Click Me Join Us Join Learn More Click Here Download Now Contact Us

तेल आणि वायु चे पाकिस्तानात साठे सापडले : दावा आणि त्यामागचं सत्य काय ?

  तेल आणि वायु चे साठे सापडलेत.  पाकिस्तान म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते तिथली अनागोंदी तिथला दहशतवाद. यासोबतच तिथल्या सरकारच्या विरोधात बलुचिस्तान मधील नागरिक करत असलेलं आंदोलन आणि आर्थिक दृष्ट्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती असलेला देश. खरं तर पाकिस्तानची चर्चा करण्याचं काही कारण नसतं. आपल्या जवळ सुद्धा पण आपल्या शेजारी असलेला देश. जर का अशांत असेल त्या देशातील जनतेमध्ये तिथल्या सरकारच्या विरोधात अस्वस्थता असेल. तर ते आपली चिंता वाढवणार असतं म्हणून पाकिस्तान मध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची माहिती ठेवावी लागते  त्याविषयी चर्चा करावी लागते.so

गेल्या दोन-तीन वर्षापासून हा पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती आहे. चीनकडून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून यासोबत गल्फ मध पाकिस्तानात-तेल-आणि-वायु-साठे-सापडलेल्या ज्या कंट्री आहेत त्यांच्याकडून जी काही थोडीफार आर्थिक मदत मिळते त्याच्यावरती ते कसे वसे तग धरून येतात.so

मागे  पाकिस्तान मधील जनता अक्षरशः पिठाला महाग झालेली आहे .आज परत एकदा पाकिस्तान विषयी चर्चा करण्याचं कारण म्हणजे या एकूण आर्थिक परिस्थितीमध्ये एक आशेचा किरण त्यांना दिसलाय. डॉन वृत्तपत्राने दिलेल्या अहवालानुसार  तेल आणि वायु पाकिस्तानमध्ये कच्चा च्या तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे
सापडलेले आहेत.

याच अहवालामध्ये असा दावा करण्यात आलेला आहे, की हे जे साठे आहेत ते पाकिस्तानची एकूण आर्थिक परिस्थिती आणि भविष्य बदलण्यासाठी पुरेसे आहेत. नेमकं हा अहवाल काय म्हणतो तसेच या अहवालामध्ये नमूद केलेल्या साठ्यांमुळे पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीवरती काय परिणाम होऊ शकतो? आणि सध्या तिथे काय परिस्थिती आहे ? या सगळ्यांची आज आपण माहिती घेणार आहोत.so

तेल आणि वायु  चे साठे  : सत्य परिस्तिती काय ? 


तेल आणि वायु
 
काही वर्षांपासून पाकिस्तान चर्चा चर्चेमध्ये आहे त्याच्यावरती वाढलेल्या कर्जामुळे तेथील महागाईमुळे खरं सांगायचं  तर पाकिस्तान टिकून आहे .ते म्हणजे बाहेरचे जे देश आहेत त्यांनी जी त्यांना आर्थिक मदत केलेली आहे.  त्याच्यावरती पाकिस्तानचे पंतप्रधान देशोदेशी आर्थिक मदत मिळवण्यासाठी फिरत असलेला. so

दुष्काळात 13 वा महिना म्हणतात तसं या आर्थिक परिस्थितीमध्ये भर पडली. ती तिथल्या अस्थिर राजकारणाची इमरान खान यांचं जेलमध्ये जाणं तिथल्या निवडणुकीमध्ये तिथल्या जनतेनं नवाज शरीफ यांना नाकार हे सर्व आपण पाहिलेले आहे. डॉन वृत्तपत्राने असा दावा केलेला आहे की गेल्या तीन वर्षापासून पाकिस्तानच्या टेरिटोरियल वॉटर मध्ये एक सर्वे चालू होता .

आता या सर्वेचा रिझल्ट समोर आलेला आहे. ज्याच्यानुसार पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात  तेल आणि वायु साठे सापडले आहेत. आता प्रश्न असा आहे की या साठ्यांमुळे पाकिस्तान समोरची आर्थिक परिस्थिती बदलू शकते का तर निश्चितपणे बदलू शकते.so

फक्त याच्यामध्ये अडचण ही आहे की हे सर्व साठे समुद्राच्या तळाशी सापडलेले आहेत. आता आता समुद्राच्या तळाशी असलेलं हे कच्च तेल नैसर्गिक वायू जर का एक्सट्रॅक्ट करायचं असेल तर ते लगेच उद्या सकाळपासून त्यांना काही एक्सट्रॅक्ट करता येणार नाहीये.so

त्याच्यासाठी फार मोठा अवधी जावा लागणार आहे. अहवालामध्ये असा दावा करण्यात आलेला आहे  साठ्यांबद्दल 100% खात्री देता येणार नाही.  या देशाची ऊर्जेची गरज याच्यातून भागू शकते का हा सुद्धा प्रश्न ज्यावेळेस पडला तर त्याचं उत्तर सुद्धा असं देण्यात आलेलं आहे की या साठ्यांची साईज किती आहे .

यासोबतच त्याचा प्रोडक्शनचा रिकव्हरी रेट किती आहे. याच्यावरती पुढील  गणित अवलंबून असू शकतात. असा दावा करण्यात आलेला आहे की इफ दिस इज अ गॅस रिझर्व इट कॅन रिप्लेस एलएनजी इम्पोर्ट्स अँड इफ दिस आर ऑइल रिझर्व वी कॅन सब्सिट्यूट इम्पोर्टेड ऑइल म्हणजे येणाऱ्या काळामध्ये  पाकिस्तानचं आयातीवरच अवलंबित्व या साठ्यांमुळे निश्चितपणे कमी होऊ शकतं.so

इकॉनॉमिक टाइम्स ने दिलेल्या वृत्तानुसार 2023 या वर्षांमध्ये पाकिस्तानची ऊर्जेसाठीची एकूण आयात ही तब्बल साडेतरा बिलियन डॉलर ची होती. येणाऱ्या सात वर्षांमध्ये हीच आयात दुप्पट किमतीची होईल असा अंदाज आहे.

तेल आणि वायु  चे साठे: खोदकाम करण्यासाठी पैसे नाहीयेत ?

पाकिस्तानची ऊर्जेची एकूण जी गरज आहे. याच्यामध्ये 29% हे गॅसचं इम्पोर्ट आहे. 85% ऑइल आहे. 20% कोळसा आहे. 50% एलपीजी ही सर्व गरज जी आहे ती आयातीद्वारे भागवली जाते. सर्वेनुसार जो अंदाज समोर येतोय तो जर का खरा ठरला.

तर पाकिस्तानचं आयातीवरच अवलंबित्व हे निश्चितपणे कमी होऊ शकतं पण त्याच्याविषयीची खात्री ही ड्रिलिंग प्रोसेस सुरू झाल्यानंतरच देता येऊ शकेल. या सर्व रिपोर्टमध्ये जर तर पण हे शब्द येण्याचं कारण असं आहे. जर काही ड्रिलिंग प्रोसेस सुरू करायची असेल तर कमीत कमी पाच बिलियन डॉलर ची गुंतवणूक पाकिस्तानला करावी लागणार आहे.so

हेही वाचा :  Rahul Gandhi On Reservation 

आणि आजच्या दिवशी इतके पैसे त्यांच्याजवळ नाहीयेत आणि गुंतवणूक केली तरीसुद्धा त्याच्यातून ऍक्च्युअल उत्पादन सुरू होण्यासाठी कमीत कमी चार ते पाच वर्षांचा वेळ लागू शकतो. आणि हीच खरी अडचण आहे. यावर्षी जानेवारी मध्ये पाकिस्तानने इंधनावरचे त्यांचे आयातीचे बिल कमी करण्यासाठी गॅस उत्पादनासाठी 30 अब्ज डॉलर ची कर्ज उभारण्याची तयारी केलेली होती.

पाकिस्तानमध्ये 235 ट्रिलियन घनफूट इतका गॅसचा साठा आहे. आणि आयातीला रिप्लेस करण्यासाठी त्यांना पुढील दशकभरामध्ये 25 अब्ज ते 30 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची गरज आहे.. आता इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे. गरज किती आहे 25 ते 30 अब्ज डॉलर्स इतकी यासोबतच हे आत्ता सापडलेलं किंवा त्यांनी दावा केलेलं जे आहे.so

ऑइल एक्सट्रॅक्ट करायचं असेल तर 5 बिलियन डॉलर्स त्यांना लागणार आहेत. पण पाकिस्तान मधली 74% जनता अशी आहे की जी आजच्या दिवशी अनस्टेबल इन्कम वरती जगती आहे मे मध्ये हेच प्रमाण 60% होतं म्हणजे  गेल्या काही काळामध्ये हे प्रमाण 14% ने वाढलेलं आहे. यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पाकिस्तानमध्ये 56% जनता अशी आहे की ज्यांच्या जवळ आजच्या दिवसापुरतीचाच खर्च भागवण्यासाठीचा पैसा आहे.

म्हणजे दैनंदिन गरज भागवल्यानंतर बचत करण्यासाठी त्यांच्याजवळ एकही रुपया शिल्लक राहत नाही. मग अशी परिस्थिती असताना ऑइल एक्सट्रॅक्ट करण्यासाठी इतका मोठा पैसा ते कसा उभा करणार? हा बेसिक प्रश्न आहे.so

तेल आणि वायु  चे साठे : एक्सप्लोर करायचं की जनतेची खाण्यापिण्याची गरज भागवायची मोठा प्रश्न 

मध्यपूर्वेतील देशांकडून पाकिस्तानने त्यांची दैनंदिन खर्चाची गरज भागवण्यासाठी चार बिलियन डॉलर उभं करण्याचा प्रयत्न केला होता.यासोबतच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सुद्धा कर्ज घेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

पाकिस्तानने यावर्षीच्या त्यांच्या बजेटमध्ये 20 बिलियन डॉलरचं कर्ज उभारणार अत्या दृष्टीने ते प्रयत्न सुद्धा करत आहेत. त्या प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाहीये.   पाकिस्तान मधली आजच्या दिवशीची  आर्थिक परिस्थिती बघितली तर त्यांची इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे.ती सुद्धा वेगाने कमी झालेली दिसून येते. so

2024  आर्थिक वर्षासाठी त्यांनी टार्गेट  आहे. ते साडेतीन टक्क्यांचं ठेवलेलं होतं. पण अगदी मेहनत करून दोन ते अडीच टक्के इतकंच ते अचीव करू शकतात असं त्यांच्या इथलाच इकॉनॉमिक सर्वे सांगतोय. आता हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे कर्ज उभारून ऑइल एक्सप्लोर करायचं की जनतेची खाण्यापिण्याची गरज भागवायची तिथली महागाई कमी करायची असा प्रश्न त्यांच्या च्या समोर आहे .

आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे जे  तेल आणि वायु साठे  सापडलेले आहेत.  हे कदाचित सगळ्यात जास्त रिझर्व पैकी एक असू शकतात. so

 पाकिस्तान मधल्या एक एका अहवालानुसार पाकिस्तान मधली आजच्या दिवशीची महागाई जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. ती सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर तर कधीच गेलेली आहे. पण तरीसुद्धा तिथली जनता केवळ आणि केवळ लष्करामुळे शांत आहे. पण ज्या दिवशी हा सर्व बबल फुटेल त्या दिवशी तिथलं एकूण जे काही सोशल ऑर्डर आहे त्याच्यावरती याचा गंभीर परिणाम होऊ शकतो .

मग बलुचिस्तानमध्ये गडबड चालू आहे. कराचीमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू होतं राजकीय अस्थिरता आहे. देशावरती मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये कर्ज आहे कधी फेडतील काहीही कल्पना नाही यासोबतच फॉरेन जो त्यांच्याकडे करन्सी आहे ती सुद्धा अगदी कमी प्रमाणात आहे.

मग अशा सर्व परिस्थितीमध्ये नेमकं त्यांच्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक कोण करणार हाच खरा प्रश्न आहे. आणि म्हणूनच ही गुंतवणूक आजच्या दिवशी तरी पाकिस्तान साठी गणित अवघड बनवतानाso

आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट
बॉक्स मध्ये नक्की सांगा. 

एक्सटर्नल लिंक : पाकिस्तानात तेलाचे साठे सापडले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या