दिल्लीतल्या लोकांना जर वाटत असेल मी बेईमान आहे तर मी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजीनामा च्या खुर्चीवर एक मिनिटही बसणार नाही. मी दिल्लीच्या जनतेला विचारणार आहे केजरीवाल इमानदार आहे की गुन्हेगार मी दोन दिवसात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडणार आहे.
मी तोपर्यंत खुर्चीवर बसणार नाही जोपर्यंत दिल्लीची जनता आपला निकाल देणार नाही. 13 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मध्य घोटाळ्याच्या संबंधात बेल दिल्यानंतर आम आदमी पक्षाच्या झालेल्या बैठकीत केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पद सोडण्याची घोषणा केली आहे ते दोनच दिवसात विधिमंडळाची बैठक घेणार आहेत.so
केजरीवाल यांच्या या घोषणेमुळे दिल्लीत राजकीय भूकंप आल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याविषयी आता तर्कवितर्क मांडले जात आहेत .कारण केजरीवाल यांच्या नंतर पक्षाची कमांड चालवणारे मनीष सिसोदिया हे सुद्धा सध्या जामीनावर बाहेर आहेत. आणि सिसोदियांचा सुद्धा निकाल जोपर्यंत जनता लावणार नाही तोपर्यंत ते सुद्धा कुठलंही पद घेणार नाहीत .so
हेही वाचा : तेल आणि वायु चे पाकिस्तानात
अशा प्रकारची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. आम आदमी पक्षाचे नंबर तीन चे नेते संजय
सिंह हे सुद्धा जामीनावर बाहेर आहेत. त्यामुळे संजय सिंह यांची सुद्धा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता कमीच आहे. अशा दिल्लीचं मुख्यमंत्रीपद अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशय यांच्याकडे जाऊ शकतं. याशिवाय अरविंद केजरीवाल दोन दिवसात होणाऱ्या विधिमंडळाच्या बैठकीत दिल्लीची विधानसभा बरखास्त करून पुन्हा नव्यानं विधानसभा निवडणुकीची तयारी ही करू शकतात.
असं चित्र आहे कारण पक्षाच्या झालेल्या बैठकीत त्यांनी दिल्लीच्या निवडणुका महाराष्ट्रासोबत नोव्हेंबर मध्ये घ्याव्यात अशी मागणी केली आहे पण दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाल्यानंतर अचानक मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन केजरीवाल कोणती खेळी खेळतायत ते मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची घोषणा करून काय साध्य करू पाहत आहेत .so
अरविंद केजरीवाल राजीनामा ची अचानक घोषणा
जामीनावर बाहेर आलेल्या केजरीवाल यांनी अचानकपणे मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची घोषणा का दिली हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन महिन्यांपूर्वी झालेल्या लोक सभा निवडणुकीचे चित्र बघावं लागतं .दिल्ली पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये आम आदमी पक्षाचा चांगला प्रभाव आहे. दिल्ली आणि पंजाब मध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे. तर हरियाणामध्ये काँग्रेस सोबत आघाडी करून आपन लोकसभा निवडणूक लढली होती. so
लोकसभेसाठी दिल्लीमध्ये सुद्धा आपन काँग्रेस सोबत आघाडी केली होती पण या तिन्ही राज्यांमध्ये आपला म्हणावं तसं यश आलं नाही. दिल्लीत आपन चार जागा लढवल्या होत्या या चारही जागांवर आपला पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब मध्ये आपने 13 जागा जागा लढवल्या होत्या या 13 पैकी फक्त तीनच जागा आप जिंकू शकली तर हरियाणामध्ये आपन एकच जागा लढवली होती. या जागेवर सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला थोडक्यात सांगायचं तर आम आदमी पक्ष आपल्या बालेकिल्ल्यातच पराभूत झाला.
आपच्या या पराभवाचं कारण काय तर भाजपनं अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भ्रष्टाचारी म्हणून चालवलेलं नरेटिव्ह दिल्लीत भाजपचं हे नरेटिव्ह इतकं स्ट्रॉंग चाललं की लोकसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने प्रचार करण्याची मुभा दिली होती. त्याचा काहीच फायदा झाला नसल्याचं म्हटलं जातं. आपची प्रतिमा लोकात सामान्यांचा पक्ष म्हणून आहे आपची निर्मिती मुळातच काँग्रेस विरोधात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आंदोलनातून झाली आहे.so
असं असताना सुद्धा अरविंद केजरीवाल यांनी 100 कोटींचा मध्य घोटाळा केलाय असं नरेटिव्ह बिल्ड करण्याचा प्रयत्न भाजपनं केला आणि त्यात ते यशस्वी झाले त्यामुळे दिल्लीत आपचा सुपडा साफ झाल्याचं बोललं जातं. आता या भ्रष्टाचाराच्या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठीच अरविंद केजरीवाल राजीनामा ची खेळी खेळली असल्याचं दिल्लीचे पत्रकार सांगतात.
ते कसं तर त्यासाठी केजरीवालांच्या भाषणाचा संदर्भ देता येईल .आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की मुख्यमंत्री पद मला महत्त्वाचं नाही तर संविधान महत्त्वाचं आहे. मी जेलमध्ये असताना राजीनामा दिला असता तर माझं सरकार पाडलं असतं त्यामुळे मी राजीनामा दिला नाही. so
अरविंद केजरीवाल राजीनामा : दिल्लीची जनता निकाल देत नाही तोपर्यंत देणार नाही
मी लोकांना मोफत शिक्षण आरोग्य या सुविधा पुरवल्यात त्यामुळे मी इमानदार आहे आणि जोपर्यंत दिल्लीची जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही. केजरीवाल यांच्या या भाषणात लोकसभेत झालेल्या पराभवाचा संदर्भ असल्याचं बोललं जातंय कारण दिल्लीमध्ये केजरीवाल भ्रष्टाचारी असल्याचं नरेटिव्ह इतकं स्ट्रॉंग झालंय की त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण राजीनामा देऊ आणि त्यातूनच आपल्याला सहानुभूती मिळेल असा केजरीवाल यांचा डाव असू शकतो .so
असे अंदाज सध्या बांधले जात आहेत पण या सगळ्यात केजरीवाल आत्ताच का राजीनामा देत आहेत कारण दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीला उणेपुरे सहा महिने राहिलेत अशा वेळी केजरीवाल दिल्लीचा कारभार करून आपल्याला पुन्हा एकदा सिद्ध करू शकले असते पण अरविंद केजरीवाल राजीनामा देण्याची घोषणा करून टाइमिंग साधल्याचं बोललं जातंय.
ते कसं तर याच महिन्यात हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. हरियाणामध्ये काँग्रेस आणि आप आघाडी होईल असं बोललं जातंय. स्वतः आप सोबत राहुल गांधी आघाडी करण्यास तयार होते पण राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर गेले आणि इकडे हरियाणाच्या काँग्रेस नेतृत्वानं आप सोबतची आघाडी तोडली आणि स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला.
या तुटलेल्या आघाडीनंतर चार-पाच दिवसातच अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिला. आणि आपला मोरल बुस्टर आला आता आम आदमी पक्ष हरियाणामध्ये स्वतंत्रपणे लढेल आणि केजरीवाल यांना हरियाणामध्ये सहानुभूती मिळण्याची ही शक्यता आहे. कारण केजरीवाल हे मूळचे हरियाणाचे त्यामुळे त्यांच्या गृहराज्यात त्यांना सहानुभूती मिळू शकते .so
या सगळ्यात हरियाणामध्ये आपने जर दहा जागा जरी जिंकल्या तर आप किंग मेकरच्या भूमिकेत येऊ शकतो. आणि काँग्रेस सोबत आपली बार्गेनिंग पावर वाढवू शकतो. हरियाणातील विधानसभा निवडणुकीचा फायदा आपला व्हावा म्हणूनच केजरीवाल यांनी राजीनाम्याची खेळी
खेळल्याचं बोललं जातंय.
अरविंद केजरीवाल राजीनामा ची खेळी खेळून साध्य करू शकतात अशी दुसरी गोष्ट म्हणजे दिल्लीच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत हरियाणा जम्मू आणि काश्मीर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्याच्या निवडणुका झालेल्या असतील सध्याची परिस्थिती पाहता हरियाणा महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये काँग्रेस किंवा त्यांच्या मित्र पक्षांची सरकार येतील अशी चिन्ह आहेत.so
अरविंद केजरीवाल राजीनामा ची खेळी खेळून साध्य करू शकतात
दिल्लीमध्ये काँग्रेस पक्ष कमकुवत असला तरी संपूर्णपणे संपलेला नसल्याचं बोललं जातं. कारण दिल्लीमध्ये आज सुद्धा दिवस काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं नाव घेतलं जातं. यात राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी दिल्याचं बोललं जातं. त्यामुळे दिल्लीत सध्या काँग्रेस पक्षाला बूस्ट मिळालाय. केंद्र सरकार नायब राज्यपालांमार्फत दिल्लीचं सरकार चालवतय. त्यामुळे सध्या दिल्लीच्या नागरिकांमध्ये केंद्र सरकार विषयी असंतोष असल्याचं बोललं जातं.
दुसरीकडे केजरीवाल ह्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेत या सगळ्या गोष्टींमुळे दिल्लीची जनता तिसरा पर्याय म्हणून काँग्रेसला पाहत असल्याचं सांगितलं जातंय. . हे केजरीवाल यांना चांगलंच माहीत असल्याचं बोललं जातंय.so
त्यामुळे आप पक्षाला दिल्लीत जर काँग्रेस पक्ष पर्याय म्हणून उभा राहिला तर केजरीवाल यांचं दिल्लीतलं राजकारण धोक्यात येईल त्यामुळे महाराष्ट्रासोबत दिल्लीच्या विधानसभा निवडणुका घ्या असं केजरीवाल यांनी म्हटलंय. कारण महाराष्ट्रासोबत दिल्लीच्या निवडणुका घेतल्या तर राहुल गांधींना दिल्लीत पुरेसा वेळ मिळणार नाही. राहुल गांधी महाराष्ट्रात सक्रिय राहतील याचा फायदा आपोआपच आपला दिल्लीत मिळेल असा केजरीवाल यांचा कयास असल्याचं बोललं जातं. त्यामुळे केजरीवालांनी आत्ताच राजीनामा देण्याची घोषणा केल्याचं सांगितलं जातंय .
अरविंद केजरीवाल यांचं आत्तापर्यंतच राजकारण पाहिलं तर ते नेहमीच असं धक्कातंत्राचं राजकारण करत आलेत. अण्णा हजारे यांचं लोकपाल विधेयकाचं आंदोलन संपल्यानंतर नोव्हेंबर 2012 मध्ये आम आदमी पक्षाची स्थापना झाली. यानंतर वर्षभरातच दिल्लीच्या विधानसभा निवडणुका लागल्या डिसेंबर 2013 ला आपन दिल्लीची पहिली विधानसभा निवडणूक लढवली.
पहिल्याच निवडणुकीत आपला दिल्लीतील 70 पैकी 28 जागा मिळाल्या तर भाजपला 32 आणि काँग्रेसला आठ जागा जिंकता आल्या. दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी 36 जागांची गरज लागते त्यामुळे बहुमत कुठल्याच सरकारला मिळालं नव्हतं. यावेळी केजरीवाल यांनी काँग्रेस सोबत युती करून सरकार स्थापन केलं. सरकार फक्त 49 दिवस चाललं आणि नंतर कोसळलं त्यावेळी केजरीवाल यांनी आजच्या सारखाच राजीनाम्याचा धक्का दिला होता.so
सहानुभूतीचा इतिहास माहीत असल्यामुळे अरविंद केजरीवाल राजीनामा यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ? केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा का केली असावी ? याबाबतची तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
एक्सटर्नल लिंक :अरविंद केजरीवाल
0 टिप्पण्या