Click Me Join Us Join Learn More Click Here Download Now Contact Us

Dharmaveer 2 Movie : Anand Dighe यांच्या मृत्यूबद्दल संशय का?

 धर्मवीर दोन मुक्काम पोस्ट ठाणे. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. हे नाव आणि टॅग लाईन घेऊन 27 सप्टेंबरला Dharmaveer 2  भाग रिलीज झाला. पहिल्या दोन दिवसात पिक्चरची कमाई जवळपास अडीच कोटी झाल्याचे बॉक्स ऑफिसचे आकडे सांगतायेत. कित्येक ठिकाणी पिक्चर हाऊसफुल झाल्याचे बोर्ड लावण्यात आलेत.

पण हा पिक्चर रिलीज झाल्यानंतर पुन्हा एकदा एक प्रश्न चर्चेत आलाय. तो म्हणजे आनंद दिघेचा मृत्यू नेमका कसा झाला ? जेव्हा धर्मवीरचा पहिला भाग रिलीज झाला होता. तेव्हाही या प्रश्नाची जोरदार चर्चा झाली होती. पहिल्या भागाचा शेवटच आनंद दिघेच्या मृत्यूवरच्या

 प्रश्नचिन्हाने झाला होता . त्यानंतर आता दुसऱ्या भागात सुद्धा आनंद दिघेचा मृत्यू हा विषय आहे. पण हा विषय फक्त पिक्चरमुळे चर्चेत आला आहे .असं नाही आमदार संजय शिरसाठ यांनीही याबद्दल वक्तव्य केलंय. ते म्हणाले आनंद दिघे यांच्या फक्त पायाला इजा झाली होती. दोन तासातच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज होणार होता.so

हेही वाचा :  Akshay Shinde Encounter : अक्षयचा पोलिसांवर गोळीबार मग अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर,काय घडलं ?

डिस्चार्ज कार्डही तयार होतं. त्यांना भेटायला सगळे नेते गेले असताना ते हसत खेळत बोलत होते. मग अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका येण्याचं कारण काय ? इंजेक्शन मधून त्यांना काही दिला असल्याचा संशय काही लोकांनी व्यक्त केला.so

एक्स्टेंयल लिंक:  Anand Dighe यांच्या मृत्यूबद्दल संशय का?

Dharmaveer 2 :  आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर ठाण्याचं सिंगानिया हॉस्पिटल बंद करण्यात आलं

Dharmaveer 2


आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर ठाण्याचं सिंगानिया हॉस्पिटल बंद करण्यात आलं. ते अजूनपर्यंत बंदच आहे .आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसैनिकांच्या मनाला पटतच नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी चौकशीची मागणी करतो. त्यांच्या या वक्तव्यावर वर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली.so

केदार दिघे यांनी तुम्हाला माहीत होतं तर इतके वर्ष गप्प का बसलाय  . दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून कोर्टाची पायरी चढायलाही तयार आहे. तुम्ही पुरावे घेऊन या असं  प्रत्युत्तर शिरसाट यांना दिलं.

पण आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल संशय का व्यक्त केला जातो .आजही लोकांना कोणते प्रश्न पडतात ? आणि का पाहूयातso

सगळ्यात आधी आपल्याला पाहावं लागतं . आनंद दिघेचा अपघात घडला त्या दिवशी काय झालं  होतं ? तारीख होती 24 ऑगस्ट 2001 गणेशोत्सवाचे दिवस होते. ठाणे शहरातल्या वेगवेगळ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या घरातल्या गणपतींच्या आरतींना उपस्थित राहून आनंद दिघे घरी परतत होते.

दिवसभराचा कार्यक्रम पूर्ण करता करता पहाट झाली होती. पण कार्यक्रम थांबले नव्हते . अशाच एका कार्यकर्त्याच्या घरी जाताना. वंदना थिएटरच्या आवारात त्यांच्या आरमाडा गाडीला एसटीन धडक दिली. या अपघातानंतर आनंद दिघेना ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सर्जरी सुद्धा करण्यात आली.so

दिघेना हार्टचा प्रॉब्लेम होता. त्यासाठी दोन-तीन वेळा त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं. मात्र ते व्यवस्थित उपचार घ्यायचे नाही, त्यांचं स्वतःकडे नीट लक्ष नसायचं , कधी कधी अर्धवट उपचार घ्यायचे, कधी कधी दवाखान्यातून अचानक निघून जायचे असे दिघ्यांचे निकटवर्तीय सांगतात.

अशाच आशयात याचा एक सीन  धर्मवीरच्या पहिल्या भागात सुद्धा आहे. पण गणेशोत्सवात झालेला त्यांचा हा अपघात जेवावर बेतणारा नक्कीच नव्हता. सगळं काही व्यवस्थित होऊन आनंद दिघे रुग्णालयातून लवकरच बाहेर पडतील अशी आशा कार्यकर्त्यांना होती. आनंद दिघेना हॉस्पिटलमध्ये त्यांचे कार्यकर्ते आणि काही नेतेही भेटायला जात होते.so

सिंगानिया हॉस्पिटलच्या आवारात शिवसैनिकांची मोठी गर्दी ही जमा व्हायची . 26 ऑगस्टलाही नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अशीच गर्दी जमली होती. आपली प्रकृती ठीक आहे,

Dharmaveer 2 :  आनंद दिघेच्या मृत्यूबाबत  संशय का व्यक्त केला जातो ?  

काळजीचं काही कारण नाही असं आनंद दिघेनी स्थानिक वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सांगितलं होतं.

पण रात्री साडे दहा च्या सुमारास बातमी आली. आनंद दिघे गेले. त्यांच्या मृत्यूनंतर सिंगानिया हॉस्पिटल बाहेर असणारा जमाव संतप्त झाला. उपचार घेणारे दिघे साहेब अचानक कसे गेले.  आणि त्या रागाच्या भरातच हॉस्पिटलमध्ये तोडफोड सुरू झाली . सिंगानिया हॉस्पिटलच्या परिसराला आग लावण्यात आली.so

200 घाटांचे रुग्णालय आगीच्या हवाली गेलं. सुदैवानं तोर हॉस्पिटलचा स्टाफ डॉक्टर आणि रुग्णांना बाहेर काढण्यात आलं होतं . पण शिवसैनिकांनी संतापानं लावलेल्या आगीत सगळं हॉस्पिटलच खाक झालं. हा होता 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या काळात घडलेला घटनाक्रम

मग नेमके प्रश्न आणि संशय का व्यक्त केला जातो ?  तर मुद्दा येतो तो अपघाताचा दिघेचा मृत्यू होण्याआधी . काहीच वेळापूर्वी राज ठाकरे त्यांना भेटून गेले होते. तेव्हा त्यांची तब्येत ठीक होती. डॉक्टरांनीही ते काही दिवसात ठणठणीत होतील असं सांगितलं होतं.  

कार्यकर्ते आनंद दिघेना कधी डिस्चार्ज मिळेल याची वाट पाहत होते. असं वातावरण असताना अचानक आनंद दिघेच्या मृत्यूची बातमी आल्याने हा धक्का शिवसैनिकांना बसला . डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आनंद दिघेना संध्याकाळी सव्वासात च्या दरम्यान पहिला अटॅक आला .so

त्यानंतर पुढच्या दहा मिनिटांनी दुसरा अटॅक आला . डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. पण त्यांना अटॅक मधून वाचवता आलं नाही. या माहितीला धर्म पहिल्या भागाच्या प्रमोशन वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुजोरा दिला होता. त्यांनी आनंद दिघेंना अटॅक आल्याचं डायग्नोसिस मधून पुढे आलं असं सांगितलं होतं.so

मग मुद्दा येतो तो म्हणजे संशय का व्यक्त केला जातो ? तर हा प्रश्न विचारायला सुरुवात झाली .ती आनंद दिघेच्या अंत्यसंस्कारापासून . कारण आनंद दिघेच्या अंत्यसंस्काराला बाळासाहेब ठाकरे उपस्थित नव्हते . त्यांच्या अनुपस्थितीनेही संशयाला  बळ मिळालं असं सांगण्यात येतं .आनंद दिघेची वाढती लोकप्रियता बाळासाहेबांना सहन होत नव्हती.

पक्षांतर्गत गटतट होते त्यातून घातपात झाला असे संशय व्यक्त केले जाऊ लागले. वास्तविक आनंद दिघेच्या मृत्यूनंतर सिंघानिया हॉस्पिटलमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळेच सुरक्षा यंत्रणांनी बाळासाहेबांना आनंद दिघेच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी अटकाव केला होता.so

Dharmaveer 2 : आनंद दिघेच्या अंत्यसंस्काराला बाळासाहेब ठाकरे उपस्थित नव्हते.आनंद दिघेची वाढती लोकप्रियता बाळासाहेबांना सहन होत नव्हती. ? 

राजकीय विश्लेषकांनी असा कोणता घातपात झाल्याची शक्यता फेटाळून लावत. शिवसेनेत कधीच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यात स्पर्धा नव्हती असं सांगितलं होतं. 2019 मध्ये नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या हत्येसाठी बाळासाहेब ठाकरे जबाबदार होते असं वक्तव्य केलं होतं .so

तेव्हा नारायण राणे यांनी पुढे हे स्पष्टीकरण दिलं होतं . ते म्हणाले होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत जे काही आरोप झाले . ते मला मान्य नाहीत. आनंद दिघेंना शेवटचा भेटणारा मी होतो . मी गेलो तेव्हा दिघे यांची प्रकृती अत्यंत खालावली होती . मी बाहेर पडून बाळासाहेबांना फोन केला आणि डॉक्टर नीतू मांडके यांना पाठवून देण्याची विनंती केली.so

बाळासाहेबांनी तशी व्यवस्था केली पण डॉक्टर नीतू मांडके येण्या अगोदरच दिघे  यांचा मृत्यू झाला होता ही वस्तुस्थिती आहे . मात्र याच नारायण राणेंनी एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेतून बंड केलं तेव्हा असं वक्तव्य केलं होतं. की शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.

त्यांच्या या वक्तव्यालाही दिघ्यांच्या मृत्यूशी जोडण्यात आलं होतं . त्यावेळी काही शिवसेनेच्या नेत्यांकडून नारायण राणे दिघेना भेटणारे शेवटचे नेते होते. आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. म्हणून राण्यांना संशयाच्या धारेवर धरलं होतं.so

याच वेळी ठाण्यात आणखी एका थेरीची चर्चा सुरू होती ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद  दिघे यांच्यात सगळं काही अलबेल नव्हतं का अशी. या चर्चांना कारण ठरल्या होत्या 2000 ते 2001 या काळात आलेल्या काही बातम्या आणि ठाण्यात घडत असलेल्या घटना त्यावेळी ठाणे महानगरपालिका पालिकेच्या आयुक्तांनी रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली होती .

यासाठी त्यांनी कित्येक अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला होता. या कारवाईमध्ये शिवसैनिकांच्या टपऱ्या आणि दुकान सुद्धा तोडण्यात आली . ज्यामुळे आनंद दिघे यांनी या कारवाईला विरोध दर्शवला . पण ठाण्यातल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी हिरवा कंदील दाखवला होता.so

Dharmaveer 2  : आजही आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जातो

त्यामुळे कारवाई थांबली नाही अशा चर्चा सुरू झाल्या . या सगळ्यानंतर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात थोडे मतभेद झाल्याचे च्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये आल्या होत्या. त्यामुळे मृत्यूनंतर मातोश्रीवर संशय करण्याची थेरी चर्चेत आली . आता धDharmaveer 2 मध्येही आनंद दिघेच्या मृत्यूबद्दलचे काही प्रसंग दाखवण्यात आले आहेत .

आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर सिंगानिया हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली होती . या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेमध्ये जे शिवसैनिक सहभागी होते . अशा जवळपास 126 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा प्रसंग Dharmaveer 2  मध्ये आहे.so

या प्रसंग वेळी एक शिवसैनिक  पोलीस स्टेशन मध्ये. दिघे साहेब मेले नाहीत .त्यांना मारलं असं संतापाने म्हणतो. त्यानंतर पत्रकार दिघे साहेब कसे गेले . कुणामुळे गेले हा प्रश्न विचारताना दिसतात .साहजिकच  मध्येही आनंद दिघे यांचा मृत्यू कशामुळे झाला आणि नेमकं काय घडलं हा प्रश्न सातत्याने चर्चेत येत राहतो.so

थोडक्यात आजही आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जातो . तो याच कारणांमुळे आताही धर्मवीर भाग दोन मधले प्रसंग संजय शिरसाट , केदार दिघे, संजय राऊत यांनी केलेली वक्तव्य . यामुळे हा विषय पुन्हा एकदा बातम्यांचा आणि चर्चांचेही केंद्रस्थान ठरला आहे.

या घडामोडी बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या