Click Me Join Us Join Learn More Click Here Download Now Contact Us

 Uddhav Thackeray  चा पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा आग्रह, MVA  बैठकीत काय राडा झाला ? ठाकरे यांना कॉंग्रेसचा विरोध.?

 गणेशोत्सव संपल्यानंतर आता जागा वाटपाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विसर्जनानंतर लगेचच  Uddhav Thackeray , महाविकास आघाडीची सलग तीन दिवसांची मॅराथॉन बैठक 18 सप्टेंबर पासून चालू झाली आहे. या बैठकीमध्ये जागा वाटप फायनल तोडगा त्यावरती काढला जाईल. आणि पितृपक्षाच्या आधी जागा वाटप पूर्ण करून उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश मविया कडून दिले जातील असं म्हटलं जातंय.

आता या बैठकीबद्दल जी काही माहिती समोर येते त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं कमी जागा घेण्याच्या बदल्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा सूर आळवलाय अशी माहिती मिळते. बरं इतकंच नाही तर काँग्रेसच्या  काही नेत्यांनी यावरनं अगदी ठाकरे गटाशी युती तोडण्याची भाषा केली आहे.so

असं सुद्धा कळतंय काँग्रेसचे नेते तर या बैठकीत जागा वाटपाची चर्चाच झाली नाही असं म्हणतात. त्यामुळे महाविकास आघाडीतला संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय . पण मवियाच्या बैठकीत नेमकं काय घडलं ?

जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपद यावरती एकमत नाही झालं तर त्याचा काय परिणाम होण्याची शक्यता आहे .आणि उद्धव ठाकरे आजही मुख्यमंत्री पदाचा हट्ट का सोडत नाहीयेत. पाहुयात महाविकास आघाडीच्या बैठकीची इनसाइड स्टोरी.so

दिवसांपासूनच महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय. काँग्रेस हा मोठा भाऊ ठरणार आहे किंवा मुंबईतल्या जागांवरन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये मतभेद आहेत अशा बातम्या येत होत्या. पण सध्या या सगळ्यांवरती तोडगा काढण्यासाठी बैठकांचे सत्र चालू आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरे:  यांच्यामुळे  Hindu मतं दुरावणार का? Muslim मतांसाठी Uddhav Thackeray यांची फिल्डिंग,  नेमकी खेळी काय?

काँग्रेसचे नेते त्यासाठी विलंब करतात अशी टीका सुद्धा संजय राऊत करतात .2019 ला तिन्ही पक्षांचे जितके आमदार निवडून आले होते त्यानुसार जवळपास एक 160 जागांच जागा वाटप हे निवडून आलेल्या जागांच्या आधारे फिक्स झाल्याचं सांगितलं जातंय.

पण जसा महायुतीत उरलेल्या 100 जागांचा प्रश्न आहे तसाच महाविकास आघाडीत उरलेल्या जवळपास 130  जागांच्या वाटपावरनं खडाजंगी होण्याची शक्यता आहे. या सगळ्यातच बैठकीच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा मुद्दा ठाकरे गटाकडून पुढे करण्यात आल्यानं काँग्रेसच्या गोटात सुद्धा हालचालींना वेग आल्याचे माहिती आहे.so

 Uddhav Thackeray  : बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदावर चा दावा

Uddhav Thackeray


उद्धव ठाकरे सभांमध्ये किंवा जाहीर भाषणात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदावर चा दावा सोडलाय असं सांगत असले. तरी महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीमध्ये ठाकरे गटानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी गळ घातल्याची माहिती समोर येते .

महाविकास आघाडीच्या बैठकीच्या पहिल्याच दिवशी ठाकरे  गटानं जागा वाटपात एक प्रस्ताव महाविकास आघाडी समोर ठेवल्याची माहिती आहे. ज्यामध्ये ठाकरे गट 95 काँग्रेस 105 आणि शरद पवारांनी 88 जागा निवडणुकीसाठी घ्याव्यात असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.so

काँग्रेस पेक्षा 10 जागा आम्ही कमी घेतो पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषितच करा अशी मागणी ठाकरे गटाने पुन्हा केली आहे. 2019 च्या विधानसभेला भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या .आता महाविकास आघाडीत मात्र उद्धव ठाकरे 24 जागा कमी लढण्यासाठी तयार आहेत असं सांगितलं जातंय .

शिवसेनेचा हाच  प्रस्ताव काँग्रेसने मात्र धुडकावलेला असून काँग्रेस 120 ते 125 जागांवर लढण्यासाठी आग्रही आहे.  महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पद चा चेहरा म्हणून कोणालाच घोषित केलं जाणार नाही असा ठाम निर्धार महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय .so

 तसं राहुल गांधींना सुद्धा कळवलंय. अगदी जर मुख्यमंत्री पदावरनं उद्धव ठाकरे मागे हट नाहीत तर आघाडी तोडण्याची तयारी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली असून फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणुका लढवेल अशी माहिती काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं
 दिली आहे.so

त्यामुळे Uddhav Thackeray  ना कमी जागांसोबतच मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडून द्यावा लागेल तेव्हाच महाविकास आघाडीची जागा वाटपाची गाडी पुढे सरकेल अशी परिस्थिती आहे .पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा हट्ट का सोडत नाहीयेत? ते इतके आग्रही काय आहेत ?

तर यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंना वाटणारी इनसिक्युरिटी .2019 ला ज्या मुख्यमंत्री पदावरनं युती तुटली त्याच मुख्यमंत्री पदावरनं आज महाविकास आघाडी तुटेपर्यंत ताणलं जातंय . सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये बदललेली राजकीय समीकरण आणि शिवसेनेत झालेलं बंड .so

बंडानंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री केलाय हे भाजपने ठासून सांगितलेलं .

 Uddhav Thackeray  : मुख्यमंत्री नाही झाले तर आमदार शिंदेंकडे जातील ? 

शिंदेंनी सुद्धा हिंदुत्वाचा नारा देत लोकसभेला शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढाईत 13 पैकी सात जागा जिंकत ठाकरे यांच्या विरोधात स्ट्राईक रेटच्या जोरावर बाजी मारली.

पण आता विधानसभेला उद्धव ठाकरेंना मूड शिवसैनिकांना आपल्या बाजूने करायचं असेल किंवा आपलं महाविकास आघाडीतलं स्थान मजबूत करायचं असेल तर मुख्यमंत्री पद हे त्यांच्यासाठी हुकुमाचा एका ठरणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असतील तर शिंदेंकडे जाणारे शिवसैनिक सुद्धा  ठाकरेंच्या मागे उभे राहू शकतात.so

दुसरीकडे गमावलेली मतं पुन्हा मिळवण्यात ठाकरेंना यश मिळू शकतं पण हेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसतील तशा आशाही दिसत नसतील .आणि जागा वाटपात काँग्रेस सगळ्यात जास्त जागा लढवत असेल तर काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही ठाकरे यांच्या मागे का उभे राहू असा सूर शिवसैनिकांकडून येऊ शकतो .so

त्यामुळेच उद्धव ठाकरेंना आधीच कमी जागा आणि त्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील ठाकरे नसतील तर शिवसैनिकांना थांबून ठेवणं जोडून ठेवणं उद्धव ठाकरेंना कठीण जाऊ शकतं. 2019 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरच  शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत .so

त्यामुळे  Uddhav Thackeray  ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं हे महत्त्वाचं वाटतंय .आता याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांचं वाढलेलं महत्व. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद  पाहायला मिळाला .ठाकरेंना लोकसभेला सहानुभूती मिळेल  दिसत होतं पण प्रत्यक्ष च्या ग्राउंड वरती ती तितक्या प्रमाणात दिसली नाही.

तेच पुन्हा विधानसभेत सुद्धा रिपीट होण्याची शक्यता आहे .उद्धव ठाकरेंकडे सध्या केवळ 15 आमदार आहेत. हे  शरद पवारांकडे केवळ 12 आमदार आहेत. पण शरद पवार सोडून गेलेल्या 40 आमदारांच्या जागांवर गड्याला गडी लावायला त्यांनी लोकसभेपासूनच सुरुवात केली आहे.

 उद्धव ठाकरे  कमी पडताना दिसतायत. गद्दार म्हणून गेलेल्या आमदारांवरती ठाकरे अगदी जहरी टीका करताना दिसतायत. पण  ग्राउंड वरती त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार शोधण्यामध्ये उद्धव ठाकरे मागे पडलेत. दुसरी इकडे एकनाथ शिंदेनी मात्र आपल्याकडचा एकही आमदार एकही नेता फुटणार नाही. लोकसभेला ज्यांना डावललं गेलं त्यांना कुठे ना कुठे प्लेस केलं जाईल याची पुरती काळजी घेताना दिसतायत.so

 Uddhav Thackeray  चा मुख्यमंत्री पदाचा हट्टअसण्याची करणे 

त्यातच  एकही आमदार ठाकरेंकडे परत जाणार नाही याची सोय सुद्धा शिंदेनी करून ठेवली आहे. हेच अजित पवारांकडचे अनेक आमदार हे शरद पवारांकडे परत जाताना दिसतात. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात विधानसभा होतील असं म्हणत अमित शहा आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी विधानसभेनंतर सत्ता आली.so

तर शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा पहिला क्लेम दिला जाईल. हे मान्य केलेलं दिसतं त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे क्रमांक एक चे दावेदार आहेत. हे स्पष्ट करण्यात आलंय म्हणूनच ठाकरेंना जर वन टू वन लढाई करायची असेल तर महाविकास  आघाडीकडनं मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून समोर जाणं गरजेचं आहे .

नाहीतर त्यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांमध्ये ठाकरेंची प्रतिमा ढासळू शकते. त्यामुळेच उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा हट्ट हा आजही कायम आहे .पण या सगळ्यात मुख्यमंत्रीपद हेच ठाकरेंचं अंतिम ध्येय असल्याचा मेसेज  महाविकास आघाडीत आणि मतदारांमध्ये सुद्धा जाऊ शकतो .so

जागा वाटपात कमीपणा घेणं सोबत थांबलेल्या लोकांना उमेदवारी मिळाली नाही, जागा वाट्याला आली नाही तर त्याचा रोष उद्धव ठाकरेंना सहन करावा लागू शकतो .थोडक्यात सध्या उद्धव ठाकरे यांची अवस्था ही इकडे आड आणि तिकडे  विहीर अशी झालेली दिसते .

आधीच लोकसभेला मुस्लिम मतदारांचे मतदान झाल्यामुळे ठाकरेंची नौका पार झाली. ती मुस्लिम मतदारांमुळे असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडनं आणि भाजप कडनं केला जातोय .दुसरीकडे जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा चर्चेत ठाकरे अडकल्याने त्यांची कोंडी झाली आहे .

अशी टीका होताना दिसते तुम्हाला काय वाटतं ?  Uddhav Thackeray  मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडतील का ? आणि जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसतील तर त्यांना विधानसभेला तोटा होईल का ?so

नेमकी राजकीय समीकरण काय राहतील याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून
 नक्की कळवा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या