मुंबईतल्या गणेशोत्सवाचा नेहमीच वेगळा थाट असतो. गणेशोत्सवातल्या मूर्तींची उंची विसर्जनाच्या मिरवणुकींना होणारी गर्दी . त्यामुळे मुंबईतल्या गणेशोत्सवाची नेहमीच चर्चा होते. मुंबईतल्या कित्येक सार्वजनिक गणपती बाप्पांचा अनेक वर्षांचा इतिहास राहिलाय. त्यातलाच एक म्हणजे मुंबईच्या गणेश गल्लीतला Mumbai Cha Raja . यावर्षी मुंबईच्या राजाचं 97 व वर्ष आहे. दरवर्षी वेगवेगळ्या थीमची सजावट हे मुंबईच्या राजाचे वैशिष्ट्य . पण त्यासोबतच फक्त मुंबईत नाही तर संपूर्ण भारतातल्या गणरायाच्या सगळ्यात पहिल्या उंच मूर्तीचा मानही या गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजालाच जातो. त्यामुळे मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवात मुंबईच्या राजाला मानाचं स्थान आहे.so
हेही वाचा : Maharashtra Vidhansabha Elections
मुंबईच्या राजाचा इतिहास राजाच्या मूर्तीची उंची मंडळाचे वेगवेगळ्या थीमचे देखावे याचीच माहिती या जाणून घेऊयात.
Mumbai Cha Raja : इतिहास
मुंबई आणि मुंबईतल्या कापड गिरण्या हे खूप जुनं समीकरण. दाटीवाटी न वाढणाऱ्या मुंबई त्या काही कापड गिरण्यांच जाळ पसरलं होतं याच कापड गिरण्यांचं मोठं हब असलेल्या लालबाग परच्या परिसराची गिरणगाव अशीच ओळख निर्माण झाली. होती गिरण्यांमधून मोठा रोजगार उभा राहिल्यानं गिरणीत काम करण्यासाठी कोकणातला मराठी मध्यमवर्गीय माणूस मुंबईत आला. आणि गिरणी कामगार झाला.so
लालबाग परस शिवडी वरळी अशा मध्य मुंबईतल्या खोली दीड खोल्यांमध्ये गिरणी कामगारांनी संसार थाटले . लालबागच्या पेरूळ मोगल मिल कंपाउंड इथे मराठी माणसांची दुकान होती त्याच दरम्यान स्वातंत्र्य प्राप्ती वारं मुंबईत वाहायला लागलं इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी लोकांना संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवांची संकल्पना मुंबईत रुजायला लागली.so
तेव्हा लालबाग मधल्या रहिवाशांनी 1928 साली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना पेरूच्या चाळीत केली . आणि पहिल्यांदाच पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला. परिसरातील व्यापारी आणि रहिवाशांकडून अगदी चार-चारणे वर्गणी काढून हा उत्सव सुरू झाला
कीर्तनं भारुड अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज कल्याणाचं काम या मंडळाकडून करण्यात आलं. हळूहळू मंडळाच्या या गणेशोत्सवाला लोकांचा Mumbai Cha Raja ला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. पेरूच्या सहाय्यतून तेजूकाया मेंशन मध्ये काही वर्ष हा गणेशोत्सव झाला . उत्सवाचे स्वरूप आणि त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन अंबाजी मास्तर आणि मंडळाच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी 1937 38 साली हा उत्सव गणेश गल्ली परिसरात साजरा करायला सुरुवात केली.
तेव्हापासून आस्तागायत हा गणेशोत्सव याच गणेश गल्लीत साजरा केला जातो. 1937 38 पासूनच दिवसांचा गणेशोत्सव गणेश गल्लीत साजरा होऊ लागला. 1942 ला चलेजाव आंदोलनामुळे स्वातंत्र्य चळवळीने चांगलाच पेठ घेतला . त्यामुळे स्वातंत्र्याच्या कार्यात आपल्या मंडळाचाही खारीचा वाटा असावा असं गणेश गल्लीच्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना वाटलं .so
त्यामुळे त्यांनी गणेशोत्सवात स्वातंत्र्य चळवळीचे देखावे उभे केले स्वातंत्र्य चळवळीची भाषणं कर्मणुकीद्वारे मेळे नाटकं पोवाडे अशा कार्यक्रमातून लोकांना स्वराज्याचे महत्त्व पटवून द्यायला सुरुवात झाली . 1900 45 साली स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस स्वराज्याचा सूर्य आणि सात घोड्यांचा देखावा गणेश गल्लीच्या गणेशोत्सवात सादर करण्यात आला . हा देखावा राजापूरकर मूर्तिकार यांनी साकारला होता. या देखाव्याची त्यावेळी अख्ख्या मुंबईत चर्चा झाली.
Mumbai Cha Raja : विविध देखाव्याचा ईतिहास
मुंबईच्या कानाकोपऱ्यातून हा देखावा बघण्यासाठी लोक आले. लोकांचा मिळणारा हा उदंड प्रतिसाद बघून त्यावर्षी तब्बल 45 दिवस मंडळाने गणेशोत्सव साजरा केला . स्वातंत्र्यानंतर उत्सवात स्वतंत्र भारत आणि विकासाचे देखावे केले जाऊ लागले . थोडक्यात ज्या हेतून सार्वजनिक गणेशोत्सवांची सुरुवात झाली होती तो हेतू गणेश गल्लीच्या या मंडळाने साध्य केला असं सांगितलं जातं.so
गणेश गल्लीच्या बाप्पाचे देखावे हे त्या काळात मुंबईकरांचं खास आकर्षण ठरलं होतं . Mumbai Cha Raja चे हे देखावे बघण्यासाठी संपूर्ण मुंबापुरी लोटू लागली. आणि या उत्सव मंडळाला वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळाली. नाट्यस्पर्धांच्या माध्यमातून हौशी कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं कामही मंडळाने केलं. त्याबरोबरच मंडळाने एक धाडस करून महाराष्ट्राची सांस्कृतिक कला म्हणून ओळखला जाणारा तमाशा मुंबईत उघड्या मैदानात सादर केला . त्यानंतर मुंबईत तमाशा कलावंतांना उघड्या मैदानातून प्रयोग करण्याची संधी मिळायला लागल्याचंही सांगितलं जातं.
1977 ला मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी काहीतरी वेगळं करण्याचं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं पण नक्की काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं . चलचित्र देखावे यांच्यासारखे विविध प्रकार गणेशोत्सवात सादर करून मंडळाने लौकिक तर मिळवला होता. पण 1977 च्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मंडळाला संपूर्ण पूर्ण देशभरात प्रसिद्धी मिळाली . मूर्तिकार दीनानाथ वेलिंग यांनी आपल्या हातातल्या कलेचा एक जगावेगळा नमुना सादर केला .आणि मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सुवर्णा अक्षरांनी कोरलं गेलं .so
वेलिंग यांनी कमळामध्ये विराजित असलेली भव्य दिव्य अशी गणरायाची 22 फुटी मूर्ती घडवली. कुठल्याही साच्याचा वापर न करता ही मूर्ती हाताने घडवण्यात आली होती. वेलिंग यांनी घडवलेल्या या मूर्तीची मुंबईत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातही चर्चा झाली. या मूर्तीचा फोटोही त्या वेळी खूप प्रसिद्ध झाला होता. या मूर्तीमुळे मंडळानं सगळ्यात पहिल्या उंच मूर्तीचा मान मिळवत इतिहास रचला.so
आता मुंबईतल्या रस्त्यांवरून इतकी उंच मूर्ती गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी नेणं हे खूप अवघड होतं. चिंच पोकळीचा पूल पार करून ही मूर्ती चौपाटीवर जाणार होती. पण हे शिवधनुष्य मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पेललं . त्यासाठी मोठी लोखंडी ट्रॉली तयार करण्यात आली. आणि
विसर्जन मिरवणूक सुरू झाली .
Mumbai Cha Raja : आणि मूर्तीकार दीनानाथ वेलिंग
तेव्हापासून आजपर्यंत ही उंच मूर्तीची परंपरा कायम आहे. दीनानाथ वेलिंग यांनी मंडळासाठी अनेक वर्ष मूर्त्या घडवल्या . 1978 सालची कालिया मर्दन रूपातली त्यांनी तयार केलेली मूर्ती हा सुद्धा एक चमत्कार होता. गणपतीची उंच मूर्ती कालिया नागावर उभारण्यात आली होती .22 फूट उंच मूर्तीचा सगळा डोलारा हा फक्त गणरायाच्या पायाच्या अंगठ्यावर सावरण्याचं कसब मूर्तिकार वेलिंग यांनी त्यावेळी करून दाखवलं होतं .so
त्यामुळे मूर्तिकार वेलिंग यांचं आजही कौतुक केलं जातं . 1978 पासून मंडळानं कायमच आपलं वेगळेपण जपलं . अमृत महोत्सवी वर्षात भव्य आणि नेत्रदीपक अशा सजावटीवर भर देऊन दक्षिण भारतामधील मदुराई इथल्या प्रसिद्ध अशा मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती मंडळाकडून साकारण्यात आली . त्यातूनच पुढे एक वेगळी परंपरा सुरू झाली . संपूर्ण भारतात असलेल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देणं अनेक भाविकांना आर्थिक आणि इतर अडचणींमुळे शक्य होत नाही .so
त्यामुळे संपूर्ण भारतातली वेगवेगळी तीर्थक्षेत्र भाविकांना यांना बघता यावीत म्हणून मंडळानं ही क्षेत्र देखाव्यांच्या माध्यमातून साकारली . राजस्थानचं हवामहल गुजरातचं अक्षरधाम सुवर्णलंका , हिमालयातलं केदारनाथ मंदिर , मैसूरच चामुंडेश्वरी मंदिर , सूर्य मंदिर अशी तीर्थक्षेत्र मंडळानं आपल्या देखाव्यातून हुबेहुब साकारण्याचा प्रयत्न केला .so
2023 ला 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मंडळाकडून किल्ले रायगडाची प्रतिकृती ही सादर करण्यात आली होती. 2004 मध्ये मंडळाचा नावलौकिक सगळीकडे पसरल्यानंतर मंडळाच्या च्या गणपतीची ओळख Mumbai Cha Raja या नावाने करण्यासाठी प्रस्ताव समोर आला .आणि तेव्हापासून गणेश गल्लीच्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचा
गणपती मुंबईचा राजा याच नावाने प्रसिद्ध आहे .so
मुंबईच्या राजाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा
0 टिप्पण्या