Click Me Join Us Join Learn More Click Here Download Now Contact Us

 Laxman Hake : पुण्यात काय घडलं? लक्ष्मण हाकेंवर दारू पिल्याचा आरोप, मेडीकल टेस्टही झाली. 

 एक मराठा लाख मराठा. दारू पिलेल्या  Laxman Hake च करायचं काय ? हाके साहेब बिअर पितात आणि आमच्या जरांगेवर बोलतात. या बेवड्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय अशा प्रकारच्या घोषणा देत. काल पुण्यातल्या कात्रजो कोंडवा रस्त्यावरती लक्ष्मण हाकेन विरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

 Laxman Hake :  लक्ष्मण हाकेंवर दारू पिल्याचा आरोप , पुण्यात काय घडलं?

Laxman Hake


काल रात्री उशिरा लक्ष्मण हाकेन संदर्भातले दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले . आणि राज्यामध्ये एकच खळबळ उडाली. पहिल्या व्हिडिओमध्ये दोन माणसांनी लक्ष्मण हाके दोन्ही बाजूंनी पकडलेलं दिसतं. आणि या संदर्भात हाकेनी दारू प्यायली आहे . बिअर पिणारा माणूस so

मच्या जरांगेंवर बोलतो, संभाजीराजेंवर बोलतो. अशा पद्धतीने मराठा आंदोलक त्यांच्यावरती आरोप करताना दिसतायत. तर दुसऱ्या व्हिडिओत मेडिकल टेस्टची मागणी आणि पोलीस स्टेशनला जाण्याविषयीची चर्चा आपल्याला ऐकू येते.so

आता काही मराठा आंदोलकांनी या सगळ्या गोष्टी लाईव्ह केल्यानंतर कात्रज कोंढवा परिसरात मोठ्या संख्येने ओबीसी आणि मराठा बांधव जमले होते. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलीस स्टेशन ला सगळा जमाव ठिया मांडून बसला होता. लक्ष्मण हाकेची टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली.

त्यांची टेस्ट ही झाली नेमकं काल रात्री पुण्यात काय घडलं? लक्ष्मण हाके वरती दारू पिल्याचे आरोप का करण्यात आले? या संदर्भात हाकेचा दावा काय ? मराठा आंदोलकांची बाजू काय आणि रिपोर्ट्स मध्ये नेमकं काय आलंय ? सविस्तर मध्ये समजून घेऊयात .so

 दिवसांपासून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद शिगेला पोहोचलेला दिसतो. लोकसभेच्या निकालानंतर एकी कड अंतर्व सराटीत मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली. त्या पाठोपाठ लगेचच चार-पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडी गोदरीमध्ये लक्ष्मण हाके. हे ओबीसींचे हक्क वाचवण्यासाठी उपोषणाला बसले.

हेही वाचा :  Dharmaveer 2 Movie : Anand Dighe यांच्या मृत्यूबद्दल संशय का?

त्या दरम्यान मुंडेपासून ते भुजबळांपर्यंत अनेक मोठ्या नेत्यांनी हाकेच्या स्टेजला भेट घेत. हाकेंना पाठिंबा दर्शवला होता . त्यानंतर काही मागण्या मान्य करत हाकेच उपोषण मागे घेण्यात आलं. इकडे जरांगेंच सुद्धा उपोषण मागे घेण्यात आलं होतं.so

त्यानंतर अगदी अलीकडेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले. तेव्हा हाके सुद्धा वडी गोदरीत उपोषणाला बसले. जरांगेंनी काही कारणास्तव उपोषण मागे घेतलं . लगेचच हाकेनी सुद्धा आपलं उपोषण संपवलं.so

पण या दरम्यान जरांगेवर आणि संभाजीराजे छत्रपतींवर हाकेंनी जोरदार टीका केली होती. अगदी संभाजीराजेंना आम्ही  राजे मानत नाही. अशा आशयाचं विधान त्यांनी केलं .आता त्याच रागातनं मराठा आंदोलक विरुद्ध लक्ष्मण हाके असा वादकाल पुण्यामध्ये पेटल्याचं सांगितलं जातंय.so

 Laxman Hake: हाकेनी मराठा आंदोलकांना बघताच  शिवीगाळ केली.

पुण्यामध्ये कात्रज कोंडवा परिसरात लक्ष्मण हाके दारू पिऊन आपल्याला शिवीगाळ करतायेत. असा आरोप मराठा आंदोलकांनी केला .ज्यामध्ये काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. यामध्ये हाकेंना दोन जणांनी पकडलेलं असून ते मध्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला होता.so

याच दरम्यान हाकेंनी मात्र मी मित्राच्या घरी जेवण करून खाली आलो होतो. तेव्हा काही लोकांनी आपल्याला बोलण्यासाठी थांबून आपल्यावरती शिवेगाळ केली. जिवे मारण्याचा पूर्वनियोजित प्रयत्न केला. असा गंभीर आरोप केलाय. आता या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली. आणि सगळे आंदोलक कोंडवा पोलीस स्टेशन वरती धडकले.so

त्यानंतर हाकेची मेडिकल टीम टेस्ट ही करण्यात आली आहे . त्याचा रिपोर्ट एक दोन दिवसात येईल असं सांगण्यात आलंय. पण प्रथम दर्शनी हाकेंची जी काही परिस्थिती होती . त्यावरनं डॉक्टरांनी लक्ष्मण हाकेनी दारू पिली नसल्याचा निष्कर्ष काढलाय  असं काही पत्रकारांनी सांगितलंय .

आता यामध्ये हाकेच्या तक्रारीवरन 25 ते 20 मराठा आंदोलकांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले. असून  Laxman Hake पुढच्या कार्यक्रमासाठी  नागपूरला रवाना झालेत असं सांगण्यात आलंय .आता या सगळ्या प्रकरणानंतर मराठा आंदोलकांनी माध्यमांसमोर नेमकी काय भूमिका मांडली आहे.so

तर घटनाक्रम सांगतो एका मराठा आंदोलकाने सांगितलंय की आम्हाला एका मराठा बांधवाने सांगितलं. की कात्रज कोंडवा परिसरात लक्ष्मण हाकेनी एका रिक्षा बांधवाला सांगितलं. की बिअर घेऊन ये . तो तिथे बिअर पीत होता .

आम्हाला हे समजताच आम्ही तिकडे गेलो. हाके टू व्हीलर वरती निघाले होते. त्यांनी आम्हाला बघताच शिवीगाळ केली. तोपर्यंत आम्ही पोलिसांना फोन करून बोलावलं. हाकेनी जास्तीचे ओबीसी आंदोलक सुद्धा बोलावले . ते आम्हाला मारून) टाकायची धमकी देत होते.so

आम्ही त्यांना म्हणत होतो तुम्ही संभाजीराजांवर का बोलता?  जरांगेंवर का बोलता? यावरनं आम्ही त्यांना प्रश्न विचारत होतो .असा दावा मराठा आंदोलकांनी केलाय. आता याच संदर्भात मराठा आंदोलक असणारे अनिकेत देशमाने यांनी माध्यमांना असं सांगितलंय .so

की बीडचे मराठा बांधव टिळेकर नगर मध्ये भाड्याने राहतात. त्या ठिकाणी एक गोठा आहे. तेव्हा मराठा बांधवांना हाके त्या गोठ्याच्या परिसरात दारूच्या बॉटल घेऊन येताना दिसले.

 Laxman Hake :  हाकेंच्या सांगण्यावरनं  ओबीसी बांधव काठ्या घेऊन आले. मराठा आंदोलकांना त्यांनी धमक्या दिल्या

तेव्हा तिथल्या दोन-तीन लोकांनी आम्हाला फोन केला. की हाके दारू पितायत .हाके टू व्हीलर वरनं खाली येत होते. तेव्हा आम्ही तिथे गेलो.  

त्यांना म्हटलं की आम्हाला आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. तेव्हा तुमचा काय संबंध मला बोलायचा .असं म्हणत त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली .त्यानंतर हाकेंच्या सांगण्यावरनं ओबीसी बांधव त्या ठिकाणी पोहोचले .so

ओबीसी बांधव काठ्या घेऊन आले. मराठा आंदोलकांना त्यांनी धमक्या दिल्या. आम्ही पोलिसांना बोलावलं . हाकेंना पोलीस स्टेशनला आणण्यात आलं . या दरम्यान आंदोलकांनी पोलिसांकडे हाके मेडिकल टेस्ट करण्याची मागणी लावून धरली होती .

त्यानंतर मी कोणत्याही टेस्टला तयार आहे. असं प्रति उत्तर देत हाकेंना पोलीस ससूनला घेऊन गेले . आणि त्यांचं ब्लड आणि ग्रीन सॅम्पल  घेण्यात आलं .पण यामध्ये मराठा आंदोलकांनी हाकेवरती शिवीगाळीचे आणि हाकेनी थेटपणे मराठा आंदोलकांवरती जिवे मारण्याचा त्यांचा प्लॅन होता असा आरोप केलेला दिसतोय .so

आता हा सगळा प्रकार पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर .. हाकेनी लगेचच तासाभरात माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे . त्यामध्ये त्यांनी मराठा आंदोलकांचे त्यांच्यावरचे सगळे आरोप फेटाळलेले आहेत.

या आरोपांवरती लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय की . माझं घर कात्रस परिसरात आहे. तिथनं काही अंतरावर वॉक करण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळी दोन तरुणांनी माझ्याकडे येऊन चर्चा केली. ते गेवरायचे होते.so

आणि तेच तरुण  काही वेळाने काही लोकांचा जबाब घेऊन माझ्याकडे आले . माझे दोन्ही हात पकडून मला एकाच जागेवर थांबून ठेवलं . त्यांनी माझं मानगुट पकडलं होतं.  माझं एस्कॉट माझ्यापासून लांब होतं. तेव्हा त्यांनी हे सगळं केलं.

हा पूर्वनियोजित कट होता त्यामुळे मी पोलिसांना फोन केला. आणि सगळी परिस्थिती सांगितली. त्यामुळे एकूणच प्रकरण पाहिल्यानंतर मला जिवे मारण्याचा पूर्वनियोजित कट होता. आणि जर मी ड्रिंक केलं असेल . तर पोलीस विभागाच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली जाईल.so

त्यामधनं सगळ्या गोष्टी समोर येतील . मी कुठेही पळून गेलेलो नसून पोलिसांच्या सर्व तपासणीला चौकशीला सामोर जायला मी तयार आहे.   आता लक्ष्मण हाके आणि काही आंदोलनकर्ते या दोन्ही बाजूंनी तक्रारी पोलिसांकडे आलेल्या आहेत.

 Laxman Hake : मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया  

पण या तक्रारीनुसार तपास करण्यात येत असल्याचं पोलीस उपायुक्त श्री राजा यांनी सांगितलंय. या त्याच संदर्भात जी माहिती समोर आली आहे. त्यानुसार  Laxman Hake यांच्या तक्रारीवरन 20 ते 25 मराठा आंदोलकांवर कोंडवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पण हाके यांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. अशी माहिती मिळते या सगळ्या संदर्भावरती मनोज जरांगे  पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांनी त्यांना हाके संदर्भात प्रश्न विचारला असता मी या सगळ्यावरती बोलणार नाही .so

मी  Laxman Hake ना विरोधकच मानत नाही. असं जरांगे यांनी म्हटलंय. मी कचाट्यात सापडलेल्या माणसावर बोलणार नाही. हे आमचे संस्कार नाहीयेत. जो करतो तो भोगतो असं म्हणत आपण हाकेवरती टीका करणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

पण घडलेल्या सगळ्या प्रकरणानंतर आता मराठा विरुद्ध ओबीसीवाद आणखीनच स्थापण्याची चिन्ह ही निर्माण झाली आहेत.so

घडलेल्या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ? लक्ष्मण हाके वरती मराठा आंदोलकांनी जे
आरोप केले. आणि हाकेनी मराठा आंदोलकांवरती जे आरोप केले. त्यामध्ये नेमकं कोण खरं आणि कोण खोटं?  या संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा .

एक्सर्नल लिंक :   लक्ष्मण हाकेंवर दारू पिल्याचा आरोप,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या