"सो जा वरना हस्तर आ जायेगा ". सध्या Tumbbad मधला हा डायलॉग खूप हिट झालाय . तब्बल सहा वर्षांनी तुंबाळ थिएटर्स मध्ये पुन्हा एकदा रिलीज झाला .आणि सध्या तो धुमाकूळ घालतोय. रिलीज झाल्यापासून फक्त पाच दिवसात तुंबाडनं दहा कोटी रुपयांचं कलेक्शन केलंय. ऐन गणेशोत्सवात तुंबाडनं केलेली ही कमाई टॉपची असल्याचं सांगितलं जातंय. जवळपास सगळ्याच थिएटर्स मध्ये तुंबाडचे शो हाऊसफुल होत आहेत.so
तुंबाडनं करीना कपूरच्या बकिंगम मर्डर्स या सिनेमालाही मागे टाकलंय . त्यामुळे तब्बल सहा वर्षानंतर नंतर तुंबाडच्या रिलीजला मिळणाऱ्या या यशाचं कौतुक होतंय. 2018 मध्ये जेव्हा तुंबाड
रिलीज झाला . तेव्हा तुंबाडनं केलेल्या एकूण कलेक्शन पेक्षा जास्त कलेक्शन आता रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात होणार असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : Ganpati Visarjan मिरवणुकीवर दगडफेक
पण 2018 मध्ये एव्हरेज फिल्म म्हणून गणल्या गेलेल्या तुंबाडच्या रिलीजला एवढं यश का मिळतंय. तब्बल सहा वर्षांनी तुंबाड इतका हिट होण्याची कारण काय त्याचीच माहिती या जाणून घेऊयात .so
तुंबाड पुन्हा एकदा थिएटर्स मध्ये रिलीज झाला . सहा वर्षांपूर्वी सिनेमाला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक न मिळाल्यामुळे तुंबाड रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Tumbbad हिट की फ्लॉप?
तुंबाडनं पहिल्याच दिवशी एक करोड 65 लाख रुपयांची कमाई केली . त्यानंतर पाचच दिवसात तुंबाडच्या कलेक्शन 10 करोड 69 लाख रुपयांचा टप्पा पार .केलाय ऑक्टोबर 2018 मध्ये जेव्हा तुंबाड रिलीज झाला होता .त्यावेळी तुंबाडला एवढं यश मिळालं नव्हतं .त्यावेळी तुंबाडचं पहिल्या आठवड्याचं कलेक्शन फक्त सव्वा तीन करोड रुपये होतं .तर एकूण कलेक्शन मध्ये तुंबाडला तेव्हा 13 करोड 25 लाख रुपयांचा गल्ला जमावता आला होता.so
Tumbbad चं एकूण बजेटच पंधरा करोड रुपयांचा असल्यामुळे तुंबाड तेव्हा फ्लॉप गेल्याचंच बोललं गेलं. पण आता तुंबाडच्या रिलीजन थिएटर्स मध्ये धुमाकूळ घातलाय .फक्त पाच दिवसात सिनेमान दहा कोटी कमावल्यानं तुंबाडची लोकांमधली क्रेज वाढत जाण्याची चर्चा आहे. पण तुंबाडला आज हे 2018 मध्ये जमलं नाही ते सहा वर्षानंतर कसं काय जमलं .
याचं पहिलं कारण म्हणजे : तुंबाडची गोष्ट तुंबाड सारखा सिनेमा आजवर भारतात बनला नाही असा दावा तुंबाडचा निर्माता आणि अभिनेता सोहम शहान केलाय. आता तुंबाडचा जॉनर सांगणं कठीण आहे .फक्त हॉरर सिनेमा म्हणून आपल्याला तुंबाडकडे बघता येत नाही. तुंबाड हा आजीबाईच्या गोष्टीप्रमाणे वाटतो लहानपणी आजी आपल्याला जशा रहस्यमय किंवा खजिन्याच्या गोष्टी सांगायची तशीच काहीशी तुंबाडची गोष्ट वाटते.so
आता आजीबाईनं सांगितलेल्या गोष्टी खऱ्या की खोट्या एवढा विचार न करता आपण त्या गोष्टीच्या काल्पनिक विश्वात तेव्हा रंगून जायचो . त्यातली प्रत्येक कॅरेक्टर आपल्याला समोर दिसायची. गुप्तधन खजिना याबद्दल आपल्याला कायमच आकर्षण असल्यामुळे आपल्याला ती गोष्ट खरी वाटायला लागते. तसंच काहीस तुंबाडचं आहे .तुंबाड मधली हस्तरची गोष्ट आपल्याला त्याच झोनमध्ये घेऊन जाते.so
दंतकथा रहस्य कथा आणि काल्पनिक कथांमध्ये भारतीय ऑडियन्सना इंटरेस्ट असल्यामुळे तुंबाड मधली राजा राक्षस आणि खजिन्याची गोष्ट आपल्याला त्याच काल्पनिक विश्वात घेऊन जाते. तुंबाडची बेसिक थीम आहे. ती खजिन्यासाठी असलेली हाव आधी आजी मग सून मग विनायक आणि शेवटी पांडुरंग या सगळ्या मध्ये आपल्याला ही हाव दिसून येते .so
त्यामुळे लहानपणी ऐकलेल्या गोष्टींशी प्रेक्षक तुंबाडला रिलेट करतात. तुंबाड मधले जवळपास सगळे सीन्स हे धोधो पावसात शूट करण्यात आलेत .त्यामुळे तुंबाडच्या स्टोरीला अपेक्षित असलेला माहोल आपोआपच क्रिएट होतो.
Tumbbad ची संकल्पना काय आहे?
तसंच आजवर सिनेमांमध्ये दिसलेल्या लोकेशन पेक्षा एक वेगळं आणि गुड असं लोकेशन तुंबाड मध्ये पाहायला मिळत. असल्यामुळे त्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे .ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुंबाड आल्यानंतर याच गोष्टींबद्दल आकर्षण वाढलं .so
आणि एकदा तरी तुंबाड मोठ्या स्क्रीनवर बघितलाच पाहिजे म्हणून प्रेक्षक तुंबाडच्या रिलीजला गर्दी करतायेत असं म्हटलं जातं .
तुंबाड रिलीज मध्ये हिट होण्याचं दुसरं कारण : म्हणजे लोकांची बदललेली मानसिकता गेल्या काही वर्षातला इंडियन सिनेमाचा ट्रेंड बघितला तर लव स्टोरी कॉमेडी इन्स्पिरेशनल क्राईम अशा जॉनरचे सिनेमे बघायची लोकांना सवय लागली होती . त्यामुळे सस्पेन्स थ्रिलर हॉरर अशा विषयांची भारतीय प्रेक्षकांना तितकी सवय नव्हती असं सांगितलं जातं .पण गेल्या काही वर्षात भारतीय प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची टेस्ट बदलल्याचं बोललं जातं.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविड काळात घरात बसलेल्या प्रेक्षकांना एंटरटेनमेंट म्हणून वेगवेगळ्या विषयांवरचा कॉन्टेंट बघायची सवय लागली .स्मार्टफोनमुळे सिनेमाचा मोठा पडदा ऑडियन्सच्या हातात आला .त्यात ओटीटी प्लॅटफॉर्म्स मुळे जगभरातले वेगवेगळे जॉनर लोकांना कळायला लागले .so
त्यामुळे सस्पेन्स थ्रिलर अशा सिनेमांकडे अलीकडे भारतीय प्रेक्षक शिफ्ट होत असल्याचं सांगितलं जातं .कांतारा ब्रह्मयुगम असे सिनेमेही प्रेक्षकांना आवडायला लागलेत .आता Tumbbad एक कलर्ट क्लासिक सिनेमा आहे. त्यातलं कथानक इतर सिनेमांपेक्षा खूपच वेगळं आहे. साधी खजिन्याची गोष्ट पण हस्तर सारख्या पात्रामुळे ती खूपच रंजक करण्यात आली आहे.
तुंबाड मध्ये थ्रिल आहे ड्रामा आहे भीती आहे त्यामुळे एक फुल पॅक एंटरटेनमेंट पॅकेज म्हणून तुंबाड लोकांना आकर्षित करतो .त्यामुळेच बदललेल्या ट्रेंडच्या कन्सेप्ट मध्ये तुंबाड एकदम फिट बसतो. सुरुवातीला तुंबाड वर अन्याय झाला पण ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे तुंबाडची लोकप्रियता वाढली .आणि आता त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं स्वतः निर्माता सोहम शहा म्हटलंय.so
तुंबाड रिलीजला थिएटरमध्ये एवढा चालण्याचं अजून एक कारण म्हणजे सिनेमातले बदल आणि मेकिंगची गोष्ट तुंबाडच्या रिलीजची घोषणा करताना तुंबाड मध्ये काही बदल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. काही ऍडिशनल सीन्स तुंबाडच्या रिलीज मध्ये बघायला मिळतील .अशी चर्चा होती .तसंच तुंबाडच्या पोस्ट क्रेडिट मध्ये तुंबाड टू ची घोषणाही करण्यात आली आहे .
Tumbbad चित्रपट कुटे शूट झाला ?
त्यामुळे तुंबाड मध्ये नक्की आहे काय याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. आता तुंबाडच्या मेकिंगचे अनेक किस्सेही निर्माते आणि दिग्दर्शकांकडून सांगण्यात आलेत .तुंबाडच बरचस शूटिंग भर पावसात झालंय .हा सिनेमा कोकणात शूट झालाय त्यामुळे तुंबाड बनवण्यासाठी सहा वर्ष लागली.फक्त जुलै ते सप्टेंबर या काळातच तुंबाडचा शूट करण्यात आलं.so
एकूण चार मान्सून सीजन मध्ये तुंबाड शूट करण्यात आला .तसेच तुंबाडचे व्हीएफएक्स ही सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात सिनेमाचं सेट डिझायनिंग ही आऊट ऑफ द बॉक्स असल्याची चर्चा होते. स्टोरीला अपेक्षित असणार साऊंड डिझायनिंगचंही कौतुक केलं जातं. सिनेमातल्या आजीचा आवाज सिनेमाच्या क्लायमॅक्स वेळी असलेली हस्तर सोबतची फायटिंग या सगळ्याच गोष्टी तुंबाडच्या यशाची कारणं म्हणून सांगितल्या जातात .so
याच सगळ्या कारणांमुळे Tumbbad रिलीज मध्ये हिट होत असल्याचं सांगितलं जातंय .तुम्ही तुंबाड बघितलंय का ? तुंबाड हिट होण्याची नेमकी कोणती कारण तुम्हाला वाटतात ?
आणि तुंबाड टू मध्ये नक्की काय बघायला मिळणार याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा
एक्सटर्नल लिंक : तुंबाड एवढा हीट होण्याची कारणं काय ?
0 टिप्पण्या