17 सप्टेंबर पासून मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा उपोषण पुकारले जरांगेनी पुकारलेले. Maratha-OBC हे सहावं आमरण उपोषण आहे. यावेळी जरांगेंनी उपोषणाला बसताना विधानसभा निवडणुकी आधी सरकारला शेवटची संधी असल्याचं सांगत जरांगेंनी जर मागण्या मान्य झाल्या नाही तर फडणवीसांसह भाजपला गुडघे टेकवायला लावणार असा इशारा देखील दिलाय.
तर दुसरीकडे वडी गोदरी येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषणाला बसलेत. त्यामुळे या दोघांनी पुकारलेल्या उपोषणामुळे सरकारची मात्र चांगलीच कोंडी झाली. अशातच मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काही मराठा आंदोलक वडी गोदरेतून अंतर्व सराटेकडे निघाले होते.so
पण वडी गोदरी या गावात पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलं. अंतर्वकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरीगेटिंग करण्यात आलं होतं. यावेळी Maratha-OBC आंदोलक आमनेसामने आले तेव्हा दोन्ही बाजूच्या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .
हेही वाचा : Maratha Reservation Hyderabad Gazette : CM शिंदे हैदराबाद गॅझेट लागू करणार ?
त्यामुळे वडी गोदरी येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. इकडे जारांग्गे पाटलांची इडी चौकशी करण्याची मागणी ओबीसी आंदोलक करतायत . पण नेमका मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये तणाव कशामुळे निर्माण झाला ? जरांगे यांनी उपोषण
एक्सटर्नल लिंक ;वडी गोदरी येथे नेमका काय गोंधळ झाला?
पुकारल्यापासून नेमकं काय घडलं ? ही सगळी माहिती पाहूयात .so
Maratha-OBC : वडी गोदरी येथे नेमका काय गोंधळ झाला ?
सर्वात आधी बघूयात नेमका वडी गोदरी येथे काय गोंधळ झाला. मनोज जरंगे पाटील 17 सप्टेंबर पासून अंतर्व सराटीत उपोषणाला बसलेत. तर अंतरवाली पासून जवळच वडी गोदरी येथे लक्ष्मण हाके. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेत. अशातच शुक्रवारी रात्री काही मराठा आंदोलक गाड्यांमधून अंतरवाली शराटीकडे चालले होते.
अंतरवाली सराटीकडे जाताना लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले वडी गोदरे हे गाव लागतं. त्यामुळे जर Maratha-OBCआंदोलक आमनेसामने आले तर तणावपूर्ण परिस्थिती ओढावू शकते. हे ओळखूनच पोलिसांनी मराठा बांधवांना लक्ष्मण हाके यांच्या आंदोलन स्थळापासून अंतरवाली सराटेत जाण्यास परवानगी नाकारली.so
मात्र तरीदेखील मराठा आंदोलकांनी त्याच ठिकाणावरून जाण्याचा निर्णय घेतल्याने पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरीगेड लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वडी गोदरी येथे मराठा बांधव आणि पोलिसांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर मराठा बांधवांनी जोरदार एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली .
त्याला प्रति उत्तर म्हणून ओबीसी आंदोलकांनी देखील घोषणाबाजी केली. त्यामुळे वडी गोदरी येथे ओबीसी आणि मराठा आंदोलकांच्यात वाद झाला. याबाबत मनोज जरांगे यांना समजताच ते चांगलेच आक्रमक झाले होते. 15 मिनिटात बॅरीगेटिंग काढा अन्यथा तेच बॅरीगेटिंग सागर बंगल्यापर्यंत फेकतो असा इशारा त्यांनी दिला होता .so
त्यानंतर रात्री मनोज जरांगे यांनी मंत्री दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई यांना फोन केला. त्यानंतर हे बॅरीगेटिंग हटवण्यात आलं आणि वडी गोदरे येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
हे झालं कालचं प्रकरण पण एकाच वेळी मराठा आणि ओबीसी आंदोलन सुरू
झाल्यानंतर नेमकं काय काय घडलंय? तर मनोज जरांगे यांनी आपल्या प्रमुख तीन मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषण पुकारलंय.
- मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा
- मराठ्यांच्या कुणबी नोंदीवरून सगळे सोयरांना देखील आरक्षण देण्याची अंमलबजावणी करा
- हैदराबाद सह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅजेट लागू करा.
या तीन मागण्यांसाठी ते अडून बसलेत. अन्यथा आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरू असा इशारा देखील त्यांनी दिला होता. मात्र त्यावर सरकारने काहीच दाद दिली नसल्याने आता जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि सरकारला शेवटची संधी देत आहोत.so
Maratha-OBC : जरांगे यांचा सारकरला इशारा, मागण्या पूर्ण कारा नाही तर ....
आमच्या मागण्या मान्य करून संधीचं सोनं करून घ्याव. नाहीतर गुडघ्यावर वाकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा इशारा देत जरांगे यांनी उपोषण पुकारलं होतं. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती.
यावेळी जरांगे यांची अवस्था बघून राजरत्न आंबेडकरांच्या डोळ्यात पाणी आल्याचं बघायला मिळालं होतं. याशिवाय आंबेडकरांनी सरकारकडे न्याय देण्याची मागणी देखील केली होती/ हे सगळं घडत असताना शुक्रवारी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता.so
मनोज जरांगे यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर पोहोचले. तरी जरांगे यांची शुगर 85 असल्याचं डॉक्टरांना आढळलं. यावरून जरांगे यांनी डॉक्टरांना पहिल्या दिवशी शुगर ही 71 असताना उपोषणाच्या चौथ्या दिवशी 85 कशी झाली .शुगर ही कमी व्हायला हवी होती ती वाढली कशी ?
असा प्रश्न केला. माझी तब्येत चांगली आहे हे सरकारला दाखवण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? असा आरोप करत सरकारचा ऐकून माझा गेम करू नका असा इशाराच मनोज दरांगे पाटील यांनी दिला होता. मात्र शुक्रवार जरांगे यांची तब्येत अधिकच बिघडल्याचं पाहायला मिळालं. सहकाऱ्यांचा आधार घेत ते चालताना दिसत होते.so
यावेळी ते स्टेज वरून खाली उतरताना अचानक खाली बसलेले पाहायला मिळाले. जरांगे यांची खालावत चाललेल्या तब्येतीमुळे अनेकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील मनोज जरांगे यांना फोन करून उपचार घेण्याची विनंती केली होती त्यानंतर जरांगे यांनी उपचार घेतले.
मध्यरात्री पावणे दोन वाजता मनोज जरांगे यांना डॉक्टरांकडून सलाईन लावण्यात आलं होतं. इकडे मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर नंतरच तिसऱ्याच दिवशी लक्ष्मण हाके यांनी देखील पुन्हा उपोषणाची घोषणा केली. 19 सप्टेंबरला लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करू नये, बोगस नोंदी द्वारे देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करा अशा विविध मागण्यांसह उपोषण पुकारलं .so
तीन दिवसांपासून लक्ष्मण हाके वडी गोदरी येथे उपोषणाला बसलेत. त्यांच्यासोबत ओबीसी समर्थक देखील आहेत. महत्त्वाचं म्हणजे अंतरवालीच्या वेशीवर आधीच ओबीसी आंदोलक मंगेश ससाने यांचे देखील उपोषण सुरू आहे .so
Maratha-OBC : वडी गोदरीमध्ये तानावाच वातावरण , आंदोलकांनी घोषणा दिल्या
यावेळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी हाके यांनी जरंगे पाटील हा बिग बॉस मध्ये शोभणारा माणूस आहे त्यापेक्षा त्याची लायकी जास्त नाही अशा शब्दात टीका केली होती. अंतर्वाली सराटीला जाण्याचा रस्ता वडी गोदरीतूनच जात असल्याने बहुतांश वेळा मराठा आंदोलकांच्या गाड्या याच गावातून अंतरवालीच्या दिशेने जातात.
त्यामुळे अनेक वेळा दोन्ही समाजाच्या आंदोलकांमध्ये संघर्ष रंगल्याचं पाहायला मिळते. थोडक्यात विधानसभेच्या तोंडावर मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनाचा वाद पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. त्यात मराठा आंदोलकांना अंतर्वाली सराटी येथे पोलिसांनी अडवल्याच्या प्रकाराबद्दल मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केलाय.so
मराठ्यांना अडवून शिवीगळ्या करणाऱ्या पोलिसाला निलंबित करण्याची मागणी मनोज
जरांगे यांनी केली आहे. वडी गोदरीतून येताना शांत या धनगर समाजासोबत आपल्याला कायम एकत्र राहायचंय, भांडण करू नका, तेथे घोषणाबाजी करू नका असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलंय.so
मराठ्यांना वडी गोदरीत अडवाल तर गेट उचलून फेकून देईल, अडवणाऱ्या पोलिसाला आऊट करून टाकीन, एकाही मराठ्याला अडवायचं नाही आम्ही आमचं बघून घेऊ इकडे बसून गोरगरिबांच्या मारामाऱ्या लावायच्या आहेत का ? त्या देवेंद्र फडणवीसांना, छगन भुजबळांना दंगली घडवायच्या का ? उपोषणापुढे उपोषण नसतं तरी तुम्ही परवानग्या दिल्याच कशा ? अशी टीका मनोज झरांगे यांनी केली आहे ..so
त्यामुळे शुक्रवारी वडी गोदरी परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. त्यानंतर शनिवारी देखील ओMaratha-OBC आंदोलक आमनेसामने आले होते .जालना येथे आंदोलकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तर मराठा आंदोलकांनी पुन्हा घोषणा दिल्याचा प्रकार घडला.
त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांची समजूत घालण्यासाठी मध्यस्थी केली. मात्र यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्यात शाब्दिक चकमक रंगल्याचं पाहायला मिळालं .या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या पोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकांनी बीड बंदची हाक दिली आहे.so
यावेळी आजचा बंद शांततेत पार पडेल असं आश्वासन जरांगे समर्थकांनी दिलंय. मात्र तरीदेखील बीडमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. बीड सोबत धाराशिव मध्ये देखील मराठा आंदोलकांनी बंदची हाक दिली आहे.so
तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी साठी ब्लॉगला भेट देत चला
0 टिप्पण्या