सध्या ड्रोनच्या भीतीनं पुणे , सातारा ,बीड, नगर जिल्ह्यातील लोकांची झोप उडाली आहे .जागे रहा निदान Drone येईल आणि तुमचं घर लुटून नेईल अशी दास्ती घेतलेले गावकरी रातभर आभाळाकडे डोळे लावून बसतायेत. ग्रुप करून गावागावात गस्त घालतायेत . जरा कोणी सांगितलं की मला आता लाल हिरव्या लाईटचं काहीतरी आमच्या घरावरनं पळताना दिसलं की सगळं गाव ते लाल लाईटचं लफडं नेमकं काय ते बघायला घराबाहेर पडतंय .so
ड्रोन उडवणारे गावाच्या आजूबाजूला असतील डोंगरात लपून बसले असतील म्हणून गाड्या काढून त्यांचा शोध घेण्यासाठी पळापळ करतायेत. संशय सहित आणि अनोळखी लोकांवर पाळत ठेवतायत . काही ठिकाणी तर गावकऱ्यांनी निव्वळ संशयाच्या जोरावर तशा अनोळखी लोकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या .तुमच्या पण गावात सेम परिस्थिती असणार आम्हाला माहिती आहे .so
कारण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्यात रात्रीच्या वेळेस ड्रोन फिरत असून ते घराची रेकी करत असल्याच्या चर्चांना उदाहरण आले . मध्यंतरी अंतर्व सराटी मधून जरांगे पाटलांच्या घरांवर ड्रोनने रेकी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता .तेव्हापासून मराठवाड्यात अनेकांनी ड्रोनची दास्ती घेतली .
हेही वाचा : Mumbai Cha Raja : Ganesh Galli च्या उंच मूर्तीचा भारतात पहिला मान
हेही वाचा : ड्रोन
पण मंडळी हे नेमका काय प्रकार आहे ? नेमकी खरी परिस्थिती काय आहे ? खरंच असं कोणी ड्रोन मार्फत आपल्या गावात आपल्या घरादारावर रेकी करतय का ? आणि त्यातून आपली माहिती गोळा करून नंतर त्याचा वापर करून चोरी किंवा इतर चुकीच्या गोष्टी घडवून आणणं हा त्यांचा उद्देश आहे का ? शिवाय या सगळ्या प्रकाराबद्दल पोलिसांचं म्हणणं नेमकं काय आहे ? आणि भारतात कोणी असं ड्रोन सहजपणे उडवू शकतं का ? सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा आपण घेणार आहे.so
नक्की Drone च लफड काय आहे ?
सध्या अनेक गावात लोकांचा असा समज झालाय की चोरी करायच्या आधी चोर ड्रोन न गावावर लक्ष ठेवतात . किंवा घराची रेकी करतात . आणि नंतर चोरी करतात त्या चर्चेचं लोन सबंध पुणे जिल्हा ,नगर ,सातारा, बीड मध्येही पसरले .आणि त्याला कारण ठरलंय ड्रोन चोरीबद्दल whatsapp वर व्हायरल होणारे मेसेजेस .
पुण्यानंतर सध्या साताऱ्यात सगळ्यात जास्त या Drone चर्चा आहे. गावात ड्रोन दिसून गेले की चोरी होते . बरं फक्त पैसे किंवा सोनं नाणं नाही तर गाड्या सुद्धा चोरी होतात. हे गणित लोकांच्या डोक्यात फिट्ट बसलंय . काही ठिकाणी तर गावकऱ्यांनी त्यांच्याही पुढे जाऊन ड्रोन घरातील सोनं लपून ठेवलेली जागा शोधतो . त्याला तसा सेन्सर बसवलेला असतो .so
रात्री 8:30 ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत काही भागात हे ड्रोन घिरट्या घालतात इथपर्यंत चर्चा रंगवल्यात पुणे, बारामती, मुळशी, भोर, वेल्ला, दौंड, इंदापूर, आंबेगाव ,,शिरूर, सातारा , फलटण , कोरेगाव , मान खटाव, दहिवडी , बीड , माजलगाव इथून अशा चर्चा समोर आल्यात.
पण मंडळी याची सुरुवात कुठून झाली. तर ऐका जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुळशी तालुक्यातील भरे आणि बारामती तालुक्यातील माळेगाव इथे अशाप्रकारे ड्रोनच्या घिरट्या सुरू असताना त्यातील एक ड्रोन एका घरावर आणि एका शेतात कोसळल्याची घटना घडली होती. मात्र हा ड्रोन कुणाचा होता कशासाठी हा ड्रोन उडवण्यात येत होता याचा मात्र काही तपास लागलेला नाही.so
त्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं . चोरीच्या उद्देशानं चोर ड्रोनच्या सहाय्याने टेहाळणी तर करत नाहीत ना असा संशय नागरिकांच्या मनात तयार झाला . मात्र त्यावेळी तिथे चोरीची कुठलीही घटना समोर आलेली नव्हती . पण तसं असताना सुद्धा काही जणांनी सोशल मीडियावर ड्रोन उडवणाऱ्यांना पोलिसांनी पकडलं . चोरटे ड्रोन कॅमेराचा वापर करून घरात किती व्यक्ती आहेत हे बघतात .
लोकांच्या हालचाली वर लक्ष ठेवतात . आणि चोरी करतात असे मेसेजेस व्हायरल केले झालं .असं काही व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही .तुम्हाला माहिती आहे बरं गावातला एक वर्ग ड्रोन चोरीबद्दल पॉझिटिव्ह असला तरी काही जणांना ते मान्य नाही.so
Drone नाहीत तर छोटी विमान आहेत ?
ते म्हणतात फिरणारे ड्रोन नाहीत तर छोटी विमान आहेत. तर काही जणांचं म्हणणं आहे ते खेळण्यातील ड्रोन आहेत. ते काय ऑनलाईन कुणालाही भेटतात आणि त्या ड्रोनची रेंज फार नसते. आणि रेकी करायला ऍडव्हान्स ड्रोन पाहिजेत ज्याची किंमत सुमारे दीड ते तीन लाखाच्या आसपास असते .
मग एवढे महागाईचे ड्रोन घेऊन कोण चोरी करेल . अशी वेगवेगळी मतं लोकांमध्ये पाहायला मिळतात आहेत .पण ज्यांनी कोणी तसे लाल लाईटचे डिवाइस हवेत उडताना पाहिले त्यांचं म्हणणं आहे. ती विमान नाहीयेत तर ड्रोनच आहेत .पण या सगळ्या चर्चांमुळे लोकांच्या मनात
संभ्रम आणि भीती दोन्ही अधिक वाढते .so
त्यावर तोडगा म्हणून पुणे जिल्ह्यातील काही जागरूक तरुणांनी आणि पत्रकारांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा पोलीस म्हणाले आम्हाला सुद्धा गावागावातून ड्रोन चोरीच्या चर्चा ऐकायला मिळाल्या .पण आजपर्यंत ड्रोन आणि चोरीची एकही परस्पर घटना पाहण्यात आली नाही . आम्ही या उडणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती काढली तेव्हा सुरुवातीला ते ड्रोन नाहीत तर छोटी विमान आहेत. अशी माहिती मिळाली.so
तसंच ज्या ज्या लोकांना आम्ही ड्रोन उडवताना पकडलं ते लोक एक तर त्यांच्या ड्रोनचं टेस्टिंग करत होते .किंवा ड्रोन उडवण्याचा सराव. त्या लोकांचा फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय आहे . पण तरीही पोलिसांनी त्या प्रकरणी लक्ष घातलंय आम्हाला अद्याप ड्रोन चोरीबद्दल ठोस माहिती मिळालेली नसल्यानं ड्रोन पाहण्यासाठी पोलिसांनी ठीक ठिकाणी जॅमर लावलेत.
तसंच आम्ही आणखी एका उपकरणाचा वापर करत आहोत ज्यामुळे संबंधित ड्रोनचा एक्सेस त्याच्या मूळ रिमोट कंट्रोल पासून तुटतो आणि तो ड्रोन आमच्या कंट्रोल मध्ये येतो . त्यानंतर बऱ्याच ठिकाणी ड्रोनच्या गिरट्या बंद झाल्याचं नागरिक सांगतात. पोलिसांनी तसे काही ड्रोन दिसले तर तात्काळ आम्हाला कळवा अशा नागरिकांना सूचना दिल्यात .आणि तशी माहिती मिळताच पोलीस अधिकारी कर्मचारी लगेच घटनास्थळी धाव सुद्धा घेत आहेत.so
परंतु आजवर त्यांच्याही हाती ठोसपणे काही लागलेलं नाही. पण एक गोष्ट आहे. गावागावात जे ड्रोन उडत असल्याचे मेसेज फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत .ते कोणत्यातरी एकाच ठिकाणचे असून गावात नाव बदलून ते अनेक ठिकाणी व्हायरल केले जात आहेत.
पोलिसांच आव्हान नागरिकांनी Drone अफवावर विश्वास ठेवू नये
पण त्या भागात कसलीही चोरी अथवा चोरीचा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असं आव्हान पोलिसांनी केलेले आहे . दरम्यान पोलीस यंत्रणेच्या वतीने काही ठिकाणी गावागावात ग्राम सुरक्षा दलाची स्थापना देखील करण्यात आली आहे. त्या ग्राम सुरक्षा दलांतर्गत जर रात्रीच्या वेळी गावात अनुचित प्रकार आढळून आला तर वॉइस मेसेज द्वारे पोलीस व ग्रामस्थांना सावत केले जाते .
परंतु ड्रोनच्या बाबतीत मेसेज देत असताना प्रथम त्या बाबतीतली पडताळणी व खात्री करावी त्यानंतरच ग्रामस्थांनी मेसेज व्हायरल करावेत असं मत पोलीस प्रशासनाने व्यक्त केलेलं आहे. बरं आम्ही काही ड्रोन मालकांना याबद्दल टेक्निकल गोष्टी विचारल्या तर ते म्हणाले ऑनलाईन जे छोटे ड्रोन कॅमेरे मिळतात त्याची फ्लाईंग रेंज फक्त 80 मीटर असते आणि रिमोटची रेंज 100 मीटर. तसंच त्याची बॅटरी फक्त नऊ ते दहा मिनिट टिकते .so
आणि रात्रीचं ड्रोन चांगल्या रीतीचं फुटेज दाखवू शकत नाहीत . जर रात्रीच्या अंधारात व्यवस्थित फुटेज हवं असेल तर किमान दीड ते दोन लाखापासून पुढच्या किमतीचे ड्रोन असायला हवेत .आणि विशेष म्हणजे त्यांची बॅटरी रेंज सुद्धा 15 मिनिटाच्या वर टिकत नाही . तसंच खूप लांबून ते ड्रोन ऑपरेट करता येतात असं नाही . त्यामुळे असं ड्रोन घेऊन कोणी चोरी करायला येण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान पुण्याच्या भागात दिसणारे ड्रोन हे ड्रोन नसून छोटी विमान होती. ट्रेन साठी ती विमान रात्री आकाशात घिरट्या घालतात . कारण रात्री आकाश मोकळं असतं अशी ही
माहिती मध्यंतरी मिळाली होती. त्यावर त्या विभागाशी संपर्क साधला असता त्या विभागाने सुद्धा माध्यमांशी बोलताना या गोष्टीला दुजोरा दिला. पण छोटी विमान आणि ड्रोन यामधील फरक आम्हाला समजतो ती छोटी विमान नसून ते ड्रोनच होते .so
पोलिसांनी जॅमर लावल्यावर ड्रोनच्या गिरट्या कशा बंद झाल्या असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय . पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत ड्रोन व चोरी यांचा एकत्रित काही दिसून आलेला नाही . सध्या पोलिसांना ड्रोन बाबत बाबतचे कॉल सातारा जिल्ह्यातील शिरवळ , लोणंद ,फलटण , कोरेगाव ,दहिवडी या पट्ट्यातून येत आहेत .
Drone बद्दल पोलिसांची तपासणी चालू
पण पोलिसांनी लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असं आव्हान केलंय. मंडळी ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर साधे ड्रोन काही हजारात मिळतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरवण्यासाठी कोणी जाणून बुजून असा प्रकार केला नाही ना याची पडताळणी पोलीस करत आहेत . त्यामुळे गेल्या काही महिन्यात कोणी कोणी ऑनलाईन ड्रोन मागवले आहेत का? या दृष्टीने ही तपास सुरू असल्याचं बोललं जातंय .so
हे झालं चर्चाबद्दल पण आपल्याकडे ड्रोन उडवायचे काही निर्बंध आहेत का तर नक्कीच आहेत . ड्रोनच्या वापरास भारतात परवानगी आहे . परंतु त्यासाठी नियम सुद्धा घालून दिलेले आहेत .1 डिसेंबर 2018 पासून लागू झालेल्या सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट्स म्हणजेच सीए आर नुसार भारतात 250 g पेक्षा जास्त वजनाचे ड्रोन उडवत असताना ऑपरेटरला त्याचा ड्रोन संबंधित अधिकाऱ्यांकडे नोंदवावा लागतो .
प्रत्येक ड्रोनचा स्वतःचा वेगळा ओळख क्रमांक म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो जो त्यांना नोंद करून घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला परवानगी घेण्यासाठी सांगावा लागतो . आणि रितसर परवानगी घेऊनच त्यांना ड्रोन उडवण्याची मुभा मिळते.
त्यामुळे जर खरंच कोणी विना परवाना असे रात्रीचा ड्रोन उडवत असेल तर तो गुन्हा ठरेल आणि अशा परिस्थितीत त्या ड्रोन ऑपरेटरला शिक्षाही होऊ शकते .त्यामुळे सध्या तरी लोकांनी ड्रोन बद्दल आपापसात चर्चासत्र रंगवायची सोडून पोलिसांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवा .so
आणि अफवांना बळी पडण्यापासून वाचा बाकी तुमच्या गावात किंवा आसपासच्या भागात ड्रोन दिसला आणि चोरी झाली .असेल तर तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि महत्त्वाचं पोलिसांना त्याची खबर द्या निदान लांडगा आला रे आला गोष्टी सारखी गत व्हायची .
एक्सटर्नल लिंक : ड्रॉण
0 टिप्पण्या