30 जुलैचा दिवस मनसे विरुद्ध अमोल मिटकरी राड्याने चांगलाच गाजला होता .मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता. त्यांनी फ्लोर ब्लॉक आणि कुंड्या फेकून गाडीच्या काचा फोडल्या होत्या. हल्ल्याच्या वेळी गाडीत अमोल मिटकरी नसल्याने सुदैवाने यातून ते बचावले होते .पण हल्ल्यानंतर घटनेला वेगळं वळण मिळालं मिटकरींच्या गाडीवर हल्ला करण्यासाठी आलेला मनसैनिक Jai Malokar याचा मृत्यू झाला होता.
हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. पण आता जवळपास 50 दिवसांनी जय मालोकर याचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय. यात जयचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्यानं नव्हे तर मारहाणीमुळे झाल्याचं समोर आलंय.so
हेही वाचा : One Nation One Election मुळे ग्रामपंचायंत, महानगरपालिका, निवडणुकीचं काय होणार ? 10 प्रश्नांची उत्तरं
शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज टू व्हायटल ऑर्गन्स असं डॉक्टरांनी मृत्यूचं कारण दिलंय. पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जय मालोकर सोबत घातपात घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
एक्सटर्नल लिंक : जय मालोकर
पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये नेमकं काय म्हटलंय? संशय काय व्यक्त केला जातोय. या सगळ्यावर अमोल मिटकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्याच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.so
Jai Malokar चा मृत्यू पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये काय म्हटलंय ?
जयचा मृत्यू अनैसर्गिक कारणामुळे झाल्याचं रिपोर्ट मध्ये म्हटलंय. पाठीवर छातीवर डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाल्याने जयचा मृत्यू झाला. मारहाणीत जयच्या छातीच्या डाव्या बाजूची पाच सहा आणि सात क्रमांकाची बरगडी फ्रॅक्चर झाली आहे.so
उजव्या बाजूच्या एक ते चार क्रमांकाच्या बरगडीला देखील इजा झाल्याचं रिपोर्ट मध्ये म्हटलंय. डोक्याला सुद्धा गंभीर मारहाण झाली आहे. दोन्ही भुवयाच्या मध्यभागी डोक्याला आतून दुखापत झाली आहे. डाव्या कानाच्या वरची बाजू देखील डॅमेज झाली आहे.
मारहाणीमुळे झालेल्या रक्ताच्या गाठी आढळल्यात. पोस्टमार्टम वेळी मेंदूवर सूज आल्याचं देखील दिसून आलं. त्यामुळे मेंदूचं वजन वाढलं होतं. दोन्ही हात आणि मानेवर सलाईन लावल्यामुळे इजा झाल्याच्या खुणा आढळल्यात वैद्यकीय ट्रीटमेंट मुळे अशा इजा होतात असं देखील पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये म्हटलंय.so
शक्यतो तीक्ष्ण टोक नसलेल्या वस्तूने किंवा लाकडी काठीने मारहाण झाल्यामुळे या इजा झाल्या असाव्यात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. जयच्या शरीरात आतून ज्या इजा झाल्यात त्या सगळ्या इजा ताज्या आणि जयच्या मृत्यूपूर्वी झाल्याचं देखील पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये
म्हटलंय .
पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर अजित पवार गट आणि मनसेमध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. जय मालोकर याचा भाऊ विजय मालोकर यांनी देखील आपल्या कुटुंबाला धोका असल्याचं म्हटलंय. संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी जिथे ही घटना घडली तिथले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावेत .so
जय सोबत नक्की काय घडलं हे समोर आणावं. जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा होत नाही तोपर्यंत आमच्या कुटुंबाला सुरक्षा द्यावी अशी मागणी विजय मालोकर यांनी केली आहे. दुसरीकडे या प्रकरणावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी देखील चांगलेच आक्रमक झालेत .
मृत्यूच्या आधी जय कुणासोबत होता त्याच्यासोबत कोण कोण होतं या सगळ्यांचे सर्वांचे कॉल डिटेल्स चेक करा. आणि जयला न्याय द्या अशी मागणी मिटकरींनी केली आहे. मिटकरींच्या या मागणीमुळे जयला मारहाण कुणी केली का केली ?so
मिटकरींच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाली नसेल तर मग त्याला कुणी मारलं मनसे मधल्या सहकाऱ्यांनी जयला मारहाण केली का मनसे विरुद्ध मिटकरी हवा तापवण्यासाठी जयचा बळी दिला का ? असा संशय व्यक्त केला जातोय.
Jai Malokar : मनसे विरुद्ध मिटकरी हा राडा का झाला होता ?
या सगळ्या प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे. पण मनसे विरुद्ध मिटकरी हा राडा का झाला होता ? यामागचं नेमकं काय कारण होतं ते देखील पाहूयात. तर बुधवारी 25 जुलैला वांद्रे येथल्या रंगशारदा सभागृहात मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला होता .so
या कार्यक्रमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या पूर परिस्थितीवरून अजित पवार यांच्यावर टीका केली होती .त्यावेळी मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण भरलं होतं .तेव्हा महानगरपालिका प्रशासनाने रात्रीच धरणाचे दरवाजे उघडले त्यामुळे पुणे पुण्यातल्या सखल भागात पाणी साचलं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं.
यावरून राज ठाकरे यांनी अजित पवार पुण्यात नसताना धरण कसं वाहिलं अशी खोचक टीका केली होती .अजित पवारांनी दहा वर्षांपूर्वी धरणावरून वादग्रस्त विधान केलं होतं हेच विधान धरून राज ठाकरेंनी अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला.so
या टीकेनंतर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरू झाला होता. राज ठाकरेंनी केलेल्या या टीकेनंतर अमोल मिटकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत राज ठाकरेंना प्रति उत्तर दिलं होतं राज ठाकरेंची विश्वासार्ह संपली आहे.
त्यांना कुठल्याही आंदोलनात यश आलं नाही .इतिहासातील सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजित पवारांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे सूर्याला वाकोल्या दाखवण्यासारखं आहे अशी टीका त्यांनी केली होती. यावेळी मिटकरींनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारी बहादर असा देखील केला .so
यावरून मनसे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मनसेचे प्रवक्ते गजानन काळेसह इतर नेत्यांनी देखील मिटकरी यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती. हा वाद इतका वाढला होता की संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता .
30 जुलैला अमोल मिटकरी अकोल्यातल्या शासकीय विश्रामगृहात शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आले होते. त्यावेळी अकोल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांच्यासह काही मनसैनिकांनी थेट विश्रामगृहात प्रवेश केला . त्यांनी मिटकरींना घेरण्याचा प्रयत्न केला .so
यावेळी शिवीगाळ झाल्याचं आणि घोषणाबाजी केल्याचे विविध व्हिडिओ समोर आले होते. मनसैनिक आणि अमोल मिटकरींचे कार्यकर्ते समोर आल्यानं बराच काळ अकोल्यातल्या शासकीय विश्रामगृहात तणावाचं वातावरण होतं .
Jai Malokar चा सहभाग : अकोल्यात मनसैनिक आणि अमोल मिटकरींचे कार्यकर्ते समोर
आता ज्या मनसैनिकांनी विश्रामगृहात प्रवेश केला होता त्यात मनसे विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष Jai Malokar देखील होता.
या राडाचे जे व्हिडिओ व्हायरल झाले त्यात तो इतर कार्यकर्त्यांसह दिसत होता मनसैनिक
विश्रामगृहात शिरल्यानंतर मिटकरी समर्थक आणि मनसैनिकांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की देखील झाली होती. पण यात कुणीही तसं गंभीर जखमी झालं नव्हतं.so
पण संतप्त मनसैनिकांनी यावेळी विश्रामगृहाबाहेर असलेल्या मिटकऱ्यांच्या गाडीवर हल्ला केला. कुंडी आणि दगड फेकून त्यांनी मिटकरींच्या गाडीच्या काचा फोडल्या होता. या सगळ्या राड्यांनंतर मिटकरींनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केला होता .
मनसैनिकांनी शस्त्र होती . चाकू गुप्ती वगैरे त्यांच्याकडे होत्या. माझं घर देखील पेटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण माझ्या घरच्यांच्या जीवावरच संकट माझ्यावर आलं असं मिटकरींनी
म्हटलं होतं. तसंच त्यांनी अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये ठिया आंदोलन देखील केलं होतं .so
जोपर्यंत आरोपी मनसे कार्यकर्त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर पोलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि जय मालोकर सह एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल केला होता . तेव्हा सगळे आरोपी फरार झाले होते.
त्यात जय Jai Malokar चा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. तेव्हा जयचा भाऊ विजय मालोकरनं आपल्या भावाच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला होता. 23 वर्षाच्या तंदुरुस्त असलेल्या भावाला हृदय विकाराचा झटका कसा आला असा प्रश्न त्यांनी विचारला होता.so
आता विजयचा संशय खरा ठरताना दिसतोय पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये जयचा मृत्यू हृदय विकारामुळे नाही तर मारहाणीमुळे झाल्याचं निष्पन्न झालंय. राजकीय राड्यात एका 23 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्यानं आता विविध प्रश्न निर्माण झालेत. या सगळ्यावर आता पोलीस प्रशासन काय पावलं उचलणार कोणावर कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे ठरणार आहे.
मनसे विरुद्ध मिटकरी राडा आणि त्यात जय मालोकरचा झालेला मृत्यू या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून
नक्की सांगा
0 टिप्पण्या