आंध्रप्रदेशातलं तिरुपती बालाजी देवस्थान. वर्षभरात साधारण पाच हजार करोड रुपयांचे उत्पन्न असलेलं जगातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान. किमान 60 ते 70 हजार भाविक दररोज भगवान व्यंकटेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी या देवस्थानाला भेट देतात. विशेष उत्सवांच्या वेळी ही संख्या एक लाखाच्या घरातही जाते. इथून दर्शन घेऊन येणारे भाविक नेहमीच भगवान व्यंकटेश्वरांचा प्रसाद म्हणून Tirupati Balaji Laddu घेऊन येतात.
हेही वाचा : Ganpati Visarjan मिरवणुकीवर दगडफेक,, Jalgaon Jamod आणि Bhiwandi मध्ये दोन जमावांमध्ये तणाव काय घडलं ?
एक्सटर्नल लिंक : तिरूपति बालाजी
Tirupati Balaji Laddu : जनावरांची चरबी आणि माशांचे तेल वापरण्यात आल्याचं सांगण्यात आलंय
तिरुपतीला गेलेला एकही भाविक लाडवांचा महाप्रसाद घेतल्याशिवाय शिवाय परत येत नाही. महाप्रसादाला जवळपास 300 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे या पवित्र
प्रसादाबद्दल भाविकांच्या मनात मोठी श्रद्धा आहे. पण या लाडवांच्या प्रसादाबद्दल सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.so
चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील आंध्रप्रदेश सरकारकडून या प्रसादाबद्दलचा एक टेस्ट रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आलाय. यामध्ये प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी शुद्ध तुपाऐवजी जनावरांची चरबी आणि माशांचे तेल वापरण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. 2019 ला जगनमोहन रेड्डीचं सरकार आल्यानंतर गेल्या पाच वर्षात या प्रसादात भ्रष्टाचार करून भाविकांच्या श्रद्धेशी खेळ झाल्याचे आरोप चंद्राबाबूंच्या तेलगू देशम पार्टी कडून करण्यात येत आहेत.so
भाजपनही करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप रेड्डी यांच्यावर केलाय. सोशल मीडियावरही यावरून लोकांनी संताप व्यक्त केलाय .दरम्यान रेड्डींच्या वाय एसआर काँग्रेस कडून हे आरोप फेटाळण्यात आले असून राजकारणासाठी चंद्राबाबू कोणत्याही थराला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय .so
त्यामुळे एकंदरीतच तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या लाडवांच्या प्रसादावरून मोठा राडा होत असल्याचं पाहायला मिळतंय. हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय महाप्रसादाचे लाडू नेमके कसे बनवले जातात? लॅब रिपोर्ट मध्ये प्रसादात वापरल्या जाणाऱ्या तुपाबद्दल काय दावा करण्यात आलाय .आणि जगनमोहन रेड्डींच्या सरकारचा या सगळ्याशी संबंध काय या सगळ्याची माहिती आपण जाणून घेऊयात.
प्रसादाच्या लाडवांवरून वाद का होतोय ते बघूयात. चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपी कडून बुधवारी 18 सप्टेंबरला एक रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला. या रिपोर्ट मध्ये तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेलं तूप अशुद्ध असल्याचं सांगण्यात आलंय.so
तिरुमला तिरुपती देवस्थानाकडे काही महिन्यांपूर्वी लाडवाची चव वेगळी लागत असल्याच्या आणि लाडवांना विशिष्ट वास येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर 9 जुलैला मंदिर ट्रस्ट बोर्डाकडून लाडवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपाचे सॅम्पल गुजरातच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते .so
या बोर्डाच्या काल्फ म्हणजे सेंटर फॉर ऍनालिसिस अँड लर्निंग इन लाइफ स्टोक अँड फूड संस्थेनं तुपाची तपासणी करून त्याचा रिपोर्ट 17 जुलैला सादर केला. यामध्ये एका कंपनीच्या तुपात भेसळ असल्याचं सांगण्यात आलं होतं. यानंतर तुपाचे सॅम्पल्स 23 जुलैला पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवण्यात आले.
Tirupati Balaji Laddu : रिपोर्ट आला समोर , महाप्रसादाची ही परंपरा जाणून घ्या
ज्याचा रिपोर्ट 18 सप्टेंबरला समोर आला. या रिपोर्ट नुसार तुपातील घटक एस व्हॅल्यू रेंजच्या बाहेर असल्याचं सांगण्यात आलंय. तसंच या तुपात माशांचं तेल ॲनिमल टॅलो आणि लाडचा समावेश असल्याचंही सांगण्यात आलंय. ॲनिमल टॅलो म्हणजे जनावरांची चरबी तर लाडचा अर्थ डुकराची चरबी असा होतो.
रेड्डी सरकारच्या काळात प्रसादात भेसळ झाल्याचा आरोप यावरून आता नायडूंच्या टीडीपी कडून करण्यात येतोय. आता तिरुमला तिरुपती देवस्थानातल्या लाडवांची परंपरा काय त्याबद्दल जाणून घेऊयात.so
तिरुपती बालाजी मंदिरात महाप्रसादाच्या लाडवांची ही परंपरा जवळपास 300 वर्ष जुनी आहे .सगळ्यात पहिल्यांदा ऑगस्ट 1715 मध्ये या लाडवांचा प्रसाद भगवान व्यंकटेश्वरांना
अर्पण करण्यात आल्याचं सांगितलं जातं. काही जुन्या पुराव्यांनुसार लाडवांच्या प्रसादाची परंपरा 1480 पासून सुरू असून . त्याला मनोहरम असं नाव असल्याचंही सांगितलं जातं .
आतापर्यंत हा प्रसाद बनवण्याच्या पद्धतीत सहा वेळा बदल करण्यात आल्याची ही माहिती मिळते. सध्या तिरुपती देवस्थानातील लाडू बनवण्याची पद्धत 1940 च्या मद्रास सरकारच्या काळापासून सुरू आहे असं म्हटलं जातं .या लाडवांचा महाप्रसाद एका विशेष स्वयंपाक घरात तयार केला जातो .या स्वयंपाक घराला लड्डू पोटू असं म्हटलं जातं .so
जवळपास 600 पेक्षा जास्त आचारी दररोज हे लाडू बनवण्याचं काम करतात. Tirupati Balaji Laddu प्रसादाचं पावित्र्य राखण्यासाठी या आचार्यांना मुंडण करणं गरजेचं असतं .तसंच प्रसाद बनवताना त्यांच्या अंगावर फक्त एकच अखंड स्वच्छ वस्त्र असतं. सुरुवातीला फक्त सरपण वापरून हे लाडू बनवण्याचं काम व्हायचं.
पण 1984 पासून एलपीजी गॅसचा वापर लाडू बनवण्यासाठी करण्यात आला. या प्रसादाच्या लाडवांचे एकूण तीन प्रकार असतात, पहिला प्रकार म्हणजे आस्थानम लड्डू हे लाडू विशेष उत्सवांच्या वेळी तयार केले जातात. दुसरा प्रकार कल्याणत्सव लड्डू हे लाडू अर्जिता सेवा करणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून म्हणून दिले जातात. तर तिसरा प्रकार म्हणजे प्रोक्तम लड्डू हे लाडू दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद म्हणून दिले जातात.so
दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला हा प्रसाद विनामूल्य मिळतो तर भाविक 50 रुपये प्रति लाडू या दरानं 170 ग्रॅम वजनाचा हा एक लाडू विकतही घेऊ शकतात.
Tirupati Balaji Laddu : लाडवांच्या प्रसादावरून जगनमोहन रेड्डींच्या वाय एसआर काँग्रेसवर आरोप होण्यामागची कारणं
लाडू तयार करण्यासाठी दररोज जवळपास एक टन बेसन, दहा टन साखर, 700 किलो काजू , 500 किलो बेदाणे आणि 200 किलो वेलचीचा वापर केला जातो.
लाडू बनवण्यासाठी साठी देवस्थानाकडून वर्षाला पाच लाख किलो तूप खरेदी केलं जातं .दररोज जवळपास साडेतीन लाख किलो प्रसादाचे लाडू तयार केले जातात. लाडवांच्या विक्रीतून वर्षाकाठी देवस्थानाला तब्बल साडेपाचशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचंही सांगितलं जातं.so
2014 मध्ये तिरुपती मंदिरातील लाडवांना जीआय नामांकनही देण्यात आलंय. त्यामुळे देवस्थानाच्या नावाखाली इतर कोणीही हे लाडू विकू शकत नाही. या लाडवांच्या प्रसादावरून जगनमोहन रेड्डींच्या वाय एसआर काँग्रेसवर आरोप होण्यामागची कारणं काय ते बघूयात.
तिरुपती बालाजी मंदिराचं सगळं व्यवस्थापन हे तिरुमला तिरुपती देवस्थानम या ट्रस्ट बोर्ड कडून केलं जातं 1979 मध्ये यासाठी आंध्रप्रदेश सरकारने कायदा पारित केला होता या कायद्याद्वारे देवस्थानाचे व्यवस्थापन करण्यासाठी हा ट्रस्ट बोर्ड स्थापन करण्यात आला यामध्ये दोन सदस्य एक
कार्यकारी अधिकारी आणि एक अध्यक्ष आंध्रप्रदेश सरकारकडून नियुक्त केले जातात. देवस्थानाच्या व्यवस्थापनासोबतच देवस्थानाकडून चालणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाची ही जबाबदारी याच बोर्डाकडे देण्यात आली आहे.so
बोर्डावर दर दोन वर्षांनी आंध्रप्रदेश सरकारकडून अध्यक्ष नियुक्त केला जातो. आता 2019 मध्ये जेव्हा जगनमोहन रेड्डींच्या अध्यक्षतेखाली आंध्रप्रदेशास वाय एसआर काँग्रेसची सत्ता आली. तेव्हा तिरुमला तिरुपती देवस्थानाचे अध्यक्ष म्हणून वाय वी सुब्बा रेड्डी यांची जून 2019 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती .
सुब्बा रेड्डी हे जगमोहन रेड्डींचे मामा लागतात त्यावेळी सुब्बा रेड्डीच्या नियुक्तीवरून मोठा वाद झाला होता. सुब्बा रेड्डी हे धर्मांतर झालेले ख्रिश्चन असल्यामुळे त्यांची नियुक्ती हिंदू देवस्थानाच्या अध्यक्षपदी कशी केली जाऊ शकते यावरून त्यांना विरोध करण्यात आला होता. पण 2021 मध्ये रेड्डी सरकारनं पुन्हा एकदा सुब्बा रेड्डींची देवस्थानाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.
आता होत असलेल्या आरोपांनुसार रेड्डी सरकारच्या काळातील मंदिर बोर्डाकडून फक्त 320 रुपये प्रति किलो या दरानं लाडवांमध्ये लागणाऱ्या तुपासाठी टेंडर काढण्यात आल्याचं सांगितलं जातंय. शुद्ध तुपाची किंमत हजार रुपयाच्या घरात असताना फक्त 320 रुपयात तूप देण्याचं टेंडर कसं काय काढण्यात झालं असा सवाल आता विचारला जातोय .so
Tirupati Balaji Laddu : कंपन्यांना यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं
चार कंपन्यांना यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. त्यापैकी तामिळनाडूच्या एआर डेअरी फूड्स कडून सप्लाय होणाऱ्या तुपात ही भेसळ झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. आता गेल्या 15 वर्षांपासून देवस्थानाचे लाडू तयार करण्यासाठी कर्नाटक मिल्क फेडरेशन कडून सप्लाय होणारं नंदिनी घी वापरण्यात येत होतं .so
पण जुलै 2023 मध्ये तुपाच्या दरावरून तत्कालीन तिरुमला तिरुपती देवस्थानानं नंदिनी घी न वापरण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कर्नाटक मिल्क फेडरेशनचे अध्यक्ष भीमा नाईक यांनीही यावरून संशय व्यक्त केला होता. फक्त 320 रुपये प्रति किलो दरात कोणी तूप देत असेल तर त्या तुपाच्या गुणवत्तेची तपासणी करायला हवी असं नाईक यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
आंध्रप्रदेशच्या विधानसभेतही यावरून वाय एसआर काँग्रेस सरकारला प्रश्न विचारण्यात आले होते .जून 2024 मध्ये चंद्रबाबू नायडूंच सरकार आंध्रप्रदेश मध्ये आल्यानंतर त्यांनी यामध्ये लक्ष घालायचं ठरवलं. त्यासाठी एक चार सदस्य समिती स्थापन करण्यात आली.so
तसेच वरिष्ठ आयएस ऑफिसर जे शामला राव यांची ही देवस्थानाच्या कार्यकारी अध्यक्षपदी
नियुक्ती करण्यात आली .त्यानंतर मंदिरातल्या प्रसादाबद्दल तपासणी करण्यात आल्यावर त्यामध्ये भेसळ होत असल्याचे आरोप आता करण्यात येत आहेत .दरम्यान चंद्राबाबूंच सरकार आल्यानंतर ऑगस्ट 2024 पासून पुन्हा एकदा नंदिनी घीचा वापर करून प्रसादाचे लाडू तयार करण्यात येत आहेत.
तसेच भेसळ करणाऱ्या कंत्राटदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. लाडवांमधल्या या भेसळीवरून आता जगमोहन रेड्डींच्या सरकारवर गंभीर आरोप होत आहेत. त्यांनी करोडो हिंदूंच्या भावनांशी खेळ खेळल्याचे आरोप करण्यात येत आहेत.so
दरम्यान असे आरोप करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे टीडीबी कडे नसल्याचं वाय एसआर काँग्रेसचं म्हणणं आहे. लाडवांमधल्या तुपाचे सॅम्पल्स जून 2024 मध्ये पाठवण्यात आले होते .तेव्हा चंद्राबाबूंच सरकार आंध्रप्रदेशात कार्यरत होतं असं देवस्थानाचे तत्कालीन अध्यक्ष आणि वाय एसआर काँग्रेसचे राज्यसभा खासदार वाय व्ही सुब्बा रेड्डींनी म्हटलंय.
तसेच हा भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवण्याचा चॅलेंजही त्यांच्याकडून देण्यात आलंय. दरम्यान यावरून वाय एसआर काँग्रेसन उच्च न्यायालयात याचिकाही दाखल दाखल केली आहे. त्यामुळे आता तिरुपती बालाजीच्या प्रसादावरून झालेल्या या राड्यात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
0 टिप्पण्या