Ajit Pawar Vidhan Sabha :विधानसभा निवडणूक अजून जाहीर देखील झाली नसली तरी सध्या सर्वच पक्षांकडून आपापली मोर्चे बांधणी जोरदार सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. तरी सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत. त्या दृष्टीने आता महायुतीचे जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांकडून व्यक्त केली जाते .
त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यात महायुती आघाडी घेण्याची शक्यता आहे .सध्या महायुतीच्या 100 उमेदवारांच्या ची यादी तयार असून त्या निमित्ताने अजित पवारांच्या संभाव्य यादीची चर्चा ही सुरू झाली आहे .आतापर्यंत जागा वाटपावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तीन ते चार बैठका झाल्या आहेत.
हेही वाचा : मनसे आणि मिटकरींच्या राड्यानंतर जय Jai Malokar चा मृत्यू झाला
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा नुकतेच मुंबईत येऊन गेले आहेत. त्यामुळे ज्या जागांवर वाद नाही तसेच स्टँडिंग आमदारांची उमेदवारी या महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर केली जाईल. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाग 20 उमेदवार ठरले असून बारामतीतून अजित दादाच लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एक्सटर्नल लिंक : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाग 20 उमेदवार ठरले
Ajit Pawar Vidhan Sabha : संभाव्य 20 उमेदवार नेमके कोण ?
म्हणूनच अजित दादांचे हे संभाव्य 20 उमेदवार नेमके कोण आहेत हेच आपण
जाणून घेणार आहोत पवार गटाचे सगळ्यात पहिले संभाव्य उमेदवार आहेत ते म्हणजे स्वतः अजित पवार .
बऱ्याच दिवसांपासून बारामती मधून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ किंवा जय पवार हे निवडणूक लढवतील असं बोललं जात होतं. पण लोकसभेला बारामतीमध्ये प्रतिष्ठेच्या लढाई झालेल्या पराभवामुळे अजित पवार यावेळी कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाहीत असं खात्रीशीर सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.so
त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार उभे राहू शकतात असं बोललं जातंय. यानंतर पुढचे उमेदवार आहेत. छगन भुजबळ ,अजित पवार गटाकडून येवल्यातून छगन भुजबळ यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे.
त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आंबेगावातून तिसरे उमेदवार आहेत . दिलीप वळसे पाटील आंबेगावातून गेले सलग तीन टर्म निवडून येत असलेले दिलीपराव वळसे पाटील.
यांची उमेदवारी अजित पवार गटाकडून जवळपास निश्चित समजली जात आहे. खरं तर वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात मुलगी पूर्वा वळसे पाटील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याने मला नाइलाजाने निवडणूक लढवावी लागत असल्याचं सांगितलं आहे .
पण त्या जागेसाठी सध्या शिंदे गटाकडून देखील दावेदारी केली जाण्याची शक्यता आहे .आगामी काळात त्या संदर्भात चित्र स्पष्ट होईलच .यानंतर चौथे उमेदवार आहेत धनंजय मुंडे . विधानसभेमधून धनंजय मुंडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे विश्वासू समजले जातात.so
गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. यानंतर पाचवे संभाव्य उमेदवार आहेत हसन मुशरीफ. कागल मधून हसन मुशरीफ यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.
सध्या कागल विधानसभा मतदारसंघावरून बरच राजकारण पेटला आहे हसन मुशरीफ यांचं तिकीट जवळपास कन्फर्म असल्यामुळे आता समर्जीत सिंह घाडगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. त्यामुळे कागल मध्ये आता हसन मुशरीफ विरुद्ध समर्जीत सिंह घाडगे अशी लढत होण्याची शक्यता आहे.so
यानंतर सहावे संभाव्य उमेदवार आहेत नरहरी झिरवाळ. नरहरी झिरवाळ यांना दिंडोरीतून पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar Vidhan Sabha : बाकीचे उमेदवार कोणते ?
खरं तर नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे सध्या शरद पवार गटात आणि स्वतः नरहरी झिरवाळ हे अजित पवार गटात असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.
पण विनिंग सीटच्या आधारे नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
यानंतर सातव्या संभाव्य उमेदवार आहेत आदिती तटकरे .सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या 2019 साली श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.so
नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड मधून त्यांचे वडील सुनील तटकरे विजयी झाले. त्याचाच मायलेज आता आगामी विधानसभा निवडणुकीत आदिती तटकरे यांना मिळू शकतं. यानंतर आठवे उमेदवार आहेत संग्राम जगताप . अहमदनगर शहर विधानसभा हा अजित दादांचा बालेकिल्ला समजला जातो.
आणि 2019 साली निवडून आलेले संग्राम जगताप इथून अजित दादा गटाकडून निवडणूक लढवणार आहेत .त्यानंतर नववे उमेदवार आहेत दिलीपराव मोहिते पाटील. खेड विधानसभा क्षेत्रामधून अजित पवार गटाचे जुने जाणते असणारे दिलीप मोहिते यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.so
मागे एकदा भाषणात दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देतो असं म्हणत स्वतः अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अतुल देशमुख यांना संधी मिळू शकते शकते .so
त्यानंतर दहावे उमेदवार असणारे धर्मराव बाबा अतराम . सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा अतराम यांना अहेरी विधानसभा मतदारसंघांमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता
आहे. या मतदारसंघात धर्मराव बाबा यांची कन्याच त्यांच्या विरोधात असण्याची शक्यता आहे .तर दुसरीकडे भाजपकडून त्यांचे पुतणे अमरीशराव आतराम हे देखील चाचपणी करतात .
त्यामुळे आता या मतदारसंघात काका विरुद्ध पुतणे विरुद्ध लेक अशी तेरी लढत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अकरावे उमेदवार आहेत दत्ता मामा भरणे . इंदापूर मधून अजित दादा पवार यांचे विश्वासू समजले जाणारे दत्ता मामा भरणे यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजली जाते.so
दत्ता मामा यांना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपचे हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. त्यानंतर बारावे उमेदवार आहेत सुनील शेळके .मावळ विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार असलेले सुनील अण्णा शेळके यांची उमेदवारी निश्चित समजली जाते.
Ajit Pawar Vidhan Sabha : अजून वाचा
ते अजित दादा पवार यांचे विश्वासू समजले जातात .संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये त्यामुळे त्यांचे देखील नाव समोर आलेला आहे. पण या मतदारसंघातून भाजपच्या बाळा बेगडे यांनी देखील आपली दावेदारी ठोकली आहे. पण तरीसुद्धा विनिंग सीटच्या आधारानुसार सुनील शेळके यांची उमेदवारी कन्फर्म समजली जाते.so
यानंतर 13वे उमेदवार आहेत नितीन पवार . कळवण मधून नितीन पवार यांची उमेदवारी जवळपास फिक्स समजली जाते. पण माकपच्या गावीत फॅक्टर पासून नितीन पवार यांना सावध राहावं लागणार आहे .माकपचे जे पी गावित हेच महाविकास आघाडीकडून त्यांच्या विरोधात उभे असण्याची शक्यता वर्तवली जाते.so
त्यानंतर 14 वे उमेदवार आहेत मकरंद आबा पाटील. वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा मतदारसंघांमधून वाईचे मकरंद आबा पाटील सलग तीन टर्म झालं निवडून येत आहेत. त्यामुळे विनिंग सीटच्या आधारावर त्यांनाच इथून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते .महाविकास आघाडीकडून त्यांच्या विरोधात डॉक्टर नितीन सावंत यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.so
यानंतर पंधरावे उमेदवार आहेत संजय बनसोडे मंडळी उदगीर मधून संजय बनसोडे यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. पण भाजपच्या सुधाकर भालेराव यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानं बनसोडे यांच्यासमोर तगड आव्हान असण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचे सोळावे उमेदवार आहेत अतुल बेणके .so
विनिंग सीटच्या आधारावर जुन्नर मधून अतुल बेणके यांना संधी मिळणार आहे. मध्यंतरी अतुल बेणके आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर बऱ्याच चर्चांना उदाहरण आलं होतं. अतुल बेणके शरद पवार गटात जातील अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. पण तसं न होता आता अजित दादा गटाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत अतुल बेणके यांचं नाव
समोर आलेला आहे .so
त्यानंतर संभाव्य उमेदवार आहेत सुनील टिंगरे म्हणजे अजित दादा गटाच्या सुनील टिंगरे यांना पुन्हा एकदा वडगाव शेरीतून संधी मिळणार असं दिसतंय . पण पुण्यातील पोर अपघात प्रकरणामुळे चर्चेत आलेले अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे चित्र आहे .
त्याचाच एक भाग म्हणून टिंगरे यांचे विरोधक आणि भाजपचे माजी आमदार बापू पठारे यांना पक्षात प्रवेश देण्यात आलाय.so
Ajit Pawar Vidhan Sabha : विधानसभेला अजित पवार गटाच्या वाट्याला एकूण किती जागा येतील?
वडगाव शहरी मतदारसंघात अजित दादांचे आमदार सुनील टिंग यांच्या विरोधात ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.so
त्यानंतर 18 वे उमेदवार आहेत इंद्रनील नाईक. पुसद विधानसभा क्षेत्राचे आमदार इंद्रनील नाईक हे अजित दादा गटाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहेत. पुसदच्या नाईक घराण्यानं शरद पवारांची साथ सोडून मागेच अजित पवारांचा हात पकडलेला होता. त्याचीच परिणिती म्हणून आता इंद्रलीन नाईक यांना पुन्हा एकदा अजित पवार गटाकडून पुसद मधून संधी मिळते.
त्यानंतर 19वे नेते आहेत अण्णा बनसोडे पिंपरी मधून .अजित दादा गटात आणि अण्णा बनसोडे यांनाच तिकीट देण्याचं निश्चित केलं आहे .पण हा मतदारसंघ राखीव असल्याने भाजप आणि आरपीआय ने देखील इथे आपला दावा ठोकलाय .so
भाजपच्या सीमा साळवी ते दावेदारी ठोकू शकतात असं बोललं जातंय. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुलक्षणावंत देवेंद्र तायडे हे पिंपरी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यानंतर शेवटचे विसावे उमेदवार आहेत .अनिल पाटील मंडळी अनिल पाटील यांना अमळनेर विधानसभा क्षेत्रामधून संधी मिळणार आहे .so
विनिंग सीटच्या आधारावरच त्यांना उमेदवारी मिळणार आहे. तर अजित पवार गटाची नुकतीच पक्षांतर्गत जी बैठक पार पडली. त्या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या या संभाव्य 20 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तप करण्यात आल्याचं बोललं जातंय.
पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय ?Ajit Pawar Vidhan Sabha ला पवार गटाच्या वाट्याला एकूण किती जागा येतील? त्यापैकी किती जागा निवडून आणण्यात ते यशस्वी होतील ? तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
हेही वाचा : Maharashtra Vidhansabha Elections वर Haryana, Jammu-Kashmir Elections चा कसा परिणाम होऊ शकतो ?
0 टिप्पण्या