विधानावर टीका केली आहे. राहुल गांधी सत्तेत आले तर आरक्षण संपणार असा प्रचार केला जातोय. लोकसभेत आलेल्या अपयशानंतर भाजपन आपल्या ओबीसी मतदारांची पुन्हा एकदा बांधायला सुरुवात केली आहे.
विधानसभेला ओबीसी मतदार आपल्या बाजूने उभा राहण्याची महायुतीला आशा आहे. राज्यात जवळपास 32 टक्के ओबीसी तर 10 ते 11 टक्के दलित आणि नऊ टक्क्यांच्या आसपास आदिवासी समाज आहे. समाजांची मतं राज्याचे सरकार निश्चित करण्यात मोलाची भूमिका बजावतात. त्यामुळे आपल्या प्रचारातून ओबीसी समाजासोबतच दलित आणि आदिवासी समाजाची एक्ठा मत मिळवण्याचा प्रयत्नही महायुती करू शकते.so
Rahul Gandhi On Reservation आरक्षण रद्द करण्याबाबत केलेल्या विधानावरून राहुल गांधी बाबासाहेबांसोबतच दलित समाजाचा अपमान करतायेत. राहुल गांधी संविधान आणि आरक्षण विरोधी असल्याचं नरेटिव्ह भाजप करून पुन्हा एकदा यश मिळवण्याच्या तयारीत असल्याचं येतं.
राहुल गांधींकडून आपल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचं सांगण्यात आलंय. आपली भूमिका आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढवण्याची असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या आरक्षणाबद्दलच्या विधानामुळे काँग्रेसला खरंच डॅमेज होणार का ? या विधानाचा भाजप राजकीय फायदा आगामी काळात करून घेणार का ? याबद्दलची तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
एक्सटर्नल लिंक: राहुल गांधी
0 टिप्पण्या