Click Me Join Us Join Learn More Click Here Download Now Contact Us

 Elon Musk यांच्या २० वर्षात Mars वर शहर उभारणार, SpaceX चं नवीन मिशन, हे खरंच शक्य आहे का ?

 माणसाला आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर पुढच्या शंभर वर्षात त्याला आपल्या रहिवासासाठी पृथ्वीला पर्याय शोधावे लागतील- Elon Musk. 2017 मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांनी केलेलं हे विधान आता त्यांचे हे विधान इम्पॉसिबल वाटतं . पण जगात प्रत्येक मिनिटाला 260 बालक जन्माला येतात हा रेशो बघितल्यावर पृथ्वीला पर्याय शोधणं ही काळाची गरज आहे. हे नाकारता येत नाही.so

वाढती लोकसंख्या त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारी गर्दी हे चक्र न थांबणार आहे . पण म्हणून पृथ्वी सोडून इतर ग्रहावर एलियन म्हणून राहायला जाणं सोपं आहे का ? असा प्रश्न पडतो . माणसानं चंद्रावर पाऊल टाकलं पण तिथे राहण्याचं पुढचं पाऊल त्यानं काही उचललं नाही . पण आता मंगळावर शहर उभारण्याचा प्लॅन उद्योगपती एलॉन मस्क यांनी आखलाय.so

हेही वाचा  :  रोज अडीच किलो मटण खाणाऱ्या जगातल्या Illia Golem  Monster Body Builder चा मृत्यू कशामुळे झाला ?

पुढच्या चार वर्षात माणसाला मंगळावर उतरवून पुढच्या 20 वर्षात तिथे शहर उभं करण्याची योजना Elon Musk यांच्या स्पेस एक्स या कंपनीकडून आखण्यात येते . त्यासाठीची टाईमलाईनही मस्क यांनी जाहीर केली आहे. पण मस्क यांनी मंगळावर वसाहत निर्माण करण्याचा दावा पहिल्यांदाच केलेला नाहीये. याआधी ही अनेकदा त्यांनी याबद्दल भाष्य केलंय. पण त्यात त्यांना अजूनपर्यंत यश आलं नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे एलॉन मस्क यांचं हे मिशन मंगळ नक्की आहे काय ?so

Elon Musk :  पुढच्या 20 वर्षात मंगळावर शहर उभारणं खरंच शक्य आहे का ?

Elon Musk


पुढच्या 20 वर्षात मंगळावर शहर उभारणं खरंच शक्य आहे का त्याचीच माहितीजाणून घेऊयात  सगळ्यात आधी एलॉन मस्क यांचा मिशन मंगळचा प्लॅन काय आहे ते बघूयात एलॉन मस्क यांनी ट्वीट करत मिशन मार्चची टाईमलाईन सांगितली आहे. पुढच्या दोन वर्षात मंगळावर स्टारशिप रॉकेट पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात येईल.

या मोहिमेत स्टारशिपचं मंगळावर यशस्वी लँडिंग झालं तर पुढच्या चार वर्षात मंगळावर मानवी मोहीम आखण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रत्यक्षात माणसाला मंगळावर उतरवण्यात येईल. आणि पुढच्या 20 वर्षात मंगळावर शहर उभारलं जाईल असं मस्क यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलंय.so

स्पेस एक्स कडून मंगळावरच्या वसाहतीचा आराखडाही तयार करण्यात आलाय . सध्या सूर्यमालेत मानवी वस्ती असलेला पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे . माणूस फक्त पृथ्वीवरच अवलंबून आहे त्यामुळे भविष्यात एकापेक्षा जास्त ग्रहांवर मानवी वसाहत उभी राहिली तर पृथ्वीवरच अवलंबित्व कमी होईल. आणि मानवी जीवन नष्ट होण्याचा धोका राहणार नाही . असं मस्क यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलंय.so

आता एलॉन मस्क ह्या मिशन मार्क्स साठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत असल्याचं आपल्याला. दिसतं डिसेंबर 2020 ला एका इंटरव्यू मध्ये एलॉन मस्क यांनी स्पेस एक्स 2024 ला माणसांना मंगळावर पाठवणार असल्याचं सांगितलं होतं. आणि 2026 पर्यंत मंगळावर मानवी वसाहत तयार होईल असा दावा मस्क यांनी केला होता.

पण 2022 मध्ये त्यांनी ही तारीख बदलून 2029 पर्यंत मंगळावर शहर उभारण्यात येईल असं म्हटलं होतं. मंगळावरच्या वसाहतीचा आराखडाही स्पेस एक्स कडून जारी करण्यात आला होता. आता एखादं यान अंतराळात पाठवण्यासाठी येणारा खर्च हा कितीतरी हजार करोडच्या घरात असतो त्यामुळे मंगळावर सामान्य माणसाला राहणं परवडणार आहे का ? हा मोठा प्रश्न असल्यानं मस्क्यांच्या दाव्यावर अनेक प्रश्नचिन्ह  निर्माण केली जात आहेत.

पण यावरही स्पेस एक्स कडून सोल्युशन देण्यात आलंय. ते स्टारशिप रॉकेटचं या स्टारशिप रॉकेट मधूनच माणसांना मंगळावर पाठवण्याचा प्लॅन स्पेस एक्स न आखलाय आता. हे स्टारशिप रॉकेट नक्की आहे काय ते थोडक्यात बघूयात .

स्टारशिप स्पेसक्राफ्ट आणि सुपर हेवी बुस्टर मिळून स्टारशिप रॉकेट तयार होतंय . हे जगातलं आजवरच सगळ्यात शक्तिशाली रॉकेट असल्याचं सांगितलं जातं .so

Elon Musk : स्टारशिप  आजवरच सगळ्यात शक्तिशाली रॉकेट ? 

स्टारशिपची उंची 397 फूट असून सुमारे 100 ते दीडशे मेट्रिक टन भार वाहून न्यायची स्टारशिपची क्षमता आहे स्टारशिप रॉकेटचा वापर चंद्र आणि मंगळावर माणसं आणि वस्तू वाहून नेण्यासाठी होणार
आहे. एका वेळी शंभर माणसं स्टारशिप मधून पाठवली जाऊ शकतात असा दावा स्पेसेक्स कडून करण्यात आलाय.

मुख्य म्हणजे स्टारशिप हे संपूर्णपणे रियूजेबल रॉकेट आहे . स्वतः मस्क यांनी याबद्दल माहिती दिली आहे. स्टारशिप रियूजेबल असल्यामुळे अंतराळात गेल्यानंतर ते पुन्हा पृथ्वीवर आणून त्याला रिलॉन्च केलं जाऊ शकतं .त्यामुळे रॉकेट बनवण्यासाठी येणारा कोट्यावधींचा खर्च कमी होऊ शकतो असा मस्क यांचा दावा आहे .so

सध्या मंगळावर उतरण्यासाठी प्रति टन एक अब्ज डॉलर चा खर्च येतो .हा खर्च कमी करून एक लाख डॉलर पर्यंत आणणं गरजेचं आहे आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी दहा हजार पट सुधारणं आवश्यक आहे. हे कठीण असलं तरी अशक्य नाही असंही Elon Musk यांनी म्हटलंय. त्यामुळे स्टारशिप मुळे मंगळावर जाण्यासाठी लागणारा खर्च कमी होऊ शकतो असं सांगितलं जातंय.

स्टारशिप मुळे मंगळावर जाण्याचा खर्च कमी होण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यासाठी लागणार इंधन स्टारशिप मध्ये रॅप्टर इंजिनचा वापर करण्यात आलाय .या इंजिनमध्ये लिक्विड मिथेन आणि लिक्विड ऑक्सिजनचा वापर केला जातो. तसेच या इंजिनाचा पुन्हा एकदा वापर करणं शक्य आहे. स्टार शिपच्या सुपर हेवी बुस्टर मध्ये एकूण 33 रॅप्टर इंजिन्स तर स्टारशिप स्पेसक्राफ्ट मध्ये तीन रॅप्टर इंजिनचा वापर करण्यात आलाय .so

त्यामुळे स्टारशिप साठी   येणारा खर्चही कमी होतो. मंगळावर जाण्यासाठी लागणारा प्रति व्यक्ती खर्च हा 37 लाखांपर्यंत असेल असंही सांगितलं जातंय . याच सगळ्या कारणांमुळे पुढच्या 20 वर्षात मंगळावर मानवी शहर तयार करणं शक्य होईल असा दावा मस्क यांच्याकडून करण्यात आलाय . आता मुद्दा येतो तो मंगळावर मानवी वसाहत निर्माण करणं खरंच शक्य आहे का ? 

यासाठी आपल्याला मंगळ ग्रह आणि पृथ्वी यांचा तुलनात्मक अभ्यास करावा लागतो .आता मंगळावरच वस्ती करण्याचा हट्ट का केला जातो.  याचं उत्तर बघायचं झालं तर पृथ्वी आणि मंगळामधलं अंतर हे 140 दशलक्ष माईल इतकं आहे. त्यामुळे मंगळ ग्रह हा पृथ्वीचा
 सगळ्यात जवळचा शेजारी मानला जातो.so

Elon Musk : पृथ्वीच वातावरण आणि बाकीच्या ग्रहच वातावरण

इथे पृथ्वीपेक्षा सूर्यप्रकाश कमी पोहोचत असला तरी इतर ग्रहांपेक्षा तिथे सूर्यप्रकाश जास्त आहे. त्यामुळे तिथे माणसाला अन्नासाठी लागणाऱ्या वनस्पतींची वाढ केली जाऊ शकते. पण पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीच्या वातावरणात 78% नायट्रो आणि 21% ऑक्सिजन वायू आहे .पण मंगळावरच्या वातावरणात सुमारे 95% कार्बन डायऑक्साईड आहे जो माणसासाठी सगळ्यात घातक आहे.

ज्या ऑक्सिजन मुळे आपण पृथ्वीवर जिवंत राहू शकतो त्या ऑक्सिजनचं प्रमाण मंगळावर फक्त 013% इतकंच आहे .त्यामुळे हा ऑक्सिजन माणसांसाठी अपुरा आहे. तसंच सूर्यापासून
 येणाऱ्या घातक किरणांना पृथ्वीप्रमाणे मंगळ ग्रह रोखू शकत नाही. त्यामुळे मंगळावर कॅन्सर सारखे असंख्य आजार माणसांना होण्याची भीती ही वर्तवली जाते .so

तसंच मंगळावर पृथ्वीच्या 38 टक्के गुरुत्वाकर्षण आहे .त्यामुळे मानवी शरीराच्या रचनेनुसार मंगळावर सर्वाइव करणं कठीण आहे. त्यामुळे स्पेसेक्स आपलं मिशन मंगळ आखलं असलं तरी गेल्या काही वर्षांपासून ते पुढे ढकललं जात असल्याचं सांगण्यात येतंय . आता पुन्हा एकदा   Elon Musk यांनी मंगळावर शहरी वसाहत तयार करणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे या मिशन मध्ये स्पेस एक्स खरंच यशस्वी होणार का?so

पुढच्या 20 वर्षात मंगळावर शहर उभारणं खरंच शक्य आहे का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या