शिवसेना म्हटलं की उद्धव ठाकरे , हिंदुत्व हे मागच्या पाच दशकांपासूनच महाराष्ट्रातलं समीकरण. 1980 पर्यंत शिवसेनेचे राजकारण मराठी माणूस मराठी अस्मिता आणि प्रादेशिक वादावर केंद्रित होतं पण त्यानंतर शिवसेनेने आपली कूस बदलली. हिंदुत्वाची लाईन धरली 1987 साली मुंबईत पार पडलेल्या एका पोट निवडणुकीत बाळासाहेबांनी गर्वसे हिंदू है असा नारा दिला. त्यानंतर शिवसेनेची हिंदुत्वाची लाईन आणखी गडत होत. गेली बाळासाहेब ठाकरेंनी मराठवाड्यात खान हवा की बाण हवा असा नारा देत शिवसेनेची हिंदुत्ववादी इमेज संपूर्ण राज्यात ठसवण्याचा प्रयत्न केला .
पण आता ठाकरेंच्या शिवसेनेत चित्र वेगळं असल्याचे आरोप सातत्याने होतात त्याचं कारण म्हणजे सध्याचं Uddhav Thackeray यांचं राजकारण. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी सॉफ्ट हिंदुत्वाचं धोरण स्वीकारल्याचं बोललं जातं.
उद्धव ठाकरे : भविष्यात मुस्लिम उमेदवारांना विधानसभेच्या मैदानात उतरवू शकतात ?
भविष्यात ठाकरे गट मुस्लिम उमेदवारांना विधानसभेच्या मैदानात उतरवू शकतो असं देखील बोललं जातंय. याबाबतच सूचक विधान अंबादास दानवे यांनी केलंय. so
पण असं झालं तर त्याचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो असंही सांगितलं जातंय. एकीकडे मुस्लिम उमेदवार देण्याच्या चर्चा सुरू असतानाच ठाकरे हिंदू मतांपासून दूर जाऊ शकतात असा अंदाज जातोय. मुस्लिम मतांसाठी ठाकरेंचा प्लॅन काय असू शकतो ? मुस्लिम मतांच्या नादात ठाकरे हिंदू वोट बँकेपासून दूर जाऊ शकतात का ? पाहूयात या so
सगळ्यात आधी अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले ते बघूयात अंबादास दानवे नुकतंच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी हा दौरा केला होता .या दौऱ्यात त्यांना विधानसभेला मुस्लिम उमेदवार देणार का असा प्रश्न विचारला असता आम्ही हिंदुत्ववादी आहोत मुस्लिम विरोधक नाहीत जे देशभक्त आहेत ,राष्ट्रभक्त आहेत आणि समाजासाठी काम करणारे मुस्लिम आहेत त्यांनी यांच्या बाजूने आम्ही आहोत असं वक्तव्य दानवेंनी केलं.
मुस्लिम उमेदवारामध्ये जिंकण्याची क्षमता असेल तर त्याला तिकीट दिलं जाऊ शकतं असंही दानवे म्हणाले. दानवे यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवतील असा अंदाज वर्तवला जातोय. आता ठाकरेंचा विधानसभेला नेमका काय प्लॅन असू शकतो ? so
हेही वाचा : आयफोन 16 Series Launch
खरं तर महाविकास आघाडीचा प्रयोग केल्यापासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकारणात बदल केल्याचं दिसतं . इतके दिवस हिंदुत्वाचं राजकारण करणारे ठाकरे मुस्लिम समाजाच्या बाबतीत काहीसे सौम्य झाल्याचं बोललं जातं. त्यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराने राजकारण सुरू केल्याच्या चर्चा होतात.
गतकाळात त्यांनी हृदयात राम आणि हाताला काम हेच आमचं हिंदुत्व असं वक्तव्य केलं होतं. तसेच आम्हाला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेकांना बडवणारा हिंदू पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा जाहीर भाषणातम्हटलंय.
लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंनी माहीम दर्ग्याच्या काही पदाधिकाऱ्यांची देखील भेट घेतली होती . या बैठकीत त्यांनी मुस्लिम बांधवांना उद्देशून आपली दुश्मनी प्रसिद्ध होती पण आता आपली दोस्ती सुद्धा प्रसिद्ध होईल असं विधान केलं होतं. शिवाय रायगडच्या मुस्लिम बांधवांनी त्यांना मराठी भाषेतलं कुराणही गिफ्ट केलं होतं. so
उद्धव ठाकरे : यांना लोकसभेत मुस्लिमाचे भरघोस मत
आता ही सगळी उदाहरण बघितली तर उद्धव ठाकरे मुस्लिम मतांना हात घालतायेत हे स्पष्टपणे दिसून येतं . दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणत अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी ठाकरेंना भरभरून मदत केल्याचं लोकसभेत दिसून आलं. ईशान्य मुंबईत ठाकरेंनी संजय, दीना पाटील यांना उमेदवारी दिली होती. या मत मतदारसंघातील मुस्लिम बहुलभाग असलेल्या मानखूर शिवाजीनगर मधून संजय दिना पाटील यांना तब्बल 87971 मतांचे लीड मिळालं .so
इतर ठिकाणी देखील मुस्लिम समाजानं ठाकरेंना चांगली साथ दिली होती. एकूणच ठाकरेंना काँग्रेसचा पारंपारिक मतदार समजल्या जाणाऱ्या मुस्लिम समाजाला आपल्या बाजूने वळवण्यात यश आल्याचं बोललं जातं. त्यामुळे आता विधानसभेला Uddhav Thackeray मुस्लिम वोट बँकेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकू शकतात असे आडाखे बांधले जात आहेत. पण लोकसभेला वर्कआउट झालेली ठाकरेंची ही स्ट्रॅटेजी त्यांना विधानसभेला मोठं डॅमेज करू शकते असंही काही जाणकारांचं मत आहे. so
जी शिवसेना आधी मराठीचा मुद्दा आणि नंतर हिंदुत्वाच्या लाईनवर इतकी वर्ष राज्याच्या राजकारणात प्रभावीपणे उभी राहिली. तिला ठाकरेंच्या मुस्लिम वोट बँकेच्या राजकारणामुळे हादरे बसू शकतात असंही म्हटलं जातंय.
मुस्लिम मतांच्या नादात ठाकरेंना फायदा कमी आणि तोटा जास्त होऊ शकतो असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे : हिंदुत्ववादी वोट बँक दुरावण्याचा धोका Uddhav Thackeray नी विधानसभेला मुस्लिम उमेदवारांना संधी दिली तर तर त्यांची परंपरागत हिंदुत्ववादी वोट बँक त्यांच्यापासून दुरावू शकते. कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर हिंदुत्ववादी विचारांचा मोठा गट एकनाथ शिंदेसोबत गेल्याचं सांगण्यात येतं. so
ठाकरेंनी हिंदुत्वाशी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केल्यामुळेच आपण वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं शिंदेच्या शिवसेनेकडून सातत्याने सांगण्यात येतं . ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी टीका देखील सातत्याने भाजप आणि शिंदे गटाकडून केली जाते. लोकसभेच्या निकालानंतरही ठाकरेंना अनेक जागांवर मुस्लिम मतदारांचा फायदा झाल्यानं ठाकरेंनी हिरवा गुलाल उधळल्याची टीका ही केली गेली. so
त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरे आधीच बॅकफुटला गेल्याचं बोललं जातं त्यामुळे आता विधानसभेला ठाकरेंनी मुस्लिम उमेदवार दिले तर महायुतीकडून हे नरेटिव्ह आणखी जोरकसपणे मांडलं जाऊ शकतं. त्यामुळे ठाकरेंना मुस्लिम समाजाची वोट बँक खुणावत असली तरी यामुळे त्यांना फायद्यापेक्षा तोटा जास्त होण्याची शक्यता वर्तवली जाते.so
उद्धव ठाकरे : यांना मुस्लिम मतामुळे होणारे तोटे
मुस्लिम मतामुळे ठाकरेंना बसणारा दुसरा फटका सांगितला जातो तो म्हणजे : कट्टर शिवसैनिकांची नाळ तुटण्याची शक्यता. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर बहुतांशी आमदार खासदार ठाकरेंना सोडून शिंदे गेले. कट्टर शिवसैनिक अजूनही ठाकरेंच्याच बाजूने असल्याचं दिसून आलं. हा शिवसैनिक शिवसेना बाळासाहेबा यांच्या
विचारांना मानणारा आहे सांगितल जात.so
पण उद्धव ठाकरे नी हिंदुत्वाबाबत घेतलेली सौम्य भूमिका आणि त्यांचं सध्याचं मुस्लिम धार्जिन राजकारण पाहता त्यांचा उरलासुरला शिवसैनिकही ठाकरेंपासून दुरावू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. विधानसभेला प्रत्येक मत महत्त्वाचं असतं अगदी हजार पाचशे मतांवरून समीकरण बदलतात. त्यामुळे शिवसैनिकांना नाराज करणं ठाकरेंना परवडणार नाही. so
यात शिवसैनिकांमुळे शिवसेना आजपर्यंत राज्यात वाढली आणि रुजली. त्यामुळे ठाकरेंनी मुस्लिम उमेदवारांना संधी दिली तर वर्षानुवर्ष ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारा शिवसैनिक दूर जाऊ शकतो. त्यामुळे राज्यभरात लहान लहान पॉकेट्स मध्ये हिंदुत्ववादी मतं ठाकरेंच्या सेनेपासून दुरावू शकतात. असाही एक मतप्रवाह
मुस्लिम मतांच्या नादात ठाकरेंना फटका बसू शकतो असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे : एमआयएम फॅक्टर Uddhav Thackeray यांनी महाविकास आघाडीत येत काँग्रेस आणि शरद पवार गटाशी जुळवून घेतलंय. मात्र अजूनही एमआयएम बाबतची आपली भूमिका बदलली नाही. काहीही झालं तरी एमआयएमशी युती करणार नाही अशी ठाकरे यांची भूमिका राहिली आहे . अलीकडेच एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत येण्याबाबत बैठक घेतली आहे. मवियाच्या बड्या नेत्याला याबाबतचा प्रस्ताव दिल्याची देखील चर्चा आहे. so
पण ठाकरे यांचं राजकारण पाहता ते एमआयएम ला महाविकास आघाडीत घेण्यास राजी होतील असं काही वाटत नाही.. कारण ठाकरेंनी मुस्लिम उमेदवार देण्याचा विचार केला तर ते मुस्लिम बहुल मतदारसंघातूनच त्यांना संधी देतील. so
अशा ठाकरे आणि एमआयएम आमनेसामने आले तर मुस्लिम मतांचे विभाजन होऊन याचा
फायदा महायुतीलाही होऊ शकतो. पण मुस्लिम मतांची शक्ती लक्षात आल्यामुळेच ठाकरे भूमिका बदलतायत असा टोला देखील त्यांनी लगावलाय.
उद्धव ठाकरे खरंच मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवतील का ? मुस्लिम उमेदवार दिले तर ठाकरेंना फायदा होईल की तोटा ?
याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा
एक्सटर्नल लिंक : उद्धवUddhav Thackera
0 टिप्पण्या