महिन्याभरापूर्वी बदलापूर अत्याचार प्रकरण संपूर्ण राज्यात गाजलं. या प्रकरणातला मुख्य आरोपी Akshay Shinde Encounter ला अटक झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत होती. त्याच्या विरोधात खटला चालू असतानाच 23 सप्टेंबरच्या संध्याकाळी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते.
अक्षय शिंदे पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदे वर गोळ्या झाडल्या ज्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अक्षयच्या एनकाउंटर वरून आता राज्यातलं राजकारणही तापल्याचं दिसून येतंय.so
हेही वाचा : मध्ये रात्री Pune, Satara, Baramati फिरणाऱ्या Drone चं रहस्य नेमकं काय ?
एक्सटर्न लिंक : अक्षय शिंदे एनकाउंटर
इतर आरोपींना यांना वाचवण्यासाठी हे एनकाउंटर करण्यात आल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. Akshay Shinde Encounter नेमकं कसं झालं ? या एनकाउंटर वरून आरोप काय केले जात आहेत ? आणि यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं काय त्याचीच माहिती जाणून घेऊयात .
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेला पोलिसांनी का मारल ? कुणी दिले आदेश ?
माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार बदलापूर प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा ताबा हा बदलापूर पोलिसांकडे होता. 23 सप्टेंबरच्या संध्याकाळी बदलापूर पोलीस तळोजा कारागृहात आरोपी अक्षय शिंदेला त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या नव्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेले होते.
त्यानंतर पोलीस तळोजा कारागृहातून आरोपी अक्षयला बदलापूर पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चालले होते. संध्याकाळी साडेपाच वाजता तळोजा कारागृहातून अक्षयला घेऊन जात असताना साडेसहा वाजता पोलिसांची गाडी मुंबरा बायपास जवळ आली.so
त्यावेळी अक्षय शिंदेन पोलिसांकडचं रिव्हॉल्वर हिसकावून घेतलं. त्यानंतर त्यानं हवेत गोळीबार केला. एपीआय निलेश मोरे वर दोन गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी मोरे यांच्या पायाला लागली आणि ते जखमी झाले. सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला.
त्यावेळी त्यांनी स्वतःच्या सर्विस रिव्हॉल्वर मधून दोन गोळ्या झाडल्या. यातली एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागल्याचं समजतंय. यानंतर जखमी झालेल्या अक्षय शिंदेला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याची प्राथमिक माहिती देण्यात येते.so
तसेच एपीआय मोरे यांनाही कळवा रुग्णालयातून जुपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजतंय. अक्षय शिंदेच्या या एनकाउंटर नंतर सरकारकडून प्रतिक्रियाही देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे वर त्याच्या पहिल्या पत्नीने अत्याचाराचे आरोप केलेहोते.
त्यामुळे त्याला पोलीस तपासासाठी घेऊन जात असताना त्यानं पोलिसांच्या बंदुकीने पोलिसांवर फायरिंग केली. त्यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी झाले. अन्य पोलीस देखील यात जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. त्यामुळे सेल्फ प्रोटेक्शन मध्ये पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केलाय.so
आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. गृहमंत्री आणि उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीच्या पत्नीनं अक्षय विरोधात तक्रार केली होती. त्याच्या आधारावर आरोपीला चौकशीसाठी बदलापूर पोलीस घेऊन चालले होते. त्यानं पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.so
त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला .त्यात बहुदा त्या आरोपीचा मृत्यू झाला असावा. काहीही ठरवून केलेलं नाही. या घटनेची चौकशी केली जाईल असं फडणवीसांनी म्हटलंय.
Akshay Shinde Encounter : विरोधकांच सरकारवर टीकास्त्र
तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या एनकाउंटर नंतर सरकार गृहमंत्री आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. अक्षय शिंदे यांना गोळी नेमकी कशी झाडली ? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का ? त्याला बंदूक कशी काय मिळाली ? पोलीस इतके बेसावत कसे असू शकतात.so
बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी संबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही पण दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदेच एनकाउंटर होतं हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासूनच विश्वास नाही आमची मागणी आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकूणच सगळ्या प्रकरणावर आता संशयाची चादर ही तयार झाली आहे. अशा पद्धतीने जर आरोपी हा पोलिसांच्या संरक्षणात असतानाच रिव्हॉल्वरन स्वतःवर गोळी झाडून घेऊ शकत असेल तर नक्कीच पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह निर्माण होतं.so
आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे नेतृत्व जाणार ह्याच प्रश्न प्रश्नात मशगूल आहेत . यामध्ये हा जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका घडला का याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. so
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुष्मा अंधारे यांनीही याबाबत बोलताना बदलापूर घटनेशी संबंध असणारा आपटे संस्थाचालक अजूनही फरार का आहे. त्याला अटक का झाली नाही. अक्षय
शिंदेच्या आई आणि भावानं जे स्टेटमेंट दिलं त्याकडे दुर्लक्ष करून चालेल का ? या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे प्रकरण आहे.so
आवाज बंद करण्यासाठी या प्रकरणातील अजून धागेदोरे बाहेर येऊ नयेत म्हणून हे करण्यात आलंय का? Akshay Shinde Encounter झालं की ही हत्या आहे? कायद्याची प्रोसेस यात फॉलो नाही झाली.
या प्रकरणातील पोलीस निलंबित झाले पाहिजेत. सीबीआय चौकशी झाली पाहिजे. प्रकरणातील संबंधित सगळ्यांची नारकोटेस झाली पाहिजे. कारण बदलापूर प्रकरणात पोलिसांची भूमिका आधीपासूनच संशयास्पद राहिली आहे. यानंतर गृहमंत्र्यांनी
एक मिनिटही पदावर राहिलं नाही पाहिजे असं अंधारे यांनी म्हटलंय.so
Akshay Shinde Encounter : अक्षयच्या दोन्ही बायकांच आरोप
दरम्यान विरोधकांच्या प्रतिक्रियांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावेळी अक्षयनं लहान चिमुकल्यांवर अत्याचार केला त्यावेळेस विरोधक सांगत होते की त्याला फाशी द्या.
आता विरोधक त्याची बाजू घेत असतील तर हे तर दुर्दैव आहे. म्हणून अशा प्रकारची बाजू घेणं निंदाजनक आहे , असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.so
मागच्या काही दिवसात अक्षय शिंदे ओळख परेड आणि त्याच्यावर त्याच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे अक्षयची ओळख परेड झाली. तेव्हा दोन्ही मुलींनी अक्षयला काठीवाला दादा म्हणून ओळखलं होतं.
या ओळख परेड वेळी विशिष्ट काच लावण्यात आली होती. त्यामुळे मुली अक्षयला पाहू शकत होत्या. पण अक्षय त्यांना पाहू शकत नव्हता. या मुलींनी त्याला ओळखल्यानंतर त्याला कडक कायदेशीर शिक्षा होणं शक्य होईल अशी प्रतिक्रिया कायदेतज्ञांनी दिली होती.so
त्याच्या दोन्ही बायकांनी अक्षय वर शरीर संबंध ठेवताना तो अनैसर्गिकपणे वागायचा, हिंसक वागायचा असा आरोप केला होता. अक्षयच्या दुसऱ्या पत्नीनं त्याच्या विरुद्ध तक्रार सुद्धा दाखल केली होती. त्यामुळे अक्षय वर आणखी कलम लागणार.
आणि त्याच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं बोललं जात होतं. पण आता पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार चौकशी करण्यासाठी नेत असतानाच अक्षयचा एनकाउंटर मध्ये मृत्यू झाल्याचं समोर येतंय. या सगळ्यावर अक्षयच्या कुटुंबीयांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.so
आम्ही दुपारी त्याला भेटायला गेलो होतो. तीन वाजता यायला सांगितलं साडेतीन वाजता भेट झाली चार्जशीट आली आहे असं अक्षयने सांगितलं. त्यानं मला विचारलं की मला केव्हा सोडणार ? मी त्याला सांगितलं एक महिना थांबावं लागेल.so
अक्षयला कोणीतरी चिठ्ठी लिहून दिली होती ती त्याच्या खिशात होती तो दाखवत होता. मात्र
मला काही दिसलं नाही. इकडच्याच मुलांनी ती दिल्याचं त्यानं सांगितलं होतं. त्याला वाचता येत नाही. अर्धवट शाळा शिकलाय त्यामुळे चिठ्ठीत काय लिहिलं होतं ते त्याला माहिती नव्हतं.
त्यानं मला वाचायला दिली होती. तीन वेळा आम्ही भेटलो होतो. त्यानं मला सांगितलं की मी हा गुन्हा केलेला नाही. मी त्या मुलींना बोटही लावलं नाही असं त्यानं म्हटलं होतं. तळोजा जेलमध्ये गेल्या सोमवारी पोलिसांनी भरपूर मारलं असं अक्षय त्यानं मला सांगितलं.so
Akshay Shinde Encounter : अक्षयचा आईसोबत झालेला शेवटचा संवाद
आम्ही त्याला विचारलं कसा आहेस ? जेवण देतात का पोलिसांनी पायाला मारलं. बोटं फोडल्याचं त्यानं आम्हाला सांगितलं. त्याला कपडे नेले होते. ते देखील त्याला देता आले नाहीत. मी सांगितलं की चिठ्ठी देऊन कोणीतरी फसवत असेल ती फेकून दे.
असं त्याचे आई-वडील माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्याच्या आईनं माध्यमांशी बोलताना माझ्या पोराची वाट बघते. माझा पोरगा असं करूच शकत नाही . दुसऱ्यानंच हा गुन्हा केलाय आरोप माझ्या पोरावर दाखल केला.so
माझ्या पोरानं असं काही केलं असतं तर कामावर वर गेला नसता. माझा पोरगा भोळा आहे. त्यानं असं काही केलं नाही. माझ्या पोराला गोळी घालून मारून टाकलं. आम्हाला मारून टाका. आम्ही येतो कोणत्या हॉस्पिटलला टाकलं तिथेच येतो. आम्हालाही मारा माझ्या मुलाबद्दल काहीही बोलतील तो असं करूच शकत नाही.
कामावर गेले तर रस्ता क्रॉस करतानाही मी त्याचा हात धरायचे. रस्ता क्रॉस करताना गाड्या येतात त्यांनाही तो घाबरत होता. तो कसा काय गोळीबार करेल ? माझा पोरगा फटाकाही फोडू शकत नाही. तर तो बंदूक काय चालवेल.so
आम्ही रोजचं काम करून जगणारे लोक आहोत. आम्हीही आता जगणार नाही आमच्या पोरासोबतच जाणार आहोत अशी प्रतिक्रिया अक्षयच्या कुटुंबीयांनी या एनकाउंटर नंतर दिली आहे. तर त्याच्या वडिलांनी अक्षयला आम्ही साडेतीन वाजता भेटून आलो .so
अक्षयला पैसे घेऊन मारून टाकलंय त्याला पिचकारीची बंदूक माहित नाही मग तो काय पोलिसांची बंदूक घेऊन फायर करणार का ? पोलिसांनी आम्हाला काहीही सांगितलं नाही. पोलिसांची ही जबाबदार होती घरी सांगायची.आता मी बातमी पाहिली तेव्हा मला कळलं अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे. so
हे सगळं घडल्यानंतर घटनेची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी होते. तर कोल्हापूर मध्ये नागरिकांनी फटाके फोडत आनंद साजरा केल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये येत आहेत.
या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या याबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
0 टिप्पण्या