अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने 17 सप्टेंबरला राज्यभरात गणपती बाप्पांचे विसर्जन पार पडलं . मुंबईत बुधवारी दुपारी 11-12 पर्यंत सार्वजनिक मंडळांच्या Ganpati Visarjan झालं .पुण्यात दुपारी चार वाजेपर्यंत तब्बल 30 तास विसर्जन सुरू होतं. पण विसर्जनाला गालबोट लागणाऱ्या काही घटनाही घडल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा : Lebanon Pager Attack : मूळे 9 जणांचा मृत्यू,
हेही वाचा : Mumbai Cha Raja : Ganesh Galli च्या उंच मूर्तीचा भारतात पहिला मान जाणून घ्ज्ञ संपूर्ण इतिहास
Ganpati Visarjan : बुलढाणा आणि भिवंडीत विसर्जन मिरवणुकी वेळी दगड फेक
बुलढाणा आणि भिवंडीत विसर्जन मिरवणुकी वेळी दगड फेकीच्या घटना घडल्यामुळे इथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं . बुलढाण्यातल्या जळगाव जामोद इथे झालेल्या दगडफेकीमुळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक आहे. त्याच जागी थांबवली जोपर्यंत दगडफेक करणाऱ्या दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मिरवणूक सुरू करणार नसल्याची भूमिका या मंडळांनी घेतली.so
भिवंडीमध्येही दोन गटांमध्ये वाद झाल्यामुळे दगडफेक झाल्याची माहिती मिळते त्यामुळे या दोन्ही ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले. बुलढाणा आणि भिवंडीमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या वेळी नक्की काय घडलं ? त्याचीच माहिती जाणून घेऊयात .
17 सप्टेंबरला सकाळ पासूनच राज्यभरात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. मिरवणुकांसाठी अनेक ठिकाणचे रस्तेही बंद करण्यात आले होते . मिरवणुकांना भाविकांनी मोठी गर्दी केली होती . पण बुलढाण्यातल्या शेगाव आणि जळगाव जामोद या दोन ठिकाणी विसर्जन मिरवणुकी वेळी एक अनुचित प्रकार घडला.so
बुलढाण्यातल्या शेगाव शहरात मिरवणुका शिवाजी चौकातून विसर्जनासाठी पुढे जात होत्या. त्यावेळी संध्याकाळी 5:30 सहा च्या सुमारास मिरवणुकीत दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाले .या वादामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं . याच दरम्यान जमावातून मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक करण्यात आली . या दगडफेकीत मूर्तीचही नुकसान झाल्याची माहिती काही स्थानिक पत्रकारांनी दिली आहे.
त्यामुळे हे वातावरण आणखीनच चिघळलं .पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मिरवणूक पुढे जाणार नाही अशी भूमिका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली.so
सगळ्या प्रकारामुळे तब्बल तीन तास शेगाव मधली गणेश मंडळ शिवाजी चौकातच थांबून राहिली होती . काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला . पोलिसांकडून मंडळाची समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात येत होते पण कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
पोलिसांकडून मंडळाला दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं. आणि त्यानंतर शेगाव मधील शिवाजी चौकातून विसर्जन मिरवणुका पुढे सरकल्या पण यामुळे तब्बल तीन ते साडेतीन तास विसर्जनाचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे शेगाव मधली ही घटना ताजी असतानाच बुलढाण्यातील जळगाव जामोद मध्ये रात्री अजून एक घटना घडली.so
Ganpati Visarjan : जळगाव जामोद मधील घटना
जळगाव जामोद मध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका चौभारा वायली वेस स्टेट बँक चौक इथून विसर्जनासाठी जात होत्या. रात्री 8:30 नऊ वाजता काही मंडळं वायली वेस्ट परिसरातून जात होती .मिरवणुकीत सगळेजण ढोल ताशाच्या तालावर नाचत होते.. त्याच वेळी अचानक या परिसरातले लाईट गेले तेव्हा मिरवणुकीतल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
हे सगळं होत असताना आज एका इमारतीच्या खिडकीतून काही जणांनी Ganpati Visarjan मिरवणुकीच्या दिशेने दगड विटा फेकायला सुरुवात केली .त्यामुळे मिरवणुकीतले लोक चांगलेच संतापले. त्यांच्याकडूनही प्रत्युत्तर दाखल या इमारतीच्या दिशेने दगड फेक करण्यात आल्याचं सांगण्यात आलं .या दगड फेकीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला .so
यामुळे वायली वेस परिसरात एकच पळापळ आणि धावपळ सुरू झाली .तेव्हा काही जणांचा जमाव समोरासमोर आल्यामुळे हा वाद आणखीनच चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चार्जही केला. पण जमाव ऐकत नसल्यामुळे पोलिसांनी हवेत प्लास्टिकच्या गोळ्या झाडल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे.so
वायली वेळेस परिसरात झालेल्या दगडफेकीत तीन पोलीस आणि मिरवणुकीतील काही भाविकही जखमी झाले परिसरातल्या गाड्यांचही दगडफेकीमुळे नुकसान झालं. तर काही जणांनी गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती स्थानिक पत्रकारांकडून देण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारानंतर जळगाव जामोद मधल्या 15 गणेशोत्सव मंडळांनी आक्रमक भूमिका घेतली.
जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत विसर्जन मिरवणूक जागेवरून हलणार नसल्याचं मंडळांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव जामोद विधानसभेचे भाजपा आमदार संजय कुटे ही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या सगळ्या प्रकाराची पोलीस आणि लोकांकडून माहिती घेतली .so
त्यावेळी पोलिसांकडून दोन समाजांमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी शांतता कमिटीच्या बैठकीचं आवाहन करण्यात आलं. तेव्हा आमदार कुटेंनी ही आपली भूमिका मांडली. ज्यांनी कारण नसताना दगडफेक केली आणि ज्या पद्धतीने केली त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत शांतता कमिटीच्या बैठकीला कोणताही अर्थ नसल्याचं कुटे यांनी म्हटलं .त्यामुळे जोपर्यंत दोषींना पकडून पोलीस कारवाई करत नाही तोपर्यंत एकाही सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन न करण्याचा पवित्रा जळगाव जामोद मधल्या 15 गणेशोत्सव मंडळांनी घेतला.
Ganpati Visarjan : ठाणे जिल्ह्यातल्या विसर्जन मिरवणुकीलाही गालबोट
विसर्जनाला 30 तास झाल्यानंतरही हा व्हिडिओ शूट होईपर्यंत जळगाव जामोद मध्ये विसर्जन सुरू झालं नसल्याची माहिती मिळते . त्यामुळे विसर्जन पुन्हा सुरू करण्यासाठी पोलिसांकडून
प्रयत्न करण्यात येत आहेत .आता बुलढाण्यातल्या शेगाव आणि जळगाव जामोद मध्ये ही तणावाची परिस्थिती असताना मंगळवारी रात्री ठाणे जिल्ह्यातल्या विसर्जन मिरवणुकीलाही गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं.so
भिवंडीतल्या घुंगट नगर परिसरातली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती रात्री कामवारी नदीकडे विसर्जनासाठी जात होती . रात्री एक च्या सुमारास या मिरवणुकीवरही दगडफेक झाल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली. या दगडफेकीत मूर्तीचं नुकसान झाल्याची माहिती ही काही माध्यमांनी दिली आहे.
त्यामुळे इथल्या मंडळांनीही विसर्जन मिरवणूक जागेच थांबवली. भिवंडीतल्या वंजारवट्टी नाका
परिसरात ही घटना घडली. मिरवणूक वंजारवट्टी नाक्यावरून जात होती त्याच वेळी दुसऱ्या गटाबरोबर शाब्दिक बाचाबाची आणि वादावादी झाली. दुसऱ्या बाजूच्या काही मुलांनी मिरवणुकीवर दगडफेक केल्याचा आरोप झाला .so
त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी गोंधळ घातला संतप्त जमावानं दुसऱ्या गटाच्या एका युवकाला पकडलं त्याला भरपूर मारल्याचंही सांगण्यात येतंय. तिथे आलेल्या पोलिसांनी जमावापासून युवकाची सुटका केल्याची माहिती मिळते .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात काही मुलांची बाचाबाची झाली त्यामुळे एकच गोंधळ उडाला. आणि पळापळीला सुरुवात झाली.
मंडळाचे कार्यकर्ते चौकात थांबले होते . दुसऱ्या बाजूनेही जमाव जमायला सुरुवात झाली आणि दोन्ही जमाव एकमेकांच्या समोर आल्यानं वातावरणात तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठी चार्ज करावा लागला. मध्यरात्री अडीच पर्यंत ही विसर्जन मिरवणूक पुढे गेली नसल्यामुळे रात्रभर भिवंडीत संतापाचं वातावरण होतं.
घटनास्थळी भाजपा आमदार महेश चौगुले यांनी भेट दिली . तसेच यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्याचंही काही माध्यमांकडून सांगण्यात आलंय. बुधवारी ईद निमित्त कोणताही चुकीचा प्रकार घडू नये म्हणून परिसरात पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात आलाय .
आता वातावरण शांत असल्याचं सांगण्यात येतंय . यामुळेच भिवंडी आणि बुलढाण्यात घडलेल्या या घटनांमुळे Ganpati Visarjan ला गालबोट लागल्याचं बोललं जातंय. या प्रकरणामध्ये पोलीस नक्की काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.
या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा
0 टिप्पण्या