सध्या ऐकावं ते नवलच अशा अनेक बातम्या प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत . त्यातीलच एक बॉडीबिल्डिंग क्षेत्राला हादरा देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे .त्याचं झालंय असं की जगातला सगळ्यात राक्षसी बॉडीबिल्डर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या Illia Golem येचिक याचं नुकतंच निधन झालंय . वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी 6 सप्टेंबर रोजी घरीच त्याला हृदय विकाराचा झटका आला. पुढे दवाखान्यात नेईस तोवर तो कोमात गेला आणि काही दिवसांनी त्याला मृत्यू आला मंडळी गेल्या बऱ्याच दिवसात बॉडीबिल्डिंग क्षेत्रातल्या अनेकांचा अकाली दुर्दैवी मृत्यू
हेही वाचा : मध्ये रात्री Pune, Satara, Baramati फिरणाऱ्या Drone चं रहस्य नेमकं काय ?
झाल्याच्या घटना पाहण्यात आल्यात.so
त्यामुळे नेमकं कशामुळे त्यांचा मृत्यू होतोय या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न सध्या तज्ञ करतायत. म्हणूनच या प्रश्नांची देखील उत्तर आपण त्याआधी इलिया गोलेमिचिक याची बॉडीबिल्डिंग कारकीर्द कशी राहिलेली आहे. त्याचा अचानक मृत्यू कसा काय झाला हे देखील आपण जाणून घेणार आहोत .so
Illia Golem : ईतिहास
इलिया गोलेम एफिम चिक राक्षसी खाणं आणि त्याचा राक्षसी व्यायाम सुद्धा म्हणजे त्याच्या खाण्याला आणि व्यायामाला लिमिटच नाही . इलिया गोलेम एफिम चिक याला बॉडीबिल्डिंग क्षेत्रात द म्युटंट या शॉर्ट नावाने देखील ओळखतात. तुम्हाला ऐकून धक्का बसेल दररोज 16500 कॅलरीजचा आहार घ्यायचा . म्युटंटचे बायसेप्स हे तब्बल 25 इंचांचे होते,\. तर छाती ही तब्बल 61 इंचाची होती .
म्युटंट त्याच्या आहारात दररोज अडीच किलो मटन खायचा. बरं नुसतं खायचा नाही तर तितका व्यायाम करून ते मटन पचवायचं देखील. दिवसातून सात वेळा जेवणारा म्युटंट 100 पेक्षा जास्त सुशीचे पिसेस खायचा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही सुशी काय भानगड आहे ?
तर सुशी एक जापनीज डिश आहे . या अशा तगड्या आहारामुळे त्याची तब्येत देखील तगडीच होती . पण त्याचं हे शरीर पुढे जाऊन Illia Golem च्या मृत्यूचं कारण कधी बनलं. हे त्याचं त्यालाच कळालं नाही म्हणजे म्युटंट व्यायामा दरम्यान 600 पाऊंड म्हणजे तब्बल 272 kg वजन उचलायचा. तसेच 700 पाउंडचं डेडलिफ्ट सुद्धा करायचा.
खरं तर कोणत्याही व्यावसायिक स्पर्धेत सहभाग घेतला नाही तरीही तो चांगला चर्चेत असायचा. कारण म्युटंटचे instagram वर तब्बल तीन लाखाहून अधिक फॉलोवर्स होते. त्याचे व्यायाम करतानाचे व्हिडिओज जगभर पाहिले जायचे .लहानपणापासून म्युटंटला व्यायाम करायची आवड होती . त्याला अर्नोल्ड आणि सिल्वेस्टर स्टेलॉन या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डरांसारखं बनायचं होतं म्हणूनच लहानपणापासूनच त्यानं त्याचा आहार तगडा ठेवला होता.so
त्यामुळे मृत्यूळी देखील Illia Golem चं वजन तब्बल 158 kg इतकं होतं .तर उंची 6 फूट एक इंच इतकी होती. तर बघा समोर आलेल्या अहवालानुसार म्युटंटला त्याच्या घरीच हृदय विकाराचा झटका आला .त्याची पत्नी एनाने छातीवर दाब देऊन सीपीआर देण्याचा प्रयत्न केला पण तो कोमात गेला होता.so
Illia Golem ला हेलिकॉप्टरने दवाखान्यात नेण्यात आलं. त्यावेळच्या एकूण परिस्थितीबद्दल सांगताना त्याची बायको म्हणाली की मी प्रत्येक दिवस त्याच्या शेजारी आशेने घालवत होते .त्याचं हृदय दोन दिवसांपासून पुन्हा धडधडायला देखील लागलं होतं . पण डॉक्टरांनी मेंदू मृत झाल्याची भयानक बातमी दिली .
Illia Golem : मृत्यूची कारणे
सांगायचा मुद्दा असा की सुप्रसिद्ध बॉडीबिल्डरांच्या मृत्यूची अशी एकच घटना नाहीये तर गेल्या वर्षभरात अनेक नामांकित बॉडीबिल्डर आपल्याला फार कमी वयातच त्यांच्या बॉडी बनवण्याच्या
चुकीच्या पद्धतींमुळे सोडून गेलेत. म्हणजे म्युटंटच्या मृत्यूपूर्वी 34 वर्षांच्या ब्रिटिश बॉडीबिल्डर नील करी आणि 26 वर्षांच्या ब्राझीलच्या अँटोनिया सौजा यांचेही मृत्यू झाले होते.
बीबीसीआय वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार करीचा मृत्यू हा सप्टेंबर 2023 मध्ये झाला होता. आणि त्याच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार करीने बॉडीबिल्डिंग साठी स्टेरॉइडचा अतिवापर केला होता. दुसऱ्या बाजूला एका स्पर्धेत पहिल्या तीन मध्ये स्थान मिळाल्यानंतर 3 ऑगस्ट 2024 म्हणजे आत्ताच रोजी फक्त 26 वर्षीय वय असलेल्या अँटोनिया सौजा याचा देखील हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय.so
बर फक्त दोन नाव नाही तर अशी बरीच नाव आहेत पण वेळेखातर आपण ही दोन नाव प्रातिनिधिक स्वरूपात उदाहरण म्हणून घेत आहोत. पण एकूणच बघायला गेलं तर तरुण आणि फिटनेस प्रेमी असून देखील अशा लोकांचे मृत्यू होत आहेत.so
हे खरोखरच धक्कादायक आहे. आता हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचा आजार हा पूर्वी वृद्ध लोकांचा आजार मांडला जायचा. मात्र आता तर अगदी लहान मुलांचा देखील मृत्यू हृदय विकारामुळे झाल्याचा समोर आलाय. पण बॉडीबिल्डरांचे असे अचानक मृत्यू होण्यामागचे नेमकी कारणं काय आहेत आणि तज्ञांचं याबाबतीतलं काय मत आहे हे ? आता आपण पाहूयात.
हार्ट हे मृत्यूच प्रमुख कारण
बॉडीबिल्डरांच्या मृत्यूचा जर बारकाव्याने अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की बऱ्यापैकी जणांची मृत्यू हे हार्ट फेल्युअर लिव्हर फेल्युअर किडनी फेल्युअर या कारणांमुळे झाले. मग असं का होतं तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे बॉडी लवकर आणि चांगली सुधरावी यासाठी घेतली जाणारी अनाबॉगिक स्टेरॉइड.so
तज्ञांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला ह्या स्टेरॉइड्स मुळे नक्कीच चांगली बॉडी बनवता येईल पण त्यासोबत डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा विशिष्ट प्रमाणामध्ये या स्टेरॉइडचा वापर तुम्ही करत नसाल म्हणजेच स्टेरॉइड्सचा
तुम्ही अतिवापर करत असाल तर मग तुम्हाला हृदय विकार होण्याचे चान्सेस वाढतात.so
आता तुम्ही म्हणाल असं का म्हणताय तर त्याची कारणं देखील तशी आहेत म्हणजे बॉडी बिल्डर्स जे स्टेरॉइड्स घेतात ते जर अतिप्रमाणात त्यांच्याकडून घेतले गेले तर त्याचे भयानक दुष्परिणाम आहेत.so
कारण जास्त प्रमाणात घेतलेले स्टेरॉइड्स डायरेक्ट तुमच्या हार्मोनल सिस्टीम वरती आघात करतात . तुमच्या गुड फॅट्सला कमी करून तुमचं इंटरनल फॅट वाढवतात .त्यांना कॅन्सर ह्युमर हार्ट अटॅक असे रोग तर हमखास होतात.so
शिवाय लिव्हर किडनी आणि हार्ट फेल्युअर देखील होतात आता या व्यतिरिक्त स्टेरॉइडचे बरेच
दुष्परिणाम आहेत. बॉडीबिल्डरांच्या या मृत्यू मागे नेमकी कोणती कारण असावीत हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
0 टिप्पण्या