लोकसभेत माझी इज्जत 6000 मतांनी गेली आहे. काळजाला झालेली ही जखम खूप खोलवर आहे ही जखम अजून भरलेली नाही. आता माहित नाही या वेदना कधी थांबणार मात्र विधानसभेतील मोठ्या विजयाने हे दुःख संपुष्टात येईल हे शब्द आहेत कृषिमंत्री Dhananjay Munde यांचे. ते बीडमधील अल्पसंख्यांकांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी देखील उपस्थित होते.
Dhananjay Munde : लोकसभेत पंकजा मुंडे यांचा 6000 मतांनी पराभव
लोकसभेत पंकजा मुंडे यांचा 6000 मतांनी पराभव झाल्याचं दुःख मुंडे बहिण भावंडांना आहे. या पराभवाची सल अजून देखील देखील धनंजय मुंडेंना असून त्यांनी ती बोलून देखील दाखवली आहे. त्याचबरोबर त्यांनी विधानसभेत आपला मोठा विजय होणार असल्याचं सांगून विरोधकांना एक प्रकारे चॅलेंजच दिलंय. आता राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर धनंजय मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळीत देखील राजकीय समीकरण बदलली आहेत. so
पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांनी मुंडेंवर कठोर टीका करत त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे आता परळीतून Dhananjay Munde मुंडेंना हरवण्यासाठी पवारांसह महाविकास आघाडीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंडेंना पुन्हा एकदा आपल्या ला बालेकिल्ल्यातून निवडून येणं अवघड जाईल का ? धनंजय मुंडे यांच्या समोर परळीतून नेमकी काय आव्हान असतील जाणून घेऊया ब्लॉगमधून. so
लोकसभा निवडणुकीत भाजपची स्थिती 23 वरून नऊ अशी झाली आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला. त्यात पंकजा मुंडे यांचा देखील समावेश आहे. पंकजा मुंडे यांचा शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी 6553 मतांनी पराभव केला. पंकजा मुंडे यांच्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह भाजपमधील मोठ्या नेत्यांनी लक्ष घातलं होतं. बहिणीला विजयी करण्यासाठी भाऊ Dhananjay Munde यांनी रात्रीचा so दिवस केला.so
मतदानादिवशी बीडमध्ये झालेला गोंधळ राज्यभर गाजला होता लोकसभेत बजरंग सोनवणे यांना गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी आणि केज या विधानसभा मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मत मिळालेत. परळीतून मात्र सोनवणेंना 67,000. तर पंकजा मुंडे यांना 14174 इतकी मत मिळालीत लोकसभेतील या मताधिक्यामुळे महाविकास आघाडीला धनंजय मुंडेंना परळीतून हरवणं कठीण जाणार असल्याचं चित्र आहे.so
मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व नेत्यांना सबक शिकवण्याचा निर्धारच केलेला दिसतोय. यामध्ये धनंजय मुंडे यांचा देखील समावेश आहे. यापूर्वी पवारांनी soधनंजय मुंडे यांच्यावर जळजळीत शब्दात टीका केलेली आहे.
त्यामुळे पवार गटाचे कार्यकर्ते येणाऱ्या विधानसभेला आक्रमकपणे उमेद्वाराचा जोरात प्रचार करताना दिसतील यात कसलीच शंका नाही.आता प्रश्न पडतो की धनंजय मुंडे हे सवच्या बळावर परळी विधानसभेतून निवडून येण्याची क्षमता ठेवतात का ? त्यांना जनतेचा पाठिबा असेल का ? ते soआता पाहूया
Dhananjay Munde यांची परळीतील ताकद
धनंजय मुंडे यांची परळीतील ताकद पाहूयात 2009 आणि 2014 अशा दोन टर्म पंकजा मुंडे या परळीतून आमदार राहिलेत. 2014 ला धनंजय मुंडे हे परळीतून राष्ट्रवादीच्या तिकिटावर, बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढले होते. मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. 2019 ला पुन्हा धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात 12214 मत घेतली होती. तर पंकजा मुंडे यांना 91413 मत मिळाली होती.so
धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यापेक्षा 30 हजार मत अधिक घेतली होती आता दोघे बहिण भाऊ महायुतीत असून त्यांची परळीतील ताकद वाढल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत ही ताकद दिसून आली होती. यासह धनंजय मुंडे यांची परळीत ताकद किती आहे. soयाकडे लक्ष देऊयात बहीण पंकजा यांच्या विरोधात असताना धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये नगरपालिका जिल्हा परिषदेच्या गटात आपल्या गटाचे वर्चस्व निर्माण केले.so
तर परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर देखील मुंडे बहिण भावाचेच वर्चस्व आहे कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजप नेत्या पंकजा मुंडे तर उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत. जिल्हा बँकेसह बाजार समितीत देखील धनंजय मुंडे यांचा गट सक्रिय आहे. यातून
कृषिमंत्री आणि बीडचे पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे स्वतः परळीवर ताकद राखून असल्याचं स्पष्ट होतंय.so धनंजय मुंडे मुंडे यांना परळीतून कोणते घटक मारक ठरतील
याकडे लक्ष देऊयात मुंडेंना मनोज जरांगे यांच्याशी घेतलेला पंगा महागात पडण्याची चर्चा सध्या सुरू आहे. परळीत वंजारी आणि मराठा हे दोन्ही समाज तुल्यबळ आहेत. लोकसभेत मराठा आरक्षणाचा फटका पंकजा मुंडे यांना बसल्याचं बोललं जातं . त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जाहीर सभेतून टीका केल्या. त्याला जरांगे पाटील यांनी देखील सडोतड उत्तर दिलंय.
मुंडे जरांगे यांचा हा कलगीतुरा राज्यात चांगलाच गाजला होता. आता जरांगे पाटील यांनी सरसकट मराठी मराठा समाजाने एकाच उमेदवाराला मतदान करण्याचा आव्हान केलंय. त्यातून परळीतील मराठा नेते Dhananjay Munde यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. अशातच परळीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमानंतर धनंजय मुंडे यांनी जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती स्वतः मनोज जरांगे यांनी दिली होती.
Dhananjay Munde आणि मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट
मध्यरात्री अंतरवाली सराटीत जाऊन मुंडे यांनी जरांगे यांची भेट. बराच वेळ चर्चा केल्याचं देखील जरांगे यांनी सांगितलं होतं. butतर धनंजय मुंडे यांनी मात्र अशी भेट झालीच नसल्याचं सांगितलंय. कुठेतरी मतदारसंघातील वाढता रोष पाहता कमी करण्याचे हेतूने धनंजय मुंडे यांनी जरांगे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. यानंतर मतदारसंघात मुस्लिम समाजाची देखील निर्णायक मत आहेत मात्र महायुती सोबत असलेल्या मुंडे यांना मत मिळण्याची शक्यता कमीच आहे.
लोकसभेत मुस्लिम मत विरोधात गेल्याची खंत देखील मुंडेंनी अल्पसंख्यांक मेळाव्यात बोलून दाखवली आहे. आता विधानसभेत मुस्लिम समाज काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. धनंजय मुंडेंची कोंडी करण्यासाठी शरद पवार रणनीती आखणार असल्याचे एव्हान स्पष्ट झालंय. यापूर्वी शरद पवारांनी धनंजय मुंडेंचा शेलक्या शब्दात समाचार घेतलाय.
धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस त्यांना कशा कशातून बाहेर काढलंय हे सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्किल होईल. लहान कुटुंबातला उद्योमुख तरुण नेता म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली. लोकांची नाराजी होती तरीदेखील त्यांना जबाबदारी दिली हे माहीत असताना देखील माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करू लागलेत. कुटुंबावर हल्ले करत आहेत. मी त्यांच्या बाबत आज बोललो ते शेवटचं यापुढे बोलणार नाही अशा भाषेत पवारांनी धनंजय मुंडे यांचा समाचार घेतलाय. यातून पवार परळीत धनंजय मुंडेंना पराभूत करण्यासाठी तगडी फिल्डिंग लावणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते.
परळीत वंजारी आणि मराठा समाज तुल्यबळ आहेत. धनंजय मुंडेंना तुल्यबळ फाईट देईल असा उमेदवार विरोधकांकडे नसल्याचं सध्या चित्र आहे. मात्र परळीत आता मराठा समाजाची लाट आहे ही लाट आणि मुंडेंचे विरोधक एकत्र आले तर परळीत आमदार बदलाची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान पंकजा मुंडेंना पराभूत करूनच धनंजय मुंडे आमदार आणि आता मंत्री झालेत त्यामुळे पंकजा मुंडे यांचे काही समर्थक देखील धनंजय मुंडेंना पराभूत करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे.
दरम्यान वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बहिण भाऊ एकत्र आलेले आहेत. परळीतून काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह शरद पवार गटाकडून बबन गित्ते., राजाभाऊ फड, टी पी मुंडे, भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड, सुदामती गुट्टे आदी मंडळी निवडणुकीची तयारी करतात.
Dhananjay Munde :बबन गित्ते नावाची चर्चा
बबन गित्ते परळी पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांची साथ सोडून पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला . त्यांच्या नावाची परळीतून चर्चा होती . अजित पवार गटातील मरळवाडी गावाचे सरपंच बापू आंधळे यांचा गोळीबारात मृत्यू झाला होता. बबन गित्ते जेलमध्ये असल्याने त्यांचा पत्ता कट झालाय. परळीतून काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे इच्छुक आहेत.and
राजेसाहेब देशमुख मूळचे परळीचे त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती पदाची देखील जबाबदारी स्वीकारली आहे. राजेसाहेब देशमुख यांना आपल्या पक्षात घेऊन शरद पवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठा चेहरा परळीतून उतरवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. बीड लोकसभा निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी उमेदवार दिल्याने झालेल्या ध्रुवीकरणामुळेand बजरंग सोनवणे यांचा विजय झाला होता.so
हेही वाचा : Eknath Shinde फॅक्टर
तीच खेळी शरद पवार परळी विधानसभेत देखील खेळू शकतात. याशिवाय रासप पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी सुधामती गुट्टे यांनी थेट परळीत धनंजय मुंडे यांना पाणी पाजण्याचं आव्हानच दिलंय. सुधामती गुट्टे ह्या शरद पवार गटात आहेत. so
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप मधून शरद पवार गटात गेलेल्या फुलचंद कराड यांची देखील इथून चर्चा आहे. आता स्थानिक जाणकरांनी मात्र परळी बाबत आत्ताच अंदाज वर्तवणं अवघड असल्याचं सांगितलंय. यापूर्वी रेणापूर मधून गोपीनाथ मुंडे यांचा पराभव झालेला आहे. मंत्री असताना पंकजा मुंडे यांचा पराभव झालाय. प्रीतम मुंडे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर देखील लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झालाय.so
त्यामुळे परळीत विरोधकांनी नियोजनबद्ध ताकद लावली तर काही होऊ शकतं. परळी मतदार संघ मुंडे कुटुंबाचा बालेकिल्ला राहिलाय. पूर्वीच्या रेणापूर मतदारसंघातून 1980 पासून भाजपचे गोपीनाथ मुंडे पाच वेळा विजय झालाय. परळीत दोन वेळा पंकजा मुंडे ,राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आमदार राहिलेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ दिली. so
लोकसभेत शरद पवारांनी बीड मधून मुंडेच्या विरोधात खासदार निवडून आणलाय. त्यामुळे पवारांचं पुढचं लक्ष धनंजय मुंडे असल्याचं बोललं जातय. अशा परिस्थितीत परळीत बीड लोकसभेची पुनरावृत्ती टाळणं धनंजय मुंडेंना जमेल का तुम्हाला काय वाटतं ? तुमची मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
एक्सटर्नल लिंक :धनंजय मुंडे-मनोज जरांगे
0 टिप्पण्या